रोज ज्ञानेश्वरी वाचन, ईश्वरोपासना व दर गुरुवारी शुलभंजन पर्वतावर जात. तेथे साक्षात दत्तात्रय महाराज दर्शन देत असत. आपले प्रिय शिष्य संत एकनाथांना त्यांनी तेथेच साधना करायला शिकवले.
संत जनार्दन स्वांमींचा जन्म चाळीसगाव ( खानदेश ) येथे फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १४२६ इ.स. १५०४ मध्ये झाला. चाळीसगावातील ते वतनदार देशपांडे होते. एका नाथपंथीय साधुने त्यांच्या वडीलांना दिलेला विभुतीचा प्रसाद म्हणजे जनार्दन स्वामी.
शके १४३९ म्हणजे वयाच्या ५ व्या वर्षी त्यांचे मौजीबंधन झाले. त्या सोहळ्याच्या वेळी
वडील हरीपंतानी त्यांना आपल्या मांडीवय घेऊन गायत्री मंत्राची दिक्षा दिली. दुसऱ्या दिवसापासुन संध्या, पुजा-अर्चा शिकवण्यासाठी गुरुजी येऊ लागले. जे शिके ते लगेच त्यांचे पाठ होत असे. सकाळी संहिता उपदेशाचे पाठ चालत तर दुपारी रामायण, भागवत व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करत असे.
ज्ञानेश्वरी खास आवडीचा ग्रंथ होता. त्याचे वाचन झाल्याखेरीस अन्न ग्रहण करत नसे. ते भारदस्त दिसत. तसेच ते मुत्सदी राजकारणी होते. पुढे ते देवगिरी ( दौलताबाद ) येथील एक यवन किल्लेदाराचे कारभारी म्हणुन काम पाहात होते. आपला प्रपंच ईमाने ईतबारे करीत असतानाच परमार्थसुद्धा मनोभावे करीत. रोज ज्ञानेश्वरी वाचन, ईश्वरोपासना व दर गुरुवारी शुलभंजन पर्वतावर जात. तेथे साक्षात दत्तात्रय महाराज दर्शन देत असत. आपले प्रिय शिष्य संत एकनाथांना त्यांनी तेथेच साधना करायला शिकवले.
तसेच तेथे त्यांना मलंगरुपात गुरु दत्तात्रेयाचे दर्शन घडले. गुरु दत्तात्रेय हेच त्याचे सद्गुरू होते, असे सांगितले जाते, दत्तात्रेयांनीच त्यांना गुरुमंत्र दिला होता. ज्ञानेश्वरी व अमृतानुभवावर त्यांचे रसाळ निरुपण होते. त्यांना संत एकनाथासारखा शिष्य लाभला याचाच फार आनंद वाटे.
शके १४९७ म्हणजे इ.स. १५७५ मध्ये त्यांनी दौलताबाद येथे समाधी घेतली. पण खरें तर ते गोरक्ष गुहेत गेले होते, ते तेथुनच अंंतर्ध्यान पावले.

ह्या
पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments