श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: संत श्री आनंदनाथ महाराज SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

संत श्री आनंदनाथ महाराजस्वामींनी घशातुन पादुका काढल्या त्या आनंदनाथांच्या ओंजळीत पडल्या.श्री स्वामी समर्थांची प्रचिती असलेले आनंदमय महाराज स्वामींच्या खास मर्जीतले होते. आनंदनाथ महाराज म्हणजे गुरुदास वालावकर. लहानपणापासून हे भक्तीमार्गात होते. पुढे स्वामींचे सेवक झाले. त्यांनी अक्कलकोटला सहा वर्षे महाराजांची सेवा केली.

महाराज एकदा स्वतः खाकरले व आनंदनाथांना ओंजळ करायला लावली. स्वामींनी घशातुन पादुका काढल्या त्या आनंदनाथांच्या ओंजळीत पडल्या. स्वामींनी आनंदनाथांना त्या पादुकांची स्थापना करायला सांगितले ते गाव म्हणजेच सावरगाव. शिर्डी कोपरगावहुन मनमाडकडे जातो त्या रस्त्यावर आहे. येवल्यापासुन ३ ते ४ कि.मी. वरा आहे. पादुका स्थापन झाल्यावर तेथे एक मठ तयार झाला. हे अतिशय जागृत स्थान आहे. आनंदनाथ भाक्तवर्गात तन्मयतेने सेवा देत राहायचे. त्यामुळे लोकांचा ओघ तिकडे वाढू लागला. लोकांना तेथे प्रचिती येऊ लागली. यामठाची स्थापना जवळजवळ १२५ वर्षापुर्वी झाली.


श्री आनंदनाथ महाराजांच्या रचना वाचताना करुणाभक्तीचा सागर उचंबळून येतो. मन अंतर्मुख होते. श्री आनंदनाथांंनी पाच हजारांवरती अभंगरचना, अनेक दिव्य स्तोत्रे, अष्टके, भजनानंद लहरी, आत्मबोध, गीता अशा अनेक दिव्य प्रासादिक रचना श्री स्वामी कृपेने निर्माण करुन श्रींचे देवदेवेश्वर स्वरूप दाखवले.


श्री स्वामीं कृपेने पुर्णब्रम्हाच्या अखंड सहवासासाठी सद्गुरु श्री आनंदनाथ श्री क्षेत्र वेंगुर्ला येथे १९०३ साली संजीवन समाधीस्त झाले.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती