श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: संत श्री गणोरे महाराज SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

संत श्री गणोरे महाराज'ॐ हा गुरु' हा ग्रंथ लिहुन अज्ञ.जनांस व परमार्थात गती ऋसलेल्या लोकांस आईच्या मायेने बोट धरुन मार्ग दाखवला. परमार्थ ज्ञान म्हणजे स्वरुप बोध होऊन मुक्ती मिळणे सहज शक्य आहे हे पटवून दिले.

'ॐ हा गुरु' या ग्रंथात त्यांनी परमार्थाक वाटचाल सोपी करुन सांगितली आहे.
              श्रीराम रामचंद्र गणोरे महाराजशाहे नामदेव शिंपी समाजात दिनांक १९/१२/१९१८ रोजी जन्मले. नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मग्रामी भगूर येथे त्यांचा अतिशय गरीब कुटूंबात जन्म झाला. त्यांनी कसे बसे चौथी पर्यत शिक्षण प्राप्त केले. वडील रामचंद्र व आई जानकीबाई दोघेही सत्प्रवृत्ती व संतसहवासप्रिय होते. महाराजांसह आठ भावंड त्यात गरिबी. पण तरीही त्यांनी सत्संग, निजध्यास, नाम सोडले नाही. त्याचेच बाळकडु महाराजांना मिळाले. त्यामुळे प्रतिकुल परीस्थीतीवर मात करुन सर्वसामान्यःसारखे न राहता 'प्रेमनिधी संत श्री गणोरेबाबा' झाले.

                 त्यांनी ईगतपुरी नाशिक तालुक्यात सेवादल शेतकरी संघटनेत काम केले. नाना पाटलांच्या क्रांतीदलातही त्यांनी राष्टकार्य केले. संघटनेत त्याग भावनेने कार्य केले म्हणुन 'त्यागी गणोरे' म्हणून बहुमान मिळाला. १५ आँगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते निवृत्त झाले व आपले मशीन काढण्यासाठी पुण्याला आहे. नंतर शिवणमशीन घेऊन कर्वे रोडवर आयुर्वेदरस शाळेसमोर कचरेवाडी दीडखणी जागेत दुकान व वरती पोटमाळ्यावर संसार मांडला. ऐकीकडे पोटासाठी शिवणकामाचा दिवसभर व्याप करायचा व रात्री परमार्थाचे शिखर गाठण्यासाठी साधना, नाम, ध्यान, चिंतन, मनन ह्यासाठी काळ व्यतीत करी.

                  सत्संग, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध तुकाराम महाराजांची गाथा ई. धर्मग्रंथांचे मनन करुन हा मार्ग चालावयास पाहीजे, ह्याच तळमळीने त्यांनी मठाची स्थापना केली.

                   सन १९५६ मध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराजांकडुन स्वप्नात मंत्र मिळाला. तो नामजप सतत बारा वर्षे केला व त्यांचे अनुग्रही बनले. स्वामी नित्यानंद महाराजांकडुन 'हरि' नामाचा मंत्र मिवळुन तो बारा हजार याप्रमाणे २ वर्षे ( १९५६-५८ ) केला.

                  या व्यतिरिक्त अनेक संतांच्या गाठीभेटी घेऊन त्याच्याकडून आशीर्वाद मिळवले. उदा, स्वामि आमलानंद, मेहेर बाबा, साधू वासवानी वगैरे.

                  ॐ हा गुरु' हा ग्रंथ लिहुन अज्ञ.जनांस व परमार्थात गती ऋसलेल्या लोकांस आईच्या मायेने बोट धरुन मार्ग दाखवला. परमार्थ ज्ञान म्हणजे स्वरुप बोध होऊन मुक्ती मिळणे सहज शक्य आहे हे पटवून दिले.

                 'ॐ हा गुरु' या ग्रंथात त्यांनी परमार्थाक वाटचाल सोपी करुन सांगितली आहे, त्यात आपण काय करायला हवं आणि काय नको हे स्पष्ट केलं. पथ्यपाणी व सावधानता विशद केली. आपल्या गुण दोषांचे सोप्या मार्गाने विवरण केले.

                  महाराजांना उत्तम आयुर्वेदीय व शारीरिक ज्ञान होते. ते सहसा कधी आजारी पडत नसत. बाबा श्वासावरुन कोण माणुस काय हेतुने आला आहे हे ओळखत व त्याप्रमाणे त्यांच्याशी वागत असे. क्लिष्ट विषयही आतिशय सोप्या पद्धतीने उलगडुन सांगण्याची कला त्यांनी साधली होती. ह्यांची समाधी पुणे येथे मु. पो. भुकूम येथे आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती