कबीर गुरुसाहेब दोहा...भाग १
कामी कबहूँ न गुरु भजै, मिटै न सांसै सूल।
और गुनह सब बख्शिहैं, कामी डाल न भूल।।
अर्थ :-
कामाचे वशीभूत व्यक्ति जी सांसारिक मोहमायेमध्ये लिप्त् आहे, ती कधीही सदगुरु महाराजांचे स्मरण करीत नाही. कारण सदानकदा अशा व्यक्तिचे मन कामविकारांनी भरलेले असते. अशा कामविकारांची पुर्तता कशी होईलॽ हयाच विवंचनेमध्ये तो असतो. त्यायोगे त्याचे मनामध्ये संदेह आणि संभ्रमाचा शुल निर्माण झालेला असतो. म्हणुनच अशा व्यक्तिचे मन सदैव अशांत असते.तो सदगुरु महाराजांचे नामस्मरण करु शकत नाही. हया दोहयामध्ये कामवासनेबाबत अधिक विश्लेषण करताना संत कबीरदासजी म्हणतात सर्व अपराध क्षमायोग्य् आहेत. पण कामवासनेचा अपराध अक्षम्य् आहे. त्याला कुठेही माफी नाही. कारण त्यामुळेच तो गुरुस्मरणापासुन वंचित राहतो. पर्यायाने त्याचे आत्म्यास गती मिळण्याचे सर्व मार्ग तो आपल्याच हाताने बंद करुन, आपल्याच विणलेल्या कोषामध्ये तो गुरफटुन काळाचे मुखी भक्ष्य् बनतो.
सबब हया दोहयामध्ये कामवासना अनैतिक मार्गाने शमविण्यासाठी प्रयत्नशील असणा-या कामी मनुष्याचे भौतिक आणि अध्यात्मिक अशा दोनही मार्गाने कशाप्रकारे अध:पतन होते हे अत्यंत मार्मिकपणे सांगितले आहे. पण संतांचे विचार तेव्हाही समाजाने गांभीर्याने घेतले नाहीत. आणि आजही अशा प्रकारचे प्रबोधन कुणी करीत असेल तर अशा व्यक्तिचे आसपासही आपण फिरकत नाही. कारण आधुनिकतेमुळेआपले राहणीमान दिवसेंदिवस उंचावत आहे. पण वैचारिक पातळीने निती आणि अनितीचे बंधन झुगारले आहे. ही बाब निकोप आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी घातक आहे.
------------------------------------------------------
धरती फाटै मेघ मिलै, कपडा फाटै डौर।
तन फाटै को औषधि , मन फाटै नहिं ठौर।।
अर्थ :-
तळपत्या उन्हामुळे जमीनीला भेगा पडतात. सदरच्या भेगा ढगांव्दारे पर्जन्य वृ्ष्टी झाल्यास भरुन जातात. कापड फाटले तर त्याची शिलाई केली असता, कापड शिवल्या जाते. एखादेवेळी जखम झाल्यावर त्यास औषधाचा लेप लावला असता, मोठ मोठे घावही ठीक होतात. पण जर माणसाचे मनच फाटले तर त्याला कुठलेही औषध परिणामकारक ठरत नाही. भोगी माण्साचे मनच मानवाला हवे तसे वाकवते. आपल्या चांगल्या आणि वाईट कृतीचे कारण माणसाचे मनच असते. चांगले काम केले तर शाबासकी मिळते. वाईट काम केले तर कुप्रसिध्दी मिळते. या दोन्ही गोष्टीमध्ये मनाची भुमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे मनाला फाटू न देता. त्याची संतांचे सदविचारांनी, उपदेशांनी, चांगली पुस्तके वाचून समजूत काढणे अत्यंत आवश्यक असते.
एकदा माणसाचे मन ऐकण्याचे स्थितीत आले की, ते अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख मन असलेल्या मनुष्याकडून अत्यंत विधायक कामे होतात. तो भौतिक जीवनात तर सरस ठरतोच ठरतो. पण अध्यात्मिक मार्गावर देखील त्याची वाटचाल स्थिप्रज्ञपणे होवू लागते. म्हणुन जीवनात मनाचे महत्व संतश्रेष्ठ् कबीर महाराजांनी वरीलप्रमाणे अधोरेखित करुन, मनाला सदविचारांचे लगाम लावण्याविषयी सुचित केले आहे.
----------------------------------------------------
कबीर माया बेसवा, दोनूं की इक जात।
आवंत को आदर करै, जात न बुझै बात।।
अर्थ :-
माया आणि वेश्या हया दोन्हीची जात एकच असल्याचे कबीर महाराजांनी हया दोहयामध्ये म्हटले आहे. ज्याप्रमाणे वेश्या आपल्या कामुक हावभावाव्दारे मनुष्याला आपल्याकडे आकर्षित करुन, त्याची ब-यापैकी आवभगत करुन, आपला कार्यभाग साध्य करुन घेते. आपला मतलब निघाल्यानंतर परत जाणा-या गिहाईकाकडे ती ढुंकूनही बघत नाही. त्याचप्रमाणे मायादेखील मनुष्य् प्राण्याला सन्मानपुर्वक आपल्या विविध मोहपाशांमध्ये बध्द् करुन टाकते. आणि त्याला अन्य् कशाचाच विचार करण्याची शक्तीच शिल्ल्क ठेवत नाही. परंतु मायेच्या हया मायाचक्रामध्ये भुली न पडणा-या सदशील मनुष्याकडे ती लक्षही देत नाही. म्हणुन मनुष्याने माया आणि वेश्या हया दोन्हींकडे दुर्लक्षच केले पाहीजे.
जो मनुष्य वेश्येच्या आणि अथवा मायेच्या पाशात फसेल त्याचे भौतिक, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक, आणि अध्यात्मिक अध:पतन पक्के आहे. एकदा का मनुष्य् पथ्भ्रष्ट् झाला की, तो निदान या जन्मी तरी पुर्ववळणावर येवू शकत नाही. जीवनाचे अंतिम ध्येय गाठावयाचे झाल्यास त्यांना भुली न पडता योगक्षेम केला पाहीजे असा त्रिकालसत्य् सल्ला हया दोहयातु संत कबीर महाराजांनी दिला आहे.
----------------------------------------------
गुरु समरथ सिर पर खड़े, कहा कमी तोहि दास।
रिद्धि सिद्धि सेवा करै, मुक्ति न छाडै पास।।
अर्थ :-
श्री समर्थ गुरुंचा सर्वशक्तिशाली हात जेव्हा दासाच्या डोक्यावर आशिर्वादरुपाने असतो, तेव्हा त्या दासास कशाचीही कमतरता रहात नाही. सर्व प्रकारची स्वर्गीय सुखे अशा दासास गुरु महाराज लिलया उपलब्ध करुन देतात. सर्व प्रकारच्या रिध्दी आणि सिध्दी अशा दासाचे सेवेस सदैव तत्पर असतात. गुरुंच्या आशिषामुळेच असा दास मुक्तिच्या समीप असतो. अशा प्रकारे गुरु महाराजांचा महिमा संत कबीर साहेबांनी हया दोहयामध्ये वर्णन केलेला आहे जो की यथार्थ आहे. पण गुरु महाराजांचे आशिर्वाद प्राप्त् होण्यासाठी तो दास तशा क्षमतेचा असला पाहीजे. तसा आशिर्वाद देण्यासाठी तो गुरु देखील त्या कसोटीवरचा पाहीजे. तरच हे साध्य् होते. नाहीतर मायेने लिप्त् असलेला गुरु शिष्याला मुक्ति तर सोडाच पण स्वर्गीय सुख प्राप्त् करुन देण्यासही अक्षम ठरतात.असा गुरु शिष्याला कोणतेही गुप्त अध्यात्मिक रहस्यज्ञान देवू शकत नाही. मृत्यूनंतर अशा गुरु आणि अशा शिष्याला कोणतीही गती प्राप्त् होवू शकत नाही हे देखील तितकेच खरे आहे. गुरु ही बिरुदावली सगुणामधील आहे. सगुणामधील गुरु जर निर्गुणापर्यंत पोचलेला असेल, तर तो शिष्याचा कायापालट करु शकेल. पण ज्या गुरुचा सगुण आणि मायाच सुटली नाही तो काय दासाला श्रेष्ठत्व प्रदान करु शकेल ?
मानवाची देहधारी गुरुंबाबत आजच्या आधुनिक युगात फसगतच होण्याची शक्यता जास्त् असल्याने, मनुष्य जन्माची दुर्मिळता जाणुन, ही संधी अशीच वाया जावू नये म्हणुन सर्व शक्तिशाली श्री सदगुरु महाराजांचे भक्तित लीन झाले पाहीजे. सदगुरु महाराज एकाचवेळी सगुणात आणि त्याचवेळी निर्गुणात आणि निर्गुणापलीकडेही असतात म्हणुन दासाचे जीवनाची सार्थकता सदगुरु महाराजाचे भक्तितुन होईल. त्यांचे आशिष एकदा कां प्राप्त् झाले की, मग सगळीकडे याहूमच आहे.
-------------------------------------------------------
परारब्ध पहिले बना, पीछे बना शरीर।
कबीर अचम्भा है यही, मन नहिं बांधे धीर।।
अर्थ :-
संत कबीर दास जी हया दोहयामधुन समस्त् मानवाला सावधान करताना म्हणतात की, मानव हा मनुष्य देह घेवून, हया जगात जन्माला तर आला. पण त्याचा देह बनण्याअगोदर त्या देहाचे प्रारब्ध म्हणजे नशीब बनले जाते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास लक्ष चौ-यांशी योनी फिरत फिरत जेव्हा पाप आणि पुण्याचा हिशोब समसमान होतो, त्यावेळी त्या आत्म्याला मानव देह प्राप्त् होतो. आत्म्याचे चैतन्य् आईच्या गर्भात वास करते आणि वासनेपोटी देह बनतो. पण हया देहास आकार मिळण्या अगोदर त्या अमर अविनाशी परमात्म शक्तिव्दारा संचित कर्मापैकी काही कर्मसमुहाचे गाठोडे त्या देहाव्दारा जन्म घेणा-या मानवाला भोगण्यासाठी दिले जाते. ते त्याचे प्रारब्ध असते. याचाच अर्थ मनुष्याने मनुष्य् जन्म् घेण्या अगोदरच त्याचे प्रारब्ध घडुन तयार झालेले असते. आणि आश्चर्याची गोष्ट् अशी की, हे सर्व त्या मनुष्याला कालांतराने ज्ञात होवूनही, तो मनावर संयम ठेवू शकत नाही. त्याचे मन नेहमीच कर्मफलाचे अनुषंगाने संदेहामध्ये असते. म्हणुनच तो देहाबरोबर आलेल्या कर्माचा निर्विकार मनाने भोग घेण्याऐवजी तो सतत दु:खामध्ये आणि कष्टामध्ये असतो.
परिणामी दुर्लभ मनुष्य् देह मिळूनही त्याला तो सत्कारणी लावता येत नाही. हा दोहा आकलनापलीकडचा आहे. पण संत कबीर महाराज त्या योग्यतेचे होते त्यामुळे त्यांनी ही आकलना पलीकडील बाब मनुष्यास समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याला बोध घ्यायचा ते गुरुंच्या आशिर्वादाने प्रारब्ध कर्म आणि संचित कर्माचे कर्मदहन करुन तरुन गेले. ज्यांनी बोध घेतला नाही. ते अजुनही काळाच्या गर्तेत आणि जन्ममरणाच्या चक्ररुपी संदेहात फसलेले आहेत. आणि दिवसेंदिवस संचित कर्माच्या गाठोडयात वाढ करुन, पर्यांयाने उत्तरोत्तर अधिक कष्टमय स्थितीत आत्म्याला नेत आहेत.

काला मुंह करूं करम का, आदर लावू आग।
लोभ बड़ाई छांड़ि के, रांचू के राग।।
अर्थ :-
हया जगातील लौकिकरुपी निरर्थक मान सन्मानाला भुली पडून, आपला आचरण करावयाचा योग्य मार्ग कधीही सोडु नये. लोभ आणि मोह हे त्याचे पुर्ततेसाठी मनुष्या कडून अनुचित कर्म करुन घेतात. त्या अनुचित कर्मामुळे मनुष्य कलंकास कारणीभुत होतो. म्हणुन अशा अनुचित कर्माचे तोंड काळे करुन, त्यायोगे मिळणारा सन्मानास आग लावली पहीजे. त्याकडे पाठ फिरविली पाहीजे. ही गोष्ट् केवळ सदगुरु महाराजांचे परम कल्याणकारी उपदेशामधुनच साध्य् होवू शकते. म्हणुन सदगुरु महाराजांचे शरणात राहून, त्यांनी दाखविलेल्या मार्गक्रमणात मनुष्याने लीन राहीले पाहीजे. तेच हिताचे आणि शाश्वत आहे असे संत कबीरजी हया दोहयामधुन मानवाला सांगतात.
---------------------------------------------------
माया छाया एक सी, बिरला जानै कोय।
भगता के पीछे फिरै, सनमुख भाजै सोय।।
अर्थ :-
प्रकृती गर्भातील धन, संपत्ती, किर्ती, विषय वासना रुपी माया आणि वृक्षाची छाया हयामधले रहस्य् केवळ एखादाच ज्ञानी मनुष्य जाणु शकतो. कारण माया जी विविध रुपाने जगात वास करुन आहे, तीच्या कोणत्याही रुपाला प्राप्त् करण्याचा प्रयत्न करणे आणि झाडाची सावली पकडण्याचा प्रयत्न् करणे हया दोन्ही गोष्टी अवघडच आहे. कारण माया आणि छाया हया कुणाच्याय पकडीमध्ये आलेल्या नाही. जो कुणी मनुष्य् त्यांना पकडण्याचा अथवा मिळविण्याचा प्रयत्न करेल तो त्यात असफलच ठरेल. हया दोहयामध्ये मायेला मिळविण्याचा प्रयत्न् करणे हे झाडाच्या छायेला मिळविण्याच्या प्रयत्नासारखे कसे फोल आहे याचे वरीलप्रमाणे विश्लेषण करुन, संत कबीर महाराजांनी हया दोहयामधुन एक मोलाचा उपदेश मानवाला केला आहे की, मायेच्या मागे धावणा-या व्यक्तिसमोर ती मृगजळाप्रमाणे राहून, दमछाक करते.आणि ती कधीच त्याला प्राप्त् होत नाही. तथापि जो तिच्यामागे न लागता आपल्यावर परमात्म्याने सोपविलेल्या कर्तव्यात रत राहून मोक्ष मार्गाचे दिशेने वाटचाल करतो, अशा निर्मोही व्यक्तिच्या ती मागे मागे निमूटपणे चालत रहाते. अशा या मोहगुणी तसेच अवगुणी मायेकडे कुणी ढुंकूनही पाहू नये. हयातच खरे सार्थक आहे. जो कुणी तिच्या नादी लागेल तो पथभ्रष्ट् होणारच. शिवाय अशा मनुष्याकडुन मोक्षाचा अधिकार देखील हिरावून घेतला जातो. शेवटी पुन्हा जनन मरणाच्या फे-यात फिरत रहाणे भाग पडते.
-----------------------------------------------------
माया काल की खानि है, धरै त्रिगुण विपरीत।
जहां जाय तहं सुख नहीं, या माया की रीत।।
अर्थ :-
माया संकटरुपी मृत्यूची अशी खाण आहे, जी आपल्या सत्व्, रज आणि तम हया त्रिगुणांनी हवे तसे विक्राळ स्वरुप धारण करते. मायेचे त्रिगुणातील हे रुप मोठे व्यापक आहे. बरेच वेळा ती माया आहे की ब्रम्ह् याबाबतही मोठा संभ्रम निर्माण होतो. पण ती जिथे जाईल तेथील सौख्य् आणि शांतीचा भंग करते. सगळीकडे अशांतता आणि व्दिधा स्थिती उत्पन्न् करते. हेच मायेचे खरे स्वरुप आहे. पण वरकरणी ती दिसायला इतकी मोहक आहे. की कुणीही तिच्या मोहात फसेल. सुरुवातीला ती आपल्या सुंदर मोहक स्वरुपाने मती कुंठीत करते. आणि मती कुंठीत झाली की मग मृत्यूचा पाश आवळते. पण मायेचे निर्गुण रुप ओळखणारी ज्ञानी व्यक्ति अशा मायारुपी मृत्यूपासुन नेहमीच दुर राहतात. आणि जो मायेपासुन दुर रहातो तो मोक्षाचा अधिकारी बनतो. इतिहासाची पाने चाळली असता मायेच्या मोहक रुपास बळी पडलेली कितीतरी नांवे समोर येतात. ज्यांची योग्यता असुनही, केवळ मायेच्या संगामुळे पथभ्रष्ट झाले. आणि इह-पर कल्याणापासुन वंचित राहीलेत.

भक्ति दुलेही गुरून की, नहिं कायर का काम।
सीस उतारे हाथ सों, ताहि मिलै निज धाम।।
अर्थ :-
सदगुरु महाराजांची भक्ती करणे अत्यंत कठीण कार्य आहे. त्यांची भक्ती करणे हे पळपुटयांचे आणि शेंबुडपुश्यांचे काम नाही. ते असे पुरुषार्थ युक्त कार्य आहे की, आपले शिश आपल्या हाताने कापून, सदगुरु महाराजांचे चरण पादुकांवर समर्पित करणारा दासच निज धामास प्राप्त् होतो.बुध्दी भ्रष्ट् असल्यावर सदगुरु महाराजांचे संधान ऐकता येत नाही. ऐकता जरी आले तरी पचवता येत नाही. कारण मतलब आणि कपट हे बुध्दी सोडत नाही. स्थुल देहबुध्दी कुठवर आसरा देईल. एक दिवस सगळं जाईल. जीवनाचा हिशोब होवून सगळे माझे माझे म्हणणारे विखुरले जाणार. ज्याने पाण्याचा हा बुडबुडा ओळखला तोच सन्मार्गी लागू शकतो. गेलेली वेळ कधी परत येत नाही. त्यातुन वेळ जरी परत आली तर योग परत येत नाही. म्हणुन दाणोलीचे सदगुरु साटम महाराजांचे शिष्य् वायंगणकर महाराज यांना श्री गणपतीने साक्षात्कार दिला की, नेहमी सदगुरुंच्या अधीन होवून रहावे. जेथे सदगुरु महाराजांची सत्ता आहे. तेथे देवादिकांचेही काहीएक चालत नाही. म्हणुन सदगुरु महाराज सर्वशक्तिमान कसे ठरतात हे जाणुन घेतले पाहीजे.
आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे. त्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव जागी राहणे याला नामस्मरण असे म्हणतात. हे नामस्मरण देहबुध्दी सोडून व्हायला पाहीजे. देह बुध्दी सोडण्याची भावना निर्माण होण्यासाठी सदगुरु महाराजांचे चरणी आपले शिश अर्पण करावे लागले तरी बेहत्त्र. कारण सदगुरु महाराजांच्या सत्ता प्रांतामध्ये प्रवेश करण्यास त्यांची मर्जी असेल तर प्रवेश आहे. अनधिकृत अतिक्रमण आणि घुसखोरांना तेथे थारा नाही. तसेच कुणीही मध्यस्थ नाही. अध्यात्मिक जीवन तर अदृश्य् आहे. ते दृश्य् फक्त सदगुरु महाराजांचे कृपेनेच होत असते. त्यांचेशिवाय पर्याय नाही. म्हणुनच कबीर महाराज म्हणतात की, आपले शिश आपल्या हाताने कापून, सदगुरु महाराजांचे चरण पादुकांवर समर्पित करणारा दासच निज धामास प्राप्त् होतो. सदगुरु महाराजांच्या प्रतापाचे संत कबीरांनी अगदी यथार्थ वर्णन केलेले आहे. मी फक्त्त त्यांचा अर्थ विशद करण्याचा केविलवाणा अपुरा प्रयत्न् केला आहे.
---------------------------------------
जाका गुरु है आंधरा, चेला खरा निरंध I
अनेधे को अन्धा मिला, पडा है काल के फंद II
भावार्थ :-
ज्या साधकाचा गुरु आंधळा म्हणजे अज्ञानी असतो, त्याचा शिष्य् ज्ञानी होणार नाही. जिथे गुरुच अज्ञानी आहे, तो शिष्याचे अज्ञान दुर करुन, त्याला आत्मज्ञानाचा बोध करुन, अध्यात्म् मार्गावर पुढील गतीला घेवून जावूच शकत नाही.म्हणुनच संत कबीर म्हणतात की, असा अज्ञानी गुरु आणि असा अज्ञानी शिष्य् हे दोघेही कालचक्रामध्ये फसुन जातात. परिणामी मोठया प्रयासाने मिळालेला मानव जन्म् व्यर्थ् गमावून बसतात.
परंतु आजच्या आधुनिक युगात गुरु ज्ञानी आहे की अज्ञानी हे ओळखणे महाकठीण आहे. कारण सगळीकडे आधुनिकता आलेली आहे. गुगलबाबाच्या जमान्यात कुणीही आपले अज्ञान सहजगत्या उघडे पडू देत नाही. आणि ते तपासण्याच्या प्रयत्नात शिष्यच् नेहमी तोंडघशी पडण्याची शक्यता जास्त् आहे. त्यामुळे गुरु ज्ञानी आहे कि अज्ञानी या लफडयात पडण्यापेक्षा सर्वशक्तिशाली सदगुरु महाराजांचे चरण कमल पादुकांशी लीन होवून, त्यांची भक्ती करणे केव्हाही श्रेयस्कर् आहे असे मला तरी वाटते.
------------------------------------------
विषय त्याग बैराग है, समता कहिये ग्यान I
सुखदायी जीव सौं, यही भक्ति परमान I
भावार्थ :
संतश्रेष्ठ् कबीर दासजी महाराज हया दोहयामधुन खरी भक्ती आणि तो करणारा भक्त् कसा असतो याची ओळख करुन देताना म्हणतात की, ज्या व्यक्तीने देहांतर्गत काम वासना, देहांतर्गत मानसिकतेत सतत उठणारे हव्यास ज्याला विषय वासना म्हणता येईल, तसेच प्रेतवासना इत्यादी स्वरुपाच्या विषयसुखांचा त्याग केलेला आहे. अशा व्यक्तीला वैराग्य् आले असे म्हणावे.
ज्याचेकडे वर्ण-धर्म-तन-मन-धन विषयक भेदभाव राहीलेला नाही. म्हणजेच ज्याचेकडे सर्वांसाठी समानता हेच तत्व् विदयमान उरले आहे. अशा व्यक्तीला खरे ज्ञान प्राप्त् झाले असे म्हणावे. तसेच सर्व जीवांबाबत जो दया व स्नेहभाव बाळगून आहे. अशा वरीलप्रमाणे वैराग्य्-समता-सर्वाभुती दया व स्नेह बाळगुन असलेली
व्यक्ती हीच खरा भक्त् असते. आणि हे सर्व गुण भक्तीमधुन निर्माण होत असल्याने, हे गुण निर्माण होणे हे परमभक्तीचे प्रमाण अथवा प्रतीके आहेत.
म्हणजे खरी भक्ती आणि तो करणारा भक्त कसा ओळखायचाॽ हे कबीर महाराजांनी
आपल्याला कितीतरी शतके अगोदर परिचित करुन दिलेले आहे. पण आज किती लोक
दोहयातुन आत्मबोध करण्याचा प्रयत्न् करतात ॽ

मूलध्यान गुरु रुप है, मूल पुजा गुरु पांव I
मूल नाम गुरु वचन है, मूल सत्य् सत भाव I
भावार्थ :
ध्यानाचे मूळ स्वरुप गुरु हेच आहेत. म्हणुन मन प्रामाणिक ठेवून, गुरुंचे ध्यान केले पाहीजे. पुजेचे मूळ स्वरुप गुरु चरणांचे पुजन हेच आहे. त्यामुळे सदैव गुरुचरणांशी लीन राहीले पाहीजे. जगामध्ये मूळ नाम हे गुरुमुखांमधुन निघालेले वचन आहे. त्यामुळे गुरुवचनांचे तंतोतंत पालन केले पाहीजे. गुरु आज्ञेचे कधीही उल्लंघन होवू देवू नये. जगातील मूळ आणि अंतिम सत्य् हे सदभाव आहे. त्यामुळे शिष्याने गुरुलाच सर्वस्व् मानुन चालले पाहीजे.गुरुप्रती संपूर्ण समर्पणाचाच भाव ठेवला पाहीजे. असे संत कबीरदासजी महाराज हया दोहयामध्ये उपदेश करतात.
सदरच्या उपदेशामधुन कबीर महाराजांनी तत्वाचे मार्गदर्शन केले आहे. तत्वाचे मानवी जीवनात अनन्य् साधारण महत्व् आहे. हया तत्वाचा अभ्यास झाल्याशिवाय अध्यात्म् मार्गावर मनुष्याची प्रगती होत नाहीच नाही. शिवाय
तो भौतिक जीवनात कायम समाधानी राहू शकत नाही. म्हणुन तत्वाचा जीवनात कधीच विसर पडू देवू नये.

मन मोटा मन पातरा, मन पानी मन लाय।
मन के जैसी ऊपजै, तैसे ही हवै जाय।।
भावार्थ -
मनरुपी भ्रमर कधी अत्यंत शक्तिशाली बनते . तर कधी ते अत्यंत सरळ मार्गाने मार्गक्रमण करते । कधी पाण्यासारखे ते शितल असते , तर कधी अग्नीसमान अत्यंत तप्त असते | अर्थात जशी ईच्छा मनामध्ये निर्माण होत असेल त्याप्रमाणे आपल्यासमोर तशी वस्तुस्थिती साकारत असते असे कबीर महाराज म्हणतात | म्हणून जीवनात जर काही चांगलं बनायचं असेल तर आधी आपले विचार बदलले पाहिजेत . जेथुन या विचारांची निर्मिती होते त्या मनावर आपला ताबा मिळविणे अत्यंत आवश्यक आहे . आपलं मन आपला प्रत्येक शब्द खरा करीत असते . पण बहिर्मन पापी किंवा पुण्यवान नसते . त्याचा ध्यास हा विषय,संस्कार आणि परिणामांची सुची बनवतात .
आपल्या सर्व समस्यांचे निर्माण आणि समाधान तुम्ही मनामध्ये कशाचा ध्यास घेत आहात त्यावर अवलंबून आहे .हा ध्यास किमान तीन वर्षे तरी कायम टिकला पाहिजे . सतत चांगला ध्यास घ्याल तर चांगले होईल . वाईटाचा ध्यास घ्याल तर तसेच समोर येईल . गाडी बंगला सुंदर स्त्रीचा ध्यास धराल ते मिळेल . शब्दाचा अर्थ अनर्थ फक्त तत्वातुन ठरवला जातो . जे दिसतंय ते खोटं आणि जे दिसत नाही ते खरं असतं . म्हणुन मनोयोगे ध्येय गाठायचे असेल तर मनाला अंतर्मुख करता आलं पाहिजे . तर मनाची शक्ती अनुभवता येईल . संत कबीरांचा हा दोहा अत्यंत रहस्यमय व व्यापक अर्थाचा आहे . तो नीट ध्यानात घेता आला पाहिजें . तरच कल्याण साधता येईल .

सहकामी दीपक दसा, सीखै तेल निवास।
कबीर हीरा सन्त जन, सहजै सदा प्रकाश।।
भावार्थ -
विषय भोगा मध्ये सदा सर्वदा लिप्त राहणा- या मनुष्याची दशा प्रकाशमान असणा- या त्या दिपकासारखी आहे , तो ज्या तेलाच्या आधाराने जळत असतो त्यालाच संपवून टाकतो आणि स्वत: देखील संपतो । कबीर दास म्हणतात कि सन्त त्या हि- यांसारखे आहेत ज्यांचा प्रकाश कधीही क्षीण होत नाही । ते आपल्या ज्ञानप्रकाशाने जिज्ञासु साधकांचे हृदय सहजपणे उज्ळुन टाकतात | एकदा का हृदयात ज्ञानप्रकाश झाला कि मग तो विषय सुखाच्या क्षुल्लक बाबींमध्ये गुंतुन रहात नाही .

मूसा डरपे काल सू, कठिन काल का जोर।
स्वर्ग भूमि पाताल में, जहां जाव तहं गोर।।
भावार्थ -
मनुष्य मायेच्या अधीन आहे . माया प्रकृतीच्या अधीन . प्रकृतीमधील प्रत्येक गोष्ट नश्वर असुन ,ती काळाच्या अधीन आहे . म्हणून महात्मा कबीर साहेब म्हणतात कि , प्रकृतीगर्भात म्हणजे सगुणामध्ये काळाचा अर्थात मृत्युचा महिमा आणि शक्ति अपरम्पार आहे . ह्या पासुन मुसा सारखे पैगंबर देखील घाबरुन त्यापासुन मुक्ती मिळावी ह्या उद्देशाने अल्लाह अर्थात खुदाची बंदगी म्हणजे दास्यता करीत होते .
स्वर्ग , पृथ्वी अथवा पाताल ह्या सगळ्याना काळ आपल्या विक्राळ पंजाने व्यापुन आहे . त्यामुळे मी नश्वर असल्याने मानवाने मनाच्या मस्तीत वेळ वाया न घालविता , जो ईश्वर आहे त्याच्या भक्तीत लीन झाले पाहिजे म्हणजे तो आपल्याला ह्या काळापासुन वाचवेल हे सत्य कबीर साहेबानी ह्या दोह्यामधुन समस्त मानव जातीला सांगितले आहे.
---------------------------------------------
आठ पहर चौसंठ घड़ी, लगी रहे अनुराग।
हिरदै पलक न बीसरें, तब सांचा बैराग।।
भावार्थ -
आठ प्रहर आणि चौसंठ घड़ी हा एका दिवसाचा कालावधी असतो . हा संपूर्ण काळ मनुष्याने सद्गुरु महाराजांच्या नामस्मरणात रहावे . उठता, बसता , चालता ,फिरता त्यांच्याच नामामध्ये लीन रहावे . अगदी डोळ्यांची पापणीची उघडझाप करण्यास जो एका निमिषाचा काळ लागतो ,त्या अल्पकाळातही सदगुरु नामाचा मनास विसर पडु देवु नये . तेव्हा कुठे वैराग्य निर्माण होईल . एकदा का वैराग्य प्राप्त झाले कि सहज समाधीचा परमानंद फार लांब नाही . असे ह्या दोह्यात कबीर महाराज सांगतात .
---------------------------------------------------
तन की जाने मन की जाने, जाने चित्त की चोरी ।
वह साहब से क्या छिपावे, जिनके हाथ में डोरी ॥
भावार्थ :
भलेही एखादी व्यक्ती आपली वाईट कर्मे जगापासुन आणि जगात रहाणा- या व्यक्तीपासुन लपवुन , धूळफेक करण्यात यशस्वी होत असेल . परंतु हे जग ज्याने बनविले ; ज्याच्या हातामध्ये सर्व जीव जंतूच्या प्राणाची दोरी आहे त्याच्यापासुन तुम्ही काय लपवणार आहात ? असा प्रश्न संत कबीरांनी ह्या दोह्यात उपस्थित केलेला आहे .
त्या सर्वव्यापी ईश्वराला तर आपल्या शरीरातलं , मनातलं, चित्तातलं, पंचमहाभूते - पंचप्राण - पंचकोष यामधलं , अणु रेणू मधलं, जीव जंतू मधलं, ग्रह नक्षत्र तारे यामधला कुठलाही भेद अज्ञात नसतो . म्हणूनच तो खरा साहेब आहे .
आपले आचरण शुद्ध ,चरित्र पारदर्शी , कृती प्रामाणिक असली म्हणजे लपवाछपवी करण्याची गरजच रहात नाही . तो सर्वज्ञ आहे हे बुद्धीवर कोरल्या गेलं म्हणजे मग त्याच्या व्यापकतेला संपूर्ण शरण जाण्याची सदबुद्धी निर्माण होते . आणि हीच सदबुद्धी आत्मबुद्धीत परिवर्तीत होते . आसक्तीभाव कमी होतो . आत्मबुद्धीची यथावकाश प्रगती झाल्यावर सदगुरूमय अंतकरण तयार होते . व ते मोक्षास कारण ठरते .ईश्वरापासुन लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करणे हा खरं तर गुन्हा आहे . ह्या गुन्हा करणा- यास जन्म मरणाच्या फेरा हेच प्रायश्चित्त आहे .
----------------------------------------------
जहाँ काम तहाँ नाम नहिं, जहाँ नाम नहिं वहाँ काम ।
दोनों कबहूँ नहिं मिले, रवि रजनी इक धाम ॥
भावार्थ :
काम वासना हा वासनाबीजाचाच एक प्रकार आहे . वासना ही मायेच्या स्वरुपात सगुणरुपात पण निर्गुणावस्थेत विचरण करते . म्हणून जीव तिच्या पुर्तीसाठी बहिर्मुखाच्या आवेशाने संभ्रमात असतो . वासना अंतर्मनात जीवाला आतुन चिकटुन असते . तिचे संप्रेरके ईंद्रिये व्यापुन रहातात . माया डोळ्यांच्या मार्गाने डोक्यात वासनेचा खडा टाकते . त्याने जे तरंग उठतात ते तरंग संप्रेरके पकडुन घेतात . ते हृदयापर्यंत पोचले कि शरीरात वासनेचा संचार होतो . मग असा मनुष्य नामस्मरण करुच शकत नाही . तो ह्या वासनेसोबतच लक्ष चौऱ्यांयशी योनी जन्म घेत राहतो . म्हणून कबीर महाराज म्हणतात कि जिथे कामवासनेचा संचार असतो तिथे नामस्मरण घडु शकत नाही . जो मनुष्य नामस्मरण करतो त्याच्या हृदयात कामवासनाच काय पण कोणतीही वासना प्रवेश करु शकत नाही .
कारण मनाला नामस्मरणाद्वारे अंतर्मुख करण्याच्या प्रयत्नात वासना बीज हातात येते . त्यायोगे वासनाबीज रुपी मायेला नामाग्नीतुन प्राणशक्तीद्वारे भस्म केले जाते .
म्हणून तर थोर संतानी म्हटले आहे कि ,
सदगुरु चरणरज लागता सहज |
वासनेचे बीज जाय जळोन |
मग राम नामे उपजे आवडी |
सुख घडोलागे निशीदिनी ||
महात्मन कबीरानी नामाला वरील कारणामूळेच सुर्याची उपमा दिली आहे . म्हणजे नामरूपी सुर्य ज्या हृदयात नसतो तेथे कामवासना ह्या रजनीरुपाचा प्रवेश होतो . ह्या काम रुपी रात्रीच्या अंधारास दुर करायचे असेल तर सदगुरुंच्या नामरुपी सुर्याचा उदय हृदयात होणे आवश्यक आहे . एकाच हृदयात नाम आणि काम हे परस्परविरोधी अभिव्यक्ती एकत्र राहुच शकत नाही . वासनेपायी भौतिक जीवनाच्या दशा आणि दिशा पार अधोगतीस जावुन असा मनुष्य अध्यात्म मार्गास कायमचा पारखा होतो . त्यामुळेच संत कबीरांनी अध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी नामस्मरण करणे मनुष्यास हितकारक असल्याचे सुचविले आहे .
