श्री स्वामी समर्थ कवन् माळा....!


ll स्वामी काव्य ll ---- १


स्वामी देती आत्मबळ l आचरणे पाहुनी आपुले ll
आत्मबळ देती ज्ञान l श्रीचरणे मस्तकी आपुले ll


ह्दयी स्वामी पाहता विशेष l मन भरले वाहुनी ll
काय वर्णवु मी पामर l तव चरणी पडलो राहुनी ll


जीव होतां विषयसुखी l गमवतसे स्वामी हो अंतरी ll
या हो या मज तारावय l शिव करा हो श्री निरंतरी ll


भेट द्या हो गुरुराया l चित्त जडीते तव चरणी ll
अंत होतो या देहाचा l होवो मजला तव प्राती ll


साधू साधु म्हणता जन l काय धुतले हेची कळेना ll
येता जाता बोली मुखे l स्वामीमयता आकळेना ll


माझे मरण स्वामी हो l पाहु द्या हो मम डोळा ll
तव कृपेविन स्वामी l ह्दय फुल कधी न फुलेना ll


हेची आपुली स्वामीवाणी l फिरतसे हो स्वानंदी ll
गजर होतसे शिव नामे l स्वामी होता आनंदी ll


गुरुनाम हेची आरती जणु l काकडे ओवाळु स्वानंदी ll
सद्भावे हो सद्गुरु आपुले l चरण कवळु हो आनंदी ll


युगायुगांनी आहो स्वामी हो l आजच दिसतो स्वानंदी ll
योनी योनी फिरता जन्म l आत्मसार्थकी हो तो आनंदी ll


स्वामी माझै म्हणताती l हा काय करीसी खुळखुळा ll
का रे मिथ्या वाढीसी l कारे फोडि तु जनडोळा ll


स्वामी माझै म्हणताती l का तु वाढीसी विषप्याला ll
निळकंठला भज बाळा l दैवकारणे वाहु दे शिवला ll


स्वामी माझै म्हणताती l का रे टाहो करसी संसारी ll
दत्तचरणी मन रमुदे तव l तारावया आलो भवसागरी ll


स्वामीमय जीवन झाले l माझं हीत फळाला आले ll
स्वामी पाहता लोचनी l माझं आत्म रडाया आले ll


स्वामीमय जीवन झाले l माझं मन सराया आले ll
स्वामी पाहता लोचनी l माझं भान हराया आले ll


स्वामीमय जीवन झाले l माझं देह पडाया आहे ll
स्वामी पाहता लोचनी l माझं ब्रम्ह घडाया आले ll


अवघा रंग स्वामींचा l रंगी रंगु दे आत्मरंग ll
रंगता रंगता मग बघा l भंगुन जाईल भवसंग ll


अवघा रंग स्वामींचा l अंगी येते दीव्यपण ll
नामसंगे रंग जरा l होतो जीवाचा शिवरंग ll


अवघा रंग स्वामींचा l बुध्दी होई आत्मरम ll
अंतःकरणाचे स्वरा हो l होते उपाधी नष्टसम ll


होवो पहाट स्वामी माझी l किती श्रमलो मी या प्रपंचधामी ll
दयाघना हो करुणाकरा हो l माझे परित्राण होवो तवचरणी ll


माझे दुःख अपार हो सद्गुरु l काय वर्णवु तव स्वामीलीला ll
माझी मति नाही सम हो l विषय विषम जीवन ही शोकलीला ll


स्वामी स्वामी काय हो करु l मन माझे का हौ सैर झाले ll
येता जाता मन ठेचते हो l अतुरतो मी तव स्वामी नामे ll


साधन साध्य समाधी l हेची असती योगअंगे ll
स्वामी साध्य देह साधनी l असती समाधी भावगंगे ll


अलख होता मनोमयता l संकट हरती भयहरता ll
निरंजनाचे संगसहता l दत्तविभुति थोर हो निजरुपता ll


नाग नाग डोले शिरसी l येऊनी झाली तवप्रीती ll
स्वामींचरणी लोटता शेषा l दत्तशरण ही आत्मचिती ll


चरणांजवळ बैसोनी भुजंग डोले l हर हर स्वामीनामें ॐकार बोले ll
पाताल भुतली हो गायन करती l संतजन हो नामभुमी उद्धरती ll


सद्गुरुवीना दैवत नसते lसद्गुरुकृपे शिवत्व घडते ll
सद्गुरु पाठिशी असता l काळ मृत्यू भयशोक नसते ll


सांगा सद्गुरुराया काय करु यांसी l मनमाझे रमे विषयसुखे ll
चित्त तव रुपी दृढ जडीले हो l काम करा स्वामी माझेसुखे ll


प्रपंचातुन पंच घडावा l पंचभुतांची साक्ष स्वामी ll
नातीगोती शिणती मजला l धन्य होऊद्या श्रीनामी ll


आपदा येते स्वयेमुखे l रट रटता हो मी माझे ll
संकट हरीसी स्वाः करा हो l मी चे होवो स्वामीनामे ll


आपली ईच्छा आपली आकांशा l अर्थहीन हे सर्व जगती ll
बघता बघता वय सरते तव l जीव गमवतो मुर्खमती ll


पिंड आपुला स्वये पहावा l ब्रम्ह उमले हो सहजीता ll
पिंड धुवावा तो चमकावा l होवो जीवशिव संजगता ll


जीवमाझा विश्व जाहला l शिवशिव स्मरता अर्थमती ll
स्वानुभुती त्वरित आली l स्वामीनाथ हो उध्दरती ll


मुर्ख संगते मरण पहावा l घ्यावा कल या आत्मगती ll
मरण मरता न समजे तव l आत्मप्रचीती चित्तमती ll


अक्कलकोटी जा नरसोबासी l जीव राहीला विषयसुख ll
भटकंती ही कधीन थांबे ll आत्म गीतते हो विन्मुख ll


मनपाखरु रमले आत्मी l आत्मसार्थकी होतसे ll
ब्रम्हानंदी डोले मन रे l सहज समाधी हो घडतसे ll


मी तुपण हे कुचकामीचे l स्वामी धरा हो शेषशिरी ll
अन्नासाठी अन्नकोष हे l मनोकोष भरा नामगिरी ll


दत्तगुरु गिरनारी हो माझे l हवा विश्वास भारी हो साजे ll
जपतप आणि नाम हो भाजे l ह्दयी हा महादेव हो गाजे ll


धन्य धन्य हो स्वामीलीला l पदोपदी हो विश्वंभरता ll
माझे आत्मसुख आज जाहले l तवचरणांची चाहुल वाहे ll


श्रीपादराजे माझी माता l कव दावु ही दत्त अगाधा ll
येताजाता जनपुजती l अंतरी वसती परी नतु दीससी ll


वाहे गुरु म्हणावै सदा काळी l गुरु वाहील्यावीन आत्मसुख नाही ll
सद् विचार हा आंतरी बोधतो l अंतकाळी तुला काळ ना सोडु पहातो ll


माती मोती भेद जाणावा l स्वामी खेद हा नित्य त्यागावा ll
षड् रिपुचे हो भेद खेदता l स्वामी येती सागर सरीता ll


देहद्रोण हे स्वच्छ असावे l श्री नामात न्हावुन निघावे ll
स्वामीबळ असता पाठीशी l अभंग आचरण होत रहावे ll


दाहीदिशा हो धरतील स्वामी l सदा रहा हो आत्मायामी ll
मातीमोल हे जीवन सगळे l दत्तचरण हो अंर्तयामी ll


जटाजुट शिरी चंद्र विराजत l बालमुकुट हो विजायत साजत ll
कटी करधनी हो घुंगरु बाजत l दर्शन करत सकल भय भाजत ll


जीवनदान दासला दीले l थोर उपकार स्वामी तुम्ही केले ll
संकट हरुनी धीट तुम्ही केले l मन हे भरुनी अश्रुंतुनी गेले ll


नर संसारी आत्मविकारी l कधी न स्वामी तुला झिडकारी ll
आस्तिक नास्तिक माया सारी l सदा रहा तु रामाभिमानी ll


शिवशक्तीची अगाध स्वारी l स्वामी माझे महाविक्राळी ll
क्षणांत रुद्र क्षणांत आई l स्वामीभजा हो आत्माकाळी ll


स्वामी तुमची लीला न्यारी l कव दावु मम मुख तुमच्या पायी ll
भवरोगी मी हो मुढमती l चिंतीत आसतो स्वार्थ मती ll


आचरणाचा गाजे महीमा l स्वामीनामे तरलो जन्मा ll
दिपतुपाची ज्योत लागली l स्वामीप्राप्ती आज साधली ll


तरलो तरलो स्वामीराया l जीवनमुक्त मम तव छाया ll
स्वामीमयलो जीवन अवघे l दत्ततत्व ते अमृत श्रवले ll


ll श्री गुरूदेव दत्त ll
-----------------------------------------------------------

Il स्वामी काव्य ll आणि ll काळभैरव प्रीती ll सहीत. ---- २

स्वामीचरण अमृतवाणी l सदा स्मरा हो प्रभातकाळी ll
खेदबुध्दीचा त्याग हा करुनी l माळ गुंफावी वेळोवेळी ll


जन्मांतरीचे पुण्य पाठीशी l दत्तकिर्तनी मन रमतसे ll
पितरांचेही दोष निवरती l साधन साध्य ही साधतसे ll


कर्तव्याला मुकता माणुस l माणुस ना उरतो ll
हलाहलाते प्राशुनी शंकर l देवेश्वर घडतो ll


कर्तव्याची ओळख यावी l आत्मसार्थकी जिव्हा करावी ll
गुरुचरणांची स्तुती करावी l चिखलातुनी कमले उमलावी ll


व्यस्तता निरखा संसाराची l श्वास निरंतर चालतसे ll
अन्न पचवी कोण आपुले l कोण नित्यजाग देतअसे ll


प्रेम जडीता संतचरणी l द्वैत न विवरे अंतरमनी ll
विनम्र होते मन ज्याचे l शंभु बनतो आत्मसाचे ll


धन देह नुकसानाचे l भरती परत पात्र सुपारी ll
चारित्र्याचे भान भ्रष्टती l घोर पतनी हे नरनारी ll


चारीत्र्याचे बोल निराळे l दत्तस्तवन हे आचरणे ll
कोटी जपाचे नामाचे हो l महत्व ठरीते नगण्ये ll


अन्न पचाया लागते पित्त l संसार कराया नित्य ते वित्त ll
आध्यात्मकारणे हवे आहे चित्त l नका करु हो क्लेश निमित्त ll


योनी योनी फिरता येता l मानवी जन्म हा अवतरला ll
शरीरसुखाची ओढ लागता l ब्रम्ह अडकुनची पडला ll


जीव शिव हे दोघे भाऊ l शिव हो शाश्वत तत्व असे ll
जीव गुंतता हे विषयसुख l क्षणभंगुरता ही टळत नसे ll


स्वाःमी सार हे संसार l नाही भवरोगीचा व्यवहार ll
नष्ट कर हे मनविखार l स्वामी तारती भवसंसार ll


आध्यात्म अहो सोपे असती l अर्थकारण दंभ असे ll
पैसा आडका मातीमोल l ऐकांत आत्म जोड जसे ll


वासनेचे बीज हे जन्म l संथ करा हो मन ते उन्म ll
मनतृष्णा ही कधी न भागे l देह अंत तो अवश्य साधे ll


देहअंतचे रहस्य ते आगळे l भोगवादने कधीन ते आकळे ll
घाव घालीतो काळ तो सगळे l आत्मा जाणुनी मनवळे सकळे ll


आचरणाची साक्ष असावी l निजदासभक्ती गुप्त भजावी ll
अनुभवबाणे मान हलावी l पोपटपंछी नित्य त्यागावी ll


धन्य धन्य भवभय भंजन l जय मनरंजन खलदलभंजन ll
कर त्रिशुल डमरुसुची कोडा l कृपाकटाक्ष सुयश नाही छोटा ll


देहसुखाचा रंगदंग सजता l नराचे नारायण कैसे होती ll
गुरु परीसाचा संबंध घडता l स्वर्णरुपही लोह आकरती ll


पाखंडीच्या संगती भंगे l ढोंगी धनाने हो हपहसला ll
लालची गुरु पापी चेला l पडती नरक ते ठेलमठेला ll


ज्ञानाने अज्ञान सरावै l अज्ञानही नसता दैव पहावे ll
देव भावाचा भुकेला l ज्ञानाचे आवरण ही सोडावे ll


मनाचे कार्य दृढभक्ति करवती l बुध्दी हे अज्ञान उपटती ll
मन बुध्दीच्या अधीन रहावे l भगवत्मय अंतकरण करावे ll


आत्मबोध हा श्रीमत् बोध l स्वामींच्या दासांचे औषध ll
आत्मतत्व ते हो आतिगहन l देहभावाचे हे मुळ संशोध ll


चिन्मयरुप हे आत्मविलोकी l स्वामीराजा भाव त्रिलोकी ll
आनंदवन हे सर्वाही दीसती l भक्तिफूलांचे काटे ही गळती ll


स्वामी काव्य हो आत्मकाव्य l आत्मबळेची स्वामीबळता ll
निर्गुणरुपे तव ओळख पटता l सगुणरुपस्वये ब्रम्हांडभरता ll


पिंडशिवाला भरताभरता l ब्रम्हांड सजला रमतारमता ll
पिनाकपाणी दृष्टी हेळता l डमरु बाजे हो आत्मानंदता ll


भस्मांकीत करा पहाट सारी l ताप पाप हे जळुन जाती ll
शिवशंभुची स्मरा अर्थयुक्तता l विदेही जीवन जन्मा येती ll


काकड ह्दयी ओवाळीता l देह रुद्र हो एकची होती ll
प्राण अपान समान अवघे l सुषुम्नेचे क्रमण करती ll


ईडा पिंगला सृष्टी सावरती l ब्रम्हांडीय ती सुषुम्ना असे ll
सद्गुरुकृपे ज्ञान हो स्फुरती l सुर्य चंद्र ही नमत असे ll


भजावं जीवन स्वामीमय हे l स्व मृत्यू हो स्वये पहावे ll
प्रपंचाचे पंचांग हो समजा l मुर्खकारणं सदा त्यागावे ll


वरवरची ही स्वामीभक्ति l अर्थहीन ते मुर्खमती ll
स्वाः करावी तृष्णाही मनची l सोडुनी द्यावी भवभ्रांती ll


नकलांची ही दुनीयाविचित्र l पहा अंतरी स्वामीचरित्र ll
मुर्खसंगती बनती कुपात्र l जीवन लघुता पहा आत्मपात्र ll


जीवनशैली साधी असावी l अंतकरण रंगु द्यावे ll
अतिआवडे चरण धरावे l अतिप्रीतीने स्वामी भजावे ll


योगची अर्थ जोडणे असती l भोग सर्वथा कापणीच ठरती ll
मुर्खांचे हे भोग जोडणे l कव प्राप्त होय ते योगसाधने ll


ईच्छा आंकाक्षा पाठी सोडता l स्वामी येति आत्मंभरता ll
देहबुध्दीचा होऊनी नाश l आत्मा कवळे हो स्वामीनाथ ll


मोह नसवा किर्तीचा l स्वामी नाथ अनाथांचा ll
भोगी म्हणोनी उपहासाचा l होऊ योगी कर्माचा ll


शांत तलावात दगड मारीसी l मनात उठती भवाचे खेळ ll
प्रवाहासोबत नका रे वाहु l उगमाचा हो बघा आत्ममेळ ll


स्वामी काव्य हो गात रहावे l शब्दांचे गिरीनार रचावे ll
गाता गाता स्वामी गीत l नष्ट करा हो भवसंचीत ll


शिवश्रावणी स्वर्णकाळहा l आत्माअनुसंधान करा ll
नाद हो संधानची असती l अनाहत योगे सिध्द करा ll


स्वामीवृक्ष नामबीजाचे l अज्ञान जळती संसाराचे ll
बसता फिरता यावे मुखी l धरा सदा सज्जन संगती ll


ब्रम्हामुरारी त्रिपुरांतकारी l अत्रिनंदन जय गिरनारी ll
शिवनिवाला हो हीतकारी l संध्यास्नाने दुःख निवारी ll


श्रध्देने बुध्दीने समजावे l त्रिकालसंध्या जाणुनी घ्यावे ll
अन्न भरीता खळगिचे l भगवंताला ही नित्य भरावे ll


स्वामीमय ही त्रिकालसंध्या l पिकवी मातीतुन मोती ll
नांगर ओढी स्वामीशिरी जो l धन्य होय तो दिग् अंतरी ll


अगणित भक्ते सक्तिमयता l तळ ठोकती सैलतीरी ll
भगवंताच्या मिठीत असती l एखादा त्या पैलतीरी ll


सांब सदाशिव करती तांडव l देवदैत्य बम् बम् बम् वदती ll
भस्मरमैया भृकुटी झळाळती l काळभैरव सृष्टी संहरती ll


विचित्रे तांडव रमती भैरव l सदा भ्रमंती करीतो नंदन ll
क्षेत्रपालाचा महीमा अगाध l भक्त दुःख करीसि हो खंदन ll


भैरवरुप शिव धारण करीसी l तारावया भक्त भवसागरी ll
भैरवस्मरण भय दुर हो करीसी l मंगलमय जीवनफळ देती ll


भुतप्रेत संग भैरव डोले l बं बं बं शिव बं बं बोले ll
वेताळाचे रुपही धरसी l नित्यानंदे जन उद्धरती ll


सदा स्मरा हो कोतवालासी l पहा निजअंगे सांबशिवासी ll
शिवगणांचा होईल प्रताप l त्रिवार मुक्ती ही या भवताप ll


रुद्रकाय महाकाली पुत्र l दावी भक्ता कला विचित्र  ll
भक्तालागी ती गाय असे l भक्तिकारणै दुभत असे ll


काळभैरव अतिउत्कट भाव l महाभयानक भासतसे ll
तव प्राप्तीवीन मुक्ती कैची l पिशाच्ययोनी फिरत दिसे ll


श्री भैरव संकट हररे l मंगल कराहो कृपाळा ll
काळावर्ण महाविक्राळ l भक्तिमय मनगोपाळा ll


ll श्री गुरुदेव दत्त ll
-----------------------------------------------------------

lI स्वामी काव्य ll --- ३

वासनेपायी जन्म जन्मलो l अरुणोदय कधी होत नसे ll
स्वामी ऋणानुबंधातुनी मन l दिव्यप्रकाशी येत दिसे ll


जीवनस्थळ असे कुरुक्षेत्र हो l समजा धर्मअधर्माचे पाढे ll
पार्थसारथी भगवंत दयाळु l भगवद्सुत्र शमवी भवगाढे ll


फरकावा हे काम निष्कामी l कर्मयोगाची गहन गती ll
देवकीनंदन योगेश्वर हा l भज भक्तिमयता आत्मचिती ll


जीव सनातनी भगवद् गाता l सुवासिक आचरण उमलावे ll
भगवत्मय अंतकरण करा हो l केशव ह्दयीप्रेमे कवळावे ll


आत्मकवळीता श्रीकृष्णासी l दैवआनंद गगनी न माय ll
भगवान भगवती होईल साचे l मुक्तीभाव हो दुधाची साय ll


सदामुके तो मनोमार्गी l फेरा न टळता भवसागरी ll
बोल हरीहर सार्थ कारणे l ब्रम्हसंच तो भावसागरी ll


नारदाची शाश्वत वाणी l नारायण करी नारळात पाणी ll
महाविष्णुचे श्रीमत् घेसी l भवभक्ताची वरिष्ठ वाणी ll


कमलफुलाचे आसनी बसता l योगीजीवन विश्वतारती ll
चैतन्याची होय ब्रम्हलिनता l ऐक निरंतरी अनाहतता ll


गगनी न माय अनाहत नाद l त्याचें निनादे भवशुन्य होय ll
भोगखंडे हा शरीरअंती l जीवनअखंडकथा होवो दैवीप्राप्ती ll


तारुण्याची वेळ सुखाची l कधी न दीसती ही जलधारा ll
वयता सरता जलदगतीने l काळ घालीतो सहज ईशारा ll


काळही झपटे अवकाळी l बळेंरोगही जीवकाळी ll
भगवंताची आस धरा हो l त्रिकालसंध्या आत्मकाळी ll


वासना सांडणे त्याग जीवाचे l गुणगान गाऊ परमेशाचे ll
धाव ही धरतो काळभयानक l नित्यस्मरावं भवशिवचालक ll


दिनदयाळु ह्दयकृपाळु l सावळाराम सदा ओवाळु ll
सत्वकारणे अंतीनिहारु l विठ्ठल विठ्ठल जीवकोवाळु ll


विठ्ठलाच्या पायी विट l भवसाराचा विटाळ करावा ll
संसाराचा विट सहुनी l रखुमाईवल्लभ सदा भजावा ll


विठ्ठल रखुमाई जीवने रटती l वार जन्मीना होत असे ll
अर्थबोध न फुलता अंतरी l वैकुंठलोक न कोणा दिसे ll


सदा स्मरा हो निजबोधवाणी l कैवल्याचा दाता गुरुमहाराज ll
मी मी करता अहंकारे फुगतो l स्वअंती तो जलफुगा फुटतो ll


स्वसन्माने स्वामी येति l यतिराज जीवन उध्दरती ll
स्व झिडकारे स्वामी कयाचे l मतलबी तो दंभमती ll


आत्मसन्माने जीवशुध्द होये l आत्मकारणे स्वामी सजाती ll
दुरात्म्याची पोपटपंछी l स्वामीमयता जीवा त्यासी नसे ll


करता कारण स्वामी ममता l करा निरंतरी जीवशिव समता ll
शिव आवाहने बुध्दीचे स्मरता l सहज समाधी सहज सहीता ll


पांडुरंगशिरी शिव विराजे l चरणी विट भावची साजे ll
कटी करधनी भवदव दावें l विठुसावळा गुणगान गावें ll


भगवंताची ओळख भक्ति l भक्त तयाचा जगता असती ll
भावारुढ हो या सन्मानाचे l कौतुक तुरा होये दरबाराचे ll


शोध रे शोध दैवनियंता l दंभवृत्ती त्याग मुर्खवाच्यता ll
दोषणे लावी या जगती तु l स्वयेकपट रे ना भुलवी तु ll


बहाणेबाजी अंगी जडता l स्वामी न आकळे गलिच्छजगता ll
सोड सोड ही वृत्ती प्रभाती l जीवन फुलवा शुध्दी आचरता ll


शिवकला ही जीवनशैली l भावशिवाची वेलतावल्ली ll
स्वर धरीसी हा आत्मशिरी l जीवनध्येय्य हो अंतःकाळी ll


नागेशराणा सकळां जिव्हाळा l मना जपा रे शिवसौख्यमाळा ll
अनंतभोगी शिव ब्रम्हचारी l सदा विजयते शंभु नेत्रकपाली ll


स्वामी स्मरा हो सुगमप्रभाती l जीवदैन्य होये आत्मप्रतापी ll
जीवनसौख्य मिळे अपार l दीगंबर जपता हेची आत्मकाळ ll


स्वामीसुख हे आपुले सौख्य l स्वामी आनंदे आत्मानंदे ll
मतलबी वाणी घाव आकारी l जीवनअंते दुःखविकारी ll


स्वामीनामची बसती गाठ l स्वामीघट हा भरे विराठ ll
पाप पुण्यघट नगण्य ठरती l दैवीघटाची स्थापना होती ll


आत्मकाळ हे अतिगहन l देहकाळाची झेप ओळखा ll
स्थुलदेहाचे दुःख अपार l नित्यभजावे स्वामी साकार ll


जीवनसुक्ष्मता सदा स्मरावी l अतिआवडे भक्ती करावी ll
परमअमंगल जनअवघे असती ll स्वामीचरण अंतशरीरी ll


कामवासना नरकांतकारी l देहभोग हे साध्य नसे ll
देहसुखाचा शेवट समजा l पापभोग हे भवते जन्मा ll


आत्मचारित्र्य सदापेलावे l अर्थयुक्तसदा पाठ करावे ll
स्वामीस्तवन हो सदा भजावे l जनहीत साचे होत रहावे ll


बुद्धी नासवी क्रोधसदोषा l क्रोधत्यजावा आत्मविवेका ll
पडसादाचे घोर परिणाम l खजुरवृक्षाचे असती अनुमान ll


जीवदुःखाचे मुळ क्रोधकारणे l अतिविशेषे मौनसाधणे ll
स्वामीपालक या जगताचे l क्रोधनिवारणे करा देहाचे ll


लोभीजीवन लालचस्वयेपण l काय तुधरसी तव विशेष ll
शरीरधर्म माती या जगती l काय हाव ही दैन्यनिःशेष ll


जीवनगुंतता लोभवस्तुशी l अपेक्षाभंगे होये दुःखअपार ll
स्वामींचरणी एकरुप राहो l सत्ववृत्ती दिसे आत्मसाकार ll


कैचा हा मद करवीला l काय श्रीमंती माज चढविला ll
चिरंजीवी हे जीवन जगती l स्वयेमाततव काळपांघरती ll


मदन देहाचे त्वरीत होये l मदकारणे सत्य कधीनदीसे ll
मदनांतकारी स्वामीयेता l दोषही जळती हो बीजसंहता ll


मत्सरजीवन पुर्णकपटता l मनबुद्धीची घोर विमुखता ll
कपटी जीवन दंभकारणे l दुःखअपार होता भवकारणे ll


त्याग मत्सरे अंतर्मुखता l जीवन जगरे स्वामीमयता ll
मिळेल शांती तव अपार l समाधानबाणें जीवनेंसाकार ll


अहंकारचे रिपुमाहेर l मी मी करता जगजाहीर ll
भ्रमात जीवन भ्रमात अंत l माजस्वयेचा निकटीवंत ll


बीजगर्वाचे कधीन साहे l कधीन रूजे या भावपाये ll
त्यागटाकुनी गर्वाचे हे घर l भज निरंतर स्वामीमाये ll


रिपुगणांची ओळख दिधली l साधु साधु सहाही धुतली ll
दत्तचरणरज साधु साधती l सत्यसाधु हे रिपु झाडताती ll


जीवनशत्रु रिपुगण असती l शत्रुछाया आरसेची दिसती ll
शोध स्वये जीवशत्रु स्वरात l तरुन जावे स्वामीगीतगात ll


हीत स्वतःचे स्वयेओळखावे l दत्तभजन ऐकांती भजावे ll
दत्तचरण रजगातागाता l भवसागर हा पार करावे ll


जीवविन्मुखी पडतो नरकी l सद्आचरणे शिवघडे जगती ll
स्वामीकारणे सुक्ष्मता येती l चित्तमनोहर शिवमये वसती ll


जीवाकारणे देह दाहतो l मती पालटावी आनंदसरीता ll
देहदोष करीनष्ट या नमता l भरा भाव आत्मंभरभरता ll


स्वये परिक्षण स्वयेकरावे l शत्रुओळखता आत्मपहावे ll
श्रीपादस्वामीं नित्यभजावे l भवभयहरता स्वामी करावे ll


जिद्द आपुली आत्मकरावी l सदाअंतरी नित् उभरावी ll
लख लखणे हे बंदकरावे l दत्तस्वरुप मनी अलख भजावे ll


नित्यअंजनी चित्त धरावे l अतिसावधता आत्मचितावे ll
निरंजन हे ज्योर्तिलिंग l अलख निरंजन ह्दयी विराजे ll

ll श्री गुरुदेव दत्त ll
--------------------------------------------------------------

ll स्वामी काव्य ll --- ४

दिनदयाळा जीवक्षेत्रपाळा l कृपावंती या आत्मसकाळा ll
लाजे दुरुनी नेती नेती ही l स्वामी कवनें गुंफीली प्रीती ही ll


कधी न अस्तले सुर्यचंद्र हे l जाणावा अर्थ अस्ताचा ll
मानव मुर्खमाती प्रेमी l सकाळ समजे भ्रमणाचा ll


पळवाटाची कला ही न्यारी l पिंड झाकला देहसुखे ll
जीवगती तु कधी न वदसी l नकला करता मुर्खदिसे ll


का रे अंगी नकलांचा होसी l आडाणी तवमती कादर्शवसी ll
अज्ञानाचे मुळ न पाहता l जन नकला का करीतो वाहता ll


शोधजरा हा आत्मनिरंतरी l वेळ मातीची वाळु सरकती ll
सत् जन संगत सदा धरावी l मुर्खकारणें मती सोडावी ll


देहवासने जीवन निष्फल l जन्म होणार वासनेंसंगै ll
जन्म मृत्यु हा अटळ फेरा l सत्वकारणे व्हा भवभंगै ll


आत्मकाव्य हो गात रहावे l आत्मबळ हेची स्वामीबळ ll
मीपणा मीहा नित्य सोडावा l भजने गातता शिव बनवावा ll


टिळा कपाळी भस्म देहासी l परी न झिजला आत्मकारणे ll
देखावा हा व्यर्थ हो अंतरी l परमार्थ कैसा तो अनुभवने ll


देहवृत्तीही वार हो सहती l संसाराचै भववार भोगती ll
जन्ममृत्युवर वार जे करती l धन्य होय त्या भावशिरी ll


सुवर्णदेह होये हा मातीचा l नामस्मरावे अर्थयुक्तता ll
भवसागर तरणोप उपाय l स्वामीसखा हा करीसहाय ll


सोहं हंसा करीते अर्पण l स्थिरावुनीया मन ll
दत्तात्रेया सद्गुरुवर्या l भावार्थे होय करुणं ll


हंसात्मक हा श्वास चालसे l देही कल्पना ही येत नसे ll
जीवन व्यस्थता गात हींडती l अंतकाळी यमसाद मिळे ll


देहबुध्दीची हंसः शक्ती l प्राणशक्ती जन देह चालवी ll
सोड अज्ञानें भवआकरणें l अंतर्मुख होत आत्मगती ll


भावपालटी आत्मदहने l हंसा होये सोहं बीजे ll
वाल्या बनती वाल्मीकी l जगती जन उद्धरती ll


माळ फिरली जग हिंडले l मनचा फेरा फिरत नसे ll
मन फिरवी आधी सद्गुरुचरणी l धन्य माळही हीत दिसे ll


गळ्यात माळ ही देखाव्याची l अंगठीत भवितव्य दिसे ll
मनगटातली ताकद संपता l भविष्य रत्ने शोधी फिरे ll


रत्नची श्रेष्ठ आत्मरत्न l का रे भुलला स्वयासमत्व ll
विष पाहता विषय दिसे l जोडी स्वये हे आत्मसत्व ll


पितरांच्या या कर्मठ गाठी l दारीद्र्य येसी भवपाशासी ll
जाण स्वये तवकृत्य महान l मुक्तकारणें होय विद्वान ll


पितरंसेवा हीच पालकहेवा l सदा करावी आदरदेवा ll
मातापितांचे ताडन करीसी l मृत्यूअंती रे दुःख भोगिसी ll


स्वर्गसुखाची भेट या जगती l  मातापिता हो जीवनीसंगती ll
तयाचरणे हे स्वर्गही लोळती l सुखाभिलाशा पुण्यही संचती ll


स्वामीमयलक्ष्मी घरात नांदती l चैतन्यजीवन गृहासी सजवी ll
ऐश्वर्यलक्ष्मी खेचुन आणती l गृहलक्ष्मीची तव वर्णवु किर्तीती ll


सुर्योदय सुर्यास्ती फेरा l भ्रमिष्टजीवन मुर्खांचा घेरा ll
होय संगती अष्टलक्ष्मीसी l अधी भजावा नारायणासी ll


नित्य भजावे दत्तचरणरज l आत्महीत स्वामीहीत पहावे ll
मुर्खकारणे मन न गमवता l कैलासपती ऐकांती भजावे ll


जगीसर्व व्यर्थची असती l स्वामींहाती विश्वसांभळती ll
सोडा भवपाश होय अंतती l शिरीधरावे श्रीचरणे सद्गती ll


जीवनधन्य या चैतन्यमती ll सोडुनी द्यावी भवकिर्ती ll
मोह त्यागावा स्वनावें ll जीवन कटुता हो सत् नामे ll


आत्मप्रभाती स्वातंत्र्याची l भवपाशाचे वेड हो सुटती ll
मंगलमयता स्वामीमयता l तवदिन रात हो कैची असे ll


स्वातंत्र्याची अर्थयुक्तया l पिंजऱ्यातुनी हो पक्षी उडे ll
गगनी झेप घ्यावी जाणता l मुक्ती स्थिती हो साधतसे ll


सामाजिकता मर्यादेची l आत्मावलोकन अनंत असे ll
आदी अनादी आत्म्याचे l गा आध्यात्मिक जीवनगीते ll


तत्वस्वरुपण तत्वनिरुपण l तत्वकारणे राष्ट्र उभरती ll
आत्मतत्वाची अतिगहनता l राष्ट्ररक्षा तव आत्मने होती ll


श्रावणसंगता श्रावणबनता l सात्विकतेचे धडे गिरवा ll
चंचल मन हे सत्वतत्वता l आत्मगतीच्या आधीन करा ll


घनश्यामची घनमन एकता l सदा स्मरावे नामची गुप्तता ll
बीजाचे होय वृक्ष विशाल l स्वामीवृक्षाची घडे पंचअंगता ll


आत्मबोधाची जन्मसुगमता l दासबोध हा अधी समजावा ll
श्रीमत् परमात्माचे रुपण l दास विसावे ह्दयी अत्रिनंदन ll


आत्मतत्वता आत्मनिरुपण l आत्मप्राप्ती हीच स्वामीप्राप्ती ll
आत्म ची शोधन आत्मनिग्रही l तुटती उपाधी आत्मसंग्रही ll


आत्म ज्ञान हे अतिदुर्लभ l रहस्यांचे महा रहस्य जाणा ll
आत्मभान येई शुध्द आचरता l साधन सत्व होय आचरणा ll


मातीदेह नामची तपता l सुवर्ण होये आत्मविलोकीता ll
सुवर्णकाळ जीवे तो जाणावा l आत्मज्ञान तिथे साचावा ll


आत्मज्ञान दुध वाघीणिचे l स्वर्णपात्रे साचाया लागती ll
पात्र सत् पात्रे तव आचरीता l आत्मज्ञानता येते पचनी ll


जीवनगमत्या होये निष्ठुरता l आत्मतत्व हे सदा जपावे ll
नाम उपासने त्रिकालकाळी l स्वामींचरण ऐकांती भजावे ll


दिनदयाळु मनाचामवाळु l स्नेहाळु कृपाळु नित्यजीवाळु ll
स्वामी भजाळु दिननिवाळु l वंदाळु कवळु शिवक्षेत्रपाळु ll


भक्तकृपाळु श्रीकृष्णासी l लोणी आवडे फार बहु ll
लोणी लोणी काय ओरडता l सत्य नअकले अज्ञाने तव ll


जीवजन्मती मनुष्ययोने l प्रारब्धाचे वाचती पाढे ll
प्रथम चरणे क्षीर असे ते l विषयविलाप मनना वाढे ll


जीवन सरता जाता जाता l तारुण्य येई तव शिरसी ll
देह नासता क्षीर नासती l दही विभागे निरंतरी ll


देहसुखाने शरीरे अंबता l विचारासी तव खेद दिसे ll
खेद खंडता अखंडबघता l शिवजीवता एक ईथे ll


स्वामीशिरी हो धरता भजता l दही फेटता ह्दयगिरी ll
लोणी तरंगे आत्मभानता l केशव आवडे भक्त निधी ll


भगवंताची लोणी महान l आत्म आचरणे लेण असती ll
लोणीधरी तो मुरलीमनोहर l आत्मसमर्पण जीव आचरती ll


दीपपुजने अर्थयुक्तता l दीपदीपाचे महत्त्वेगहनता ll
परमप्रकाशे नभपांघरता l नित्यदिसे ही स्वामीमयता ll


लोणीचे कथानक मनोहर l तव विस्तारता दिपंत येई ll
भक्ति निरुपणे साधक होता l आत्मधन्यता क्षणांत देई ll


तुप तिळाचे दीप गोडवे l प्रज्वलित होये नित्यत्रिकाळ ll
घरात सौख्य चैतन्यतेचे l जीवनगृहीता सदा हो नांदे आनंदकाळ ll


भगवंतलीला दीपे विस्तरली l अंतरी लोणी तपुन निघाली ll
तपता तपता घृत अवस्था l तेजोमय अंतरी न्हाऊन निघाली ll


घृताची देणगी ज्योर्तिमयता l जीवशिव हो साध्य झालें ll
सर्वश्रेष्ठी तव घृताची दिव्यता l सहज समाधी प्राप्तविलें ll


गोघृताची भेट आगळी l अक्कलकोट स्वामी विराजले ll
तुपाचा दीवा ह्दयी प्रकाशता l अलख निरंजन नित्य जाहले ll

ll श्री गुरुदेव दत्त ll
-----------------------------------------------------------

ll शिव स्वामी काव्य ll ----- ५

स्वामी स्मरावे प्रभातकाळी l त्याविन जीवने स्वहीत नाही ll
स्वाः स्वाः चित्त करीत जावे l जीवनअंती मुक्तसाद घेत रहावे ll


तारक मंत्रे शुद्ध आचरणे l वटवृक्षाचे रुप विस्तरती ll
गहनताही अति जाणावी l स्वजाणते स्वआखणी करावी ll


पतिव्रत्य पालने शिवसंसारी l जीव सोडती ही भवस्वारी ll
सुवासिनीची अर्थ गहनता l सद्गुरु चरणी होय एकरुपता ll


भस्मशृंगारीले देव दिखावा l कारे ठगसी गंध कपाळा ll
भस्मधारणे असे किर्तीमने l दंभजगता का शिणवीजने ll


तुळसी तत्व हो असे महान l माळ धारणे सौभाग्याचे ll
तामस जेवण का करसी रे l माळसाक्षता तु फससी रे ll


आचरणाचे प्रश्नचिन्ह l जीवगुंतला जनही डुबवी ll
नासती तव पोपटपंछी l दुःखीपीडीतांचे शोषण करसी ll


हेळसांड होत घोर या जगती l स्वयशावर नजराही रुतती ll
अंर्तमुखता साद करावी l यशोगाथा किर्ती मौनी धरावी ll

शिवकलेची महा गहानता l बिल्व राखाचे रहस्य विशेष ll
डमरू वाजता नादे थरारी l महाकालनामे काळ थरारी ll

बिल्वपत्राचे स्वर्ण पात्रता l नाम आचरणे शुध्द होय ll
ॐ शिवाला ह्दय चिंतुनी l अनायासता दिसे हो मननी ll

बिल्व दव असो आत्मानामे l आत्मविश्वता साध्यहीते ll
बिल्व दवाची अर्थयुक्तता l शिवलीलामृत हो चित्त स्थिरे ll

आस्तिक नास्तिक जीवन वाद्ये l सदा स्मरावे शिवस्वामी आद्ये ll
टाळ मृदुंग ढोल अभंगते l गात रहा श्री स्वामी समर्थ पद्ये ll

गीत ह्दयी स्वामी गाण्यासाठी l आचरण हो स्वर्ण करा ll
बिल्व दले शिवशंखपात्रे l जीवनसरीता शिवसाध्य करा ll

पारायण हेची आत्मपरायण l बहुसाल स्मरे हो अर्थहीनता ll
परायण रटे रटताची जातो l परमार्थ अर्थहीन जगताची गातो ll

कृपाधन हो स्वामी जगती l स्वामीजगत हे साध्य करा ll
काय मागता हे नव्हे उचीत l काय साधता हेची संचीत ll

स्वामींसाद हे ग्रंथ साधणै l ग्रंथ हेची माझे गुरु ll
ग्रंथ आचरणे तेची जाणणे l प्रतिसादतो तो सद्गुरु ll

ग्रंथे असती किर्तीमहान l ग्रंथ परायण करत रहावे ll
शब्दब्रम्हं वसे अणुरेणु दिसाता l ग्रंथाने होय आत्मंभरीता ll

ग्रंथ ग्रंथीची अतिगहनता l रहस्यांचे महारहस्य ll
ब्रम्ह ग्रंथी भेदुनी सुंदर l आत्मचारित्र्य उदयास येते ll

ग्रंथी भेदने स्वर्णाचरणे l ब्रम्हग्रंथी भेदी दुःखअपार ll
विष्णु ग्रंथी साक्षात्कारी l नर नारायण भेद भुलवी ll

ग्रंथहेची हो सद्गुरु व्हावे l जीवन मार्गज्ञान करावे ll
सदा मानसी चित्त धरावे l ग्रंथकाव्य सदा स्मरत रहावे ll

रुद्ररुपकता आत्मसतर्कता l विष्णुग्रंथी ग्रंथे भेदावी ll
रुद्रग्रंथी राहे अतिकठीन l तया भेदने शिवतत्वता यावी ll

ज्ञान साराचे सत्व महान l तीन स्तरांचे ज्ञानजगी सजती ll
कनिष्ठ राहे पुस्तकी ज्ञान l मध्यमता हे हस्तकी असती ll

सर्व श्रेष्ठ हो मस्तकी वससी l आत्मज्ञान हे भावसाचे ll
आध्यात्मरहस्ये मस्तकीभवती l ब्रम्हाण्ड द्वार होत राहे ll

स्वये भावहा श्रेष्ठ असावा l ग्रंथ की पुस्तक भेद कळावा ll
स्थुल शब्दांता मतीत जाणावा l स्वामीं जन्म ग्रंथी भजावा ll

पुस्तकी ज्ञाने वर उठावे l शब्द पकडता पचनी पडावे ll
हस्तकतेने आध्यात्म कळती l नसता भ्रम सोडुनी द्यावे ll

हस्तकज्ञाने आत्मओळखीता l जीवनशैली स्वामीमयता ll
भेद खेद हा दुर लोटतो l स्वहीते अंती आत्मसंचिततो ll

आत्मसंचये शिवनेत्र खुलती l मस्तकी ज्ञाने पावन जगती ll
भेद खेद हा दुर लोटतो l स्वहीते अंती आत्मसंचिततो ll

आत्मसंचये शिवनेत्र खुलती l मस्तकी ज्ञाने पावन जगती ll
आत्मशक्ति हीच स्वामीशक्ति l ज्ञानसरीता भावसागरे देती ll

अरुणोदय हा नवचैतन्याचा l शिवझळाळी आत्मसुखाचा ll
सात्विकता साधन साध्याची l शिवगणांचा अधिपती येती ll

शिवभोळा भंडारी l भस्मे शरीरा शृंगारी ll
अतिप्रियता बिलपत्रे l तांडवनृत्य करी विचित्रे ll

शिवसंहीता शिवरहस्ये l शिवकोषाचे ज्ञान धरा ll
जीवनअंती यमदुत छळती l पैलतीरीचा मार्ग करा ll

हर हर शंभो गंगाधराये l जीवनअंती शिवसखा ये ll
यमजाचाचा भय मानसी l शिव धरावा या भवशिरसी ll

भैरवप्रेमे भज जीवाला l होय शिवाला सांब पिनाकी ll
शिवगणांचा नित्य विजयतो l जीवशिवता भजने साधतो ll

नागकर्णभुशनै विश्वतारीले l सगुणे निर्गुणे रुप चितले ll
चिताभस्म भृकुटी झळकलें l अनाहतनादे देह कंपिले ll

आदिशेषाने पृथ्वी झेलता l तिन्ही लोकं होती आत्मवंदीता ll
महादेवाने आदिशेष सर्पिले l भवभयकारणे शिवभजने चर्चिले ll

वासुदेवाची शेषशय्या मनोहर l हरीहर रुपे ब्रम्हांड सावरती ll
शिवविष्णुची साम्य रुपकता l आदीमाता होये आत्मंभरता ll

रावणे चिंतली शिवभक्ति अपार l सर्वश्रेष्ठ शिवभक्तया जगती ll
सर्व राज्य सांडुनीया गेला l नित्य आचरणे त्यागुनी संपला ll

शिवभक्ती की स्वामीभक्ति l सदा करा निजबोध प्राप्ती ll
शिवआचरणें करुनी सन्मति l शंभु भजावा देहअंत काळी ll

शिवशक्ति हो पुरुषप्रकृति l सृष्टीकारणें हेचि असे ll
शिवतन्मयता सद्गुरु आवडे l शक्तिउल्हासे नृत्य करे ll

सद्गुरुकृपे शिव अंतरंगती l आत्मपरायणे शिवसाध्य होते ll
चरणरज स्फुरता सहजची l वासनेचे बीज भवे जाये नासती ll

जन्म मृत्युचा अजब फेरा l भवसंग योनी भटका जसे ll
शिवचरितरज गाता गाता l जीवदैन्यता देहअंती नसे ll

शिवभौतिकता मर्यादेची l मतितअर्थ सदा आत्मस्मरावा ll
कधी न लिंपे कधीन भंगे l भावगंगेचा शिव विस्तारावा ll

शिव कृपाळु कल्याणकारी l जीव भंगणे हो खेदकारी ll
शिवचरणी तव ह्दय चिंतुनी l शिवसरीता शिवसागरती ll

जीवा शिवाची जमली जोडी l तुटला प्रपंची विटली उपाधी ll
स्वामीचरणे जीवशिव गुंतुनी l शुध्द स्वरे हो सहज समाधी ll

शिवस्वरोदय अतिरहस्ये l ईडा पिंगला स्वये नाचती ll
मानवी देहे मृत्यु पिंजरे l शिवसुषुम्ने घोरकाळ नासती ll

करा करा हो शंभु निरंतरी l जीवन भिजवा आत्ममनोहरी ll
आनंदे विलक्षणे गगनी माय l तव नादें हो भव शुन्य होय ll

सांब सदाशिव गात रहावे l जगदंबाचे गुणगान करावे ll
नाथा घरचे वासुदेव सुताचे l आत्मविलोकीता ध्यान धरावे ll

महादेवाचे भक्त निराळे l शिवयोग वैराग्य स्नेहाळे ll
बं बं बं शिव बं बं भोले l परमज्ञानी परमशिव भोळे ll

शंभु सजवा उमापति हा l वज्रदाढेला काळ थरारी ll
महाविक्राळी त्रिनयनी हे l सदा धरावा त्रिशुळपाणी ll

काळगतीची दयनीयता l आवाहनावा कैलासराणा ll
भक्तालागी महानंदीता l महाआनंदे होय महादेवता ll

सहस्रकरं अतिउग्रजणु हो l शंभुस्वरे उमापती वंदने ll
दैत्य भयानक भुतेही तरती l शिवदरबारी तुटती बंधने ll

पिनाकी रुद्र पंचवक्त्रशिव l महाप्रलयता खंडप्रलयता ll
आदीनाथाये शिवसजकता l त्रिकाळी भजावे परमदेवता ll

ll श्री गुरुदेव दत्त ll
-------------------------------------------------------------

ll स्वामी काव्य ll ---- ६

अरुण उगवला प्रभात झाली l स्वामीतत्वें प्रचीती आली ll
नाग पुजानें मातीचा साचा l आदीअनादी नागआत्मसुखाचा ll


हीत स्वतःचे स्वये पहावे l नागदेवता चित्ती पुजावे ll
सुक्ष्मशरीरी असंख्य नागे l सत्यउलगडा आत्मचीलागे ll


मानवजीवन रहस्ये रचना l सदा टिकावे स्वामी वचना ll
जीवनअंती नागआकरणें l सदा स्मरा हे नामची सदना ll


नागशक्ति हो दिव्य विशेष l मानव वसतो नागसान्निध्यै ll
पुर्वजे नासता मृत्यू लोकी l आत्मरुपे नागरुपे फिरती ll


पाताळलोकी नागलोकते l नागयोनीता घोर तपस्वी ll
शंभरवर्षे जीवन तपता l अंती येई ते सिध्दता जगता ll


जसे पतिव्रता दागिना सुवासिनींचे l संत योगीजनेही स्वामीव्रता ll
अनुग्रही साधकांचे हे मंगळसुत्री l सद्गुरुचरण असे आत्मप्राप्ती ll


नादब्रम्ह हो नागब्रम्हता l अनाहत नादे शिवनागेश्वरचा ll
शिवकर्णभुशन सदा स्मरा हो l वासुकीश्वराचे भजन करा ll


भुं भुं भुजंगे नित् राखणदारे l भैरवचरणी नित्य विराजे ll
वेतोबाची शक्तिसंस्थीता l आदीशेषशिरी आत्मंभरीता ll


सुविचाराची सुगम पहाट l काव्यकिरणांचीही चाहुल ll
तत्वपरायण आत्मतत्वता l तत्वज्ञाने आचरणे सुचती ll


सकलजनांची प्रभातफेरी l स्वामीरज लागता सहज ll
वासनाबीजे जळुन जाती l तारकमंत्रे अंतरी वदती ll


सकलजनांची प्रभातफेरी l स्वामीरज लागता सहज ll
वासनाबीजे जळुन जाती l तारकमंत्रे अंतरी वदती ll


नियतीची घोर निष्ठुरता l त्यात भरली कलिची हेळता ll
चोर कापट्ये ईंन्र्दकारणे l परमार्थ अतिसुगमे नसेचिता ll


मृत्यु येती अकस्माते जीवने l पुर्व सुचना न मिळे अंतरी ll
आत्मजिव्हाळा दुर लोटता l काय अपेक्षी जीवन संपता ll


आत्मतन्मय स्वामीतन्मय l स्वामींबळाची हीच गुरुकिल्ली ll
ईतर साधने हो ज्ञानसंचयी l कायबाणेंअंगी विनातत्वकारणीं ll


उपवास घडावा अर्थयुक्तता l स्वामीसहवासाची पुर्वावस्था ll
अन्न न चिंतने भट्टी युक्तता l उपवासे करवी देहशुध्दीता ll


चारधाम यात्रेची रचना l चार दिशेला चार दैवते ll
मुक्तिधाम काळाची रचना l मानवजीवने भ्रमित असे ll


भ्रमिष्टजीवने चाखे फळेरसता l बघताबघता तारुण्यरुप ll
तरुण देह उत्साहे विखुरला l भौतिक पामरे वाहात गेला ll


माळजपाचे माहात्म्य आगळे l मनफिरवा देहमाळा फिरता ll
फिरवा फिरवी का भवफेरा l भवभंगणे नाममाळेची फिरता ll


त्रिकालसंध्या नित्यसाधावे l अनिष्टवृत्तीचे विसरण होवो ll
मन वळवावे बुध्दीचातुर्ये l पदोपदी स्वनिरिक्षण सत्कार्ये ll


राजऐश्वर्य मिळे राजयोगता l सद्गुरु भक्ता संयोग साधती ll
राजयोगची स्वअर्थजाणता l सद्गुरुकृपे अष्टांगयोग दर्शती ll


प्राथनाप्रीते श्रवणदेवासी l सद्भक्ताचे बोध संभाळी ll
ध्यानयोगीता योगीजीवने l सहजसमाधी स्वसुखकरे ll


ध्यानसरीता अमृतमंथने l गहनगती ती आत्मनिरुपणे ll
ध्यानयोग ही शक्ती अगाध l चित्तलयता त्वरीत उध्दरे ll


स्वामीधामी मनोआत्मगामी l संसार तुटता जडली समाधी ll
निधानकुंभे भरावा अथर्वे l पहा स्वामी हो शिवज्योर्तीलिंगे ll

ll श्री गुरुदेव दत्त ll

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...





GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below



Post a Comment

0 Comments