प्रत्याहार म्हणजे कशाचाही मोह न पडता निर्लेप असणे, शब्द-स्पर्श-रुप-रस-गंधांच्या संवेदनांनी मोहरा आत वळवणे. प्रत्याहार हेच आपल्या योगप्रवासाचे रहस्य असे महाराज म्हणत.
आजच्या आधुनिक आणि प्रगत विज्ञानयुगातील महापुरुष, सिध्दयोगी असलेले श्री गहिती गगन गजाधिपती स्वामी गगनगिरी महाराज हे स्वतः नाथपंथीय होते. महाराजांनी अविरत योगसाधना व संन्यस्त जीवनाचे लक्षावधी भक्त साधकांच्या जीवनात जे चैतन्य निर्माण केले आहे, ते मात्र चिरंतन आहे.
महाराजांचे १०२ वर्षांचे जीवन म्हणजे साधक किती अनासक्त होऊ शकतो, किती कठोर तप आचरु शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण ! खरेतर महाराज सातारा जिल्ह्यातील पाटणच्या पाटणकर या राजघराण्यात जन्मलेले. चालुक्य या प्राचीन राजघराण्याशी नाते सांगणारे हे घराणे. अशी परंपरा असताना श्रीपाद अवघा सात वर्षांचा असताना त्याला बत्तीस शिराळा इथल्या नाथ संप्रदायाच्या मठाचे आकर्षण वाटू लागले.
नाथ संप्रदाय हा हटयोग आचरणारा संप्रदाय. ही योगसाधना करावयाची ती निसर्गाच्या सान्निध्यात. गरजा कमीत कमी करुन. संसारी माणसांना किंचितही क्लेष न देता. या विश्वाचे जे आदिकारण असेल त्यांच्याशी एकरुप होण्यासाठी हटयोगी आपापला मार्ग गुरुपदेशाने पण एकट्याने निवडतात. श्रीपादांनी असेच केले. हिमालयाच्या पर्वतरांगा, निबिड अरण्यातल्या रानगुंफा, गंगा - ब्रम्हापुत्रेचे तीर अशा ठिकाणी त्यांनी वर्षानुवर्षे साधना केली. ऐंशी वर्षापूर्वी असे जीवन किती कठीण असेल, याची आज कल्पना येणार नाही. याच भटकंतीत महाराजांना कोल्हापूर संस्थानचे छत्रपती महाराज भेटले. त्यांच्या आग्रहाने ते कोल्हापुरात आले.
राजे एकदा शिकारीसाठी दाजीपूरच्या जंगलात गेले असता त्यांच्या समवेत महाराजही होते. तिथला निसर्ग पाहून त्यांचे मन हरखले आणि १९३२ ते ४० अशी आठ वर्षे त्यांनी तिथेच साधना केली. खोपोली व गगनगड इथले महाराजांचे आश्रम म्हणजे निखळ परमार्थाची पंढरी होती. महाराजांनी ना कधी अंधश्रध्दांना थारा दिला, ना कधी भक्तांना शब्दप्रमाण्यांची कुंपणे घातली. पातंजल योगविद्येत यम-नियम-आसन-प्राणायम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी असे आठ टप्पे आहेत. त्यातल्या प्रत्याहाराला महाराज फार महत्त्व देत.
प्रत्याहार म्हणजे कशाचाही मोह न पडता निर्लेप असणे, शब्द-स्पर्श-रुप-रस-गंधांच्या संवेदनांनी मोहरा आत वळवणे. प्रत्याहार हेच आपल्या योगप्रवासाचे रहस्य असे महाराज म्हणत. या 'प्रत्याहारा'चा संसारी माणसांनी कसा अवलंब करावा या प्रश्नावर ते सांगत, 'स्वच्छतेने गरजा कमी करत जाणे, हेच संसारातल्या खर्या सुखाचे मर्म आहे'. आज भोग व उपभोगांची परमावधी हेच सार्या जगाचे सुख अशी घातक समजूत विळखा घालत असताना गगनगिरी महाराजांनी आपल्या जीवनातून घातलेला आदर्श दीपस्तंभासारखा सर्वांनी समोर ठेवायला हवा.
प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांचे अवघे जीवनच मुळी लोकोध्दारासाठी वाहिलेले होते. आजही त्यांनी आपला देह सोडल्यानंतरही हे कार्य अव्याहतपणे ते आपल्या सेवाभावी भक्तांकरवी करवून घेत आहेत. आजही असंख्य भक्तांना त्यांच्या या चिरस्थानी परब्रम्ह स्वरुप, ब्रम्हांडव्यापी, अस्तित्वाचा अनुभव येतो आहे. पूर्वी सदेह रुपामध्ये जसे त्यांचे मार्गदर्शन मिळत असे, तसेच आजही अखंडपणे, त्या कृपामृताचा अखंड वर्षाव होतो आहे.

ह्या
पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !