संत श्री संताजी महाराज जनगाडे Sant Shree Jangade Maharaj - Swami Samarth


तेली समाजाने दिलेला एक महान संत म्हणजे संताजी महाराज जनगाडे.


प्रत्येक समाजात ईश्वराने संताच्या रुपातच अंशात्मक अवतार घेतलेला आहे. त्यामुळे आपण असे म्हणण्याचे धाडस करु शकतो की प्रत्येक समाजाने आपल्याला एक एक संत दिला आहे.

तसाच तेली समाजाने दिलेला एक महान संत म्हणजे संताजी महाराज जनगाडे. त्यांनी आध्यात्मिक सुरवात संत तुकाराम महाराजांचे टाळकरी म्हणुन केली. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे संत तुकारा महाराजांच्या अभंगांचा संग्रह करुन ठेवला त्यांचे अभंग जनगाडे कुटुंबियांनी आपल्या वह्यांमधे लिहुन ठेवलेले आहेत. त्याच वहीत ते मुळचे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चाकण ह्या गावचे असल्याचा उल्लेख सापडतो आणि म्हणूनच त्यांना 'चाकणकर' असे देखील संबोधले जाते. ते संत तुकाराम महाराजांचे शिष्य असुन तुकोबांचे निर्वाण समयी संंताजी जनगाडे उपस्थित असल्याचे तुकोबांचे पणतू सांगतात.

म्हणूनच संताजींच्या परीवारातील लोकांनी जो तुकोबांच्या अंभागाचा संग्रह केला आहे तो सर्वात जुना मानला जातो. संत जनगाडे महाराजांचे सर्व अभंग 'संतु' म्हणे या नाम मुद्रेने उल्लेखीत आहेत. तसेच ते जीवनुक्तीचा आनंद लुटत असत असे त्यांच्याच अभंगातून सूचीत होते.

जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता l काय तुज सांगू वर्म ll
किंचित जो अर्थ जरी भरे मना l मग त्याचा ज्ञाना पार काय ll

यमाच्या घरची चाचणी चुकली l मूळ भेदी खोली उंच पहा ll

संतु म्हणे मी तो देहिंच पाहिले l पुढील चुकविले गर्भवास ll

अशा या संताने इ.स. १७०८ मध्ये देहूजवळ भंडारा डोंगराजवळ ( पायथ्याशी ) असलेल्या सुदुंबरे या गावी समाधी घेतली.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...





Post a Comment

0 Comments