संत श्री उपासनी महाराजवयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी बरेच दिवस अन्नपाण्याशिवाय एका कपारीत राहुन त्यांनी तपश्चर्या केली.परमेश्वराला या भुतलावर काही क्रांती घडवायची असेल तर तो स्वतः कुठल्या ना कुठल्या रुपात येऊन करतो, असे आपल्याला वाटते. अनादी काळापासुन हे सुरुच आहे. श्री उपासनी महाराज म्हणजे परमेश्वराचे असेच अवतारी पुरुष आहे. आठव्या ते नवव्या वर्षीच त्यांचे देहभान नष्ट झाले. " हा देह मी नसुन, अंतरात्मा म्हणजेच खरी ओळख " अशा भावनेत जो जगत असेल तरच सुख दुःखापासुन अलिप्त राहता येतं.

उपासनी महाराजांचा जन्म नाशिज जिल्ह्याजवळ सटाणा येथे झाला. शालेय शिक्षण मात्र त्यांना घेता आले नाही. वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी बरेच दिवस अन्नपाण्याशिवाय एका कपारीत राहुन त्यांनी तपश्चर्या केली. त्यांना कोणाचेही व्यक्तीगत मार्गदर्शन लाभले नाही. पण त्यांनी आध्यात्मिक मार्गावर ठामपणे राहाण्याचे प्रयत्न सोडले नाही. त्यानंतर ते साईबाबांकडे गेले. श्री साईबाबांनी येन केन प्रकारे त्यांची परीक्षा घेऊन त्यांना शिष्यत्व बहाल केले. 
देह म्हणजे मी नव्हे ही जाणीव पक्की रुजल्यावर अनायासे दिगंबर वेशातच राहात असत.

शीलवान, चारित्र्यवान व ब्रम्हचर्य पाळणार्या स्रिया असतील तर त्यादेखील यज्ञकर्म करु शकतात असे त्यांचे विचार होते. त्याचप्रमाणे त्यांनी वेदात पारंगतही केले. साकोरी येथील आश्रमालाच समाधी आश्रम मानतात.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments