संस्कृत श्लोक रहस्य आणि निरुपण


ब्रम्ह भावना

अस्थूलमित्येतदसन्निरस्य सिद्धं स्वतो व्योमवदप्रतर्क्यम् l

अतो मृषामात्रमिदं प्रतितं जहीहि यत्स्वात्मया गृहीतम् l
ब्रम्हाहमित्येव विशुद्धबुद्ध्या विद्धि स्वमात्मानमखण्डबोधम् ll १

अन्वयार्थ -


अस्थूलं इति एतत् असत् ( तत् ) निरस्य - " हे स्थूल नव्हे " वाक्याच्या संदर्भात अनात्म वस्तुंचा त्याग करुन, व्योमवत् अप्रतर्क्यम् ब्रम्ह स्वतः सिद्धम् - तर्काच्या पलिकडे असलेले ब्रम्ह आकाशाप्रमाणे जे चिकटलेले नसते आणि जे आत्मतत्व म्हणुन स्वतः सिद्ध राहाते. अत् यत् इदं प्रतीतं - म्हणून प्रतीतीस येणारे हे, मृषमात्रं स्वात्मया च गृहीतं तत् तहीहि - आणि जे तुझेच आत्मतत्व आहे असे मानतोस त्या देहाचा त्याग कऱ. ब्रम्हाहं इति एव विशुद्धबुद्ध्या - ' मीच ब्रम्ह आहे असा शुद्ध चित्ताने विचार करुन, स्वम् आत्मानम् अखण्डबोधम् विद्धि - त्याच स्वतःला अखण्ड बोधस्वरुप म्हणून जाण.


भावार्थ -


जेव्हा उपनिषद्कालीन ऋषींना आत्म्याचे, आपल्यातील दिव्य सत् तत्वाचे अध्ययन करायचे असल्यास, ते उद्घोषित करतात की, " ब्रम्ह हे स्थूल नव्हे , सुक्ष्म नव्हे व दिर्घ ही नाही. जेजे आत्म्याशी संबंधित नाही त्याचा निरास केला जातो.


तुम्ही जेव्हा स्थूलच्या अतात व्हाल तेव्हाच तुम्हाला स्वयंसिद्ध आत्मा हा वर्णन न करता येण्यासारख्या अवकाशासारखा आहे अशी अनूभुती येईल. आत्मा स्वयंसिद्ध आहे. सर्व दैहीक उपकरणे स्वतःचाच खेळ असतो त्याचे स्वरुप म्हणजे आत्मस्वरुप नाही. वरवरचे आकलन न होता अखण्डस्वरुपाचे ज्ञान झाले पाहीजे. 


--------------------------------------------------------------------


मृत्कार्य सकलं घटादी सततं मृन्मात्रमेवाभित-

तद्वत्सज्जनितं सदात्मकमिदं सन्मात्रमेवाखिलम् l
यस्मान्नास्ति सतः परं किमपि तत्सत्यं स आत्मा स्वयं 
तस्मात्तत्वमसि प्रशान्तममलं ब्रम्हाद्वयं यत्परम् ll २ ll

अन्वयार्थ -


मृत्कार्य सकलं घटादी सततं मृन्मात्रमेव ( अस्ति ) - ज्या प्रमाणे घट ईत्यादी मातीपासुन बनवलेले सर्व वस्तु केवळ मातीरुपच असतात, तद्वत्सज्जनितं सदात्मकमिदं सन्मात्र एव ( अस्ति ) - ज्याप्रमाणे ते सत् रुप ब्रम्ह पासुन तयार होते ते विश्व इतर काही नाही ब्रम्हच आहे, यस्मान्नास्ति सतः परं किम सर्वम् अपि ( अस्ति ) - त्याअर्थी हे तत् रुपाने भासणारे जग ब्रम्ह वाचुन काहीच नाही, हे सर्व आत्मच असते, तस्मात्तत्वमसि प्रशान्तममलं ब्रम्हाद्वयं यत्परम् ब्रम्ह तत् त्वं असि - म्हणून प्रशांत, निर्मळ, अद्वय असे परंब्रम्ह ते तूच आहेस.


भावार्थ -मातीपासुन बनवलेले सर्व वस्तुचे मुळ स्वरूप मातीच असते. एका स्वरुपात घट तर दुसऱ्या रुपात चंबु असे अवातंर कार्य समीकरणे बदलत असतात पण मुळ स्वरुप मातीच राहाते. कार्यकारणाअंती सर्व माती पायमल्ली होते. त्याचप्रमाणे जग हे दृष्टीनिहाय स्थुल जरी असले तरी मुळ रुप सुक्ष्मच असते. कालांतराने कार्यकारण भावाअंती देहाची पायमल्ली होतेच. पण जे सुक्ष्म आहे ते शाश्वत प्रशांत अद्वय आणि स्वयं परंब्रम्ह आहे हे ओळख...! 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


Post a Comment

0 Comments