---------------------------------------------------
नैना अंतर आव तू, नैन झापी तोही लेऊ ।
न में देखू और को, न तोही देखन देऊ ॥
शब्दशः अर्थ : हे माझ्या प्रिय ईश्वरा तु असाच माझ्या डोळ्या मध्ये सामावुन जा . मग मी हे डोळे घट्ट बंद करीन. त्यानंतर मी अन्य कुणालाही पाहणार नाही . आणि तुलाही अन्य कुणाला पाहु देणार नाही .
भावार्थ :
डोळे हे बाह्य सृष्टी बघण्याचे द्वार आहे . ह्या द्वारावाटेच बाह्य जगाच्या सर्व प्रतिमा हृदयामध्ये साठविल्या जातात . पण ईश्वराला बाह्यजगात कितीही शोधले तरी तो सापडत नाही . मग तो स्वदेहात शोधण्यासाठी सदगुरु महाराजांनी अंत:चक्षुचे ज्ञान करुन दिले . त्याद्वारे महत्प्रयासाने प्रयत्न केला असता तो सर्वव्यापी अमर अविनाशी हा अंत:करणातील आत्मगुहेत ज्योतिर्लिंग स्वरुपात आढळुन आला . त्याचे ते दर्शन ईतके प्रेमळ आणि मनो आल्हाददायक वाटले कि ते फक्त मीच पहात रहावे . अन्य कुणीही त्या ईश्वराला पाहु नये व ईश्वरानेही कुणालाही पाहु नये . कुणालाही ते दाखवु नये अशीच स्वार्थी मनोवस्था झाल्याचे संत कबीर म्हणतात . कारण ईश्वराची अनुभुती किंवा दर्शन ही स्वत: अनुभवण्याची गोष्ट असुन , ती कितीही दुस- याला समजावुन सांगितली तरी न समजणारी गोष्ट आहे . कारण परमात्मा परमानंद स्वरुप असुन तो कसा काय ईतराना वाटता येईल ? असा प्रश्न साहाजिकच उपस्थित झाल्याचे ह्या दोह्यात जाणवते .
-------------------------------------------------
भावार्थ...
शरीरावर भस्माचे पट्टे ओढून, नाना प्रकारच्या माळा परिधान करुन ,जटासंभार वाढवून आणि पायी खडावा घालुन, बैराग्यासारखा वेश परिधान करुन कुणीही बैरागी असल्याचा देखावा ढोंग तर निर्माण तर करु शकतो . पण ह्या देखाव्याला काहीही अर्थ नाही . वेशात वैराग्य निर्माण झाल्यापेक्षा मनात वैराग्य निर्माण झाले तरच त्याला खरा वैरागी ,जोगी किंवा योगी असे म्हणता येईल . ज्याचे मन जोगी वैरागी झाले त्यालाच अध्यात्म मार्गावर अग्रेसर होण्याचा विधी सहज प्राप्त होवुन त्याला सहज समाधीकडे वाटचाल करता येईल असे फार मोठे अध्यात्मिक गुह्य संत कबीर साहेबानी ह्या दोह्यात सांगितले आहे .
पण ईथे प्रश्न असा निर्माण होतो कि, मनात वैराग्य कसे निर्माण होईल ? ते होण्यापूर्वी मानवाला आत्मज्ञान प्राप्त होणे आवश्यक आहे . आत्मज्ञानासाठी दास्यभक्तीची पात्रता अंगी आली पाहिजे .
दास्यभक्ती + आत्मज्ञान + वैराग्य हे मनुष्याच्या धारणक्षमतेवर अवलंबून आहे . त्यासाठी देहाचे भांडे आतुन स्वच्छ, चारित्र्यपूर्ण आणि अंतर्मुख असले पाहिजे . तरच मनात सदगुरु दास्यभक्ती निर्माण होइल . त्यातुनच दत्तमहाराजांचे दिशानिर्देशनाप्रमाणे आत्म ज्ञानाअंती वैराग्य निर्माण होईल . एकदा का वैराग्य निर्माण झाले कि मग चित्त तुरिया , विरक्ती आणि शेवटी सहज समाधी प्राप्त होते . जे कि कैवल्य ह्या निजधामास घेऊन जाते . यासाठी कराव्या लागणा- या सर्व क्रिया कलापांचे सदगुरु कृपेने आपोआप ज्ञान मिळते . मग जन्म नाही कि मरणही नाही . पण वैराग्य हे प्रत्येकाच्याच मनात निर्माण होवु शकत नाही . ते निर्माण होण्यासाठी माणुस त्यासाठी आवश्यक अशा दत्तसाच्यात बसणे आवश्यक असल्यामुळे असा माणुस लाखो करोडोमधुन एखादाच असतो . असाही ईशारा देवुन कबीर महाराज ही वाटचाल सहज साध्य नसल्याचे देखील सुचित करुन जातात .
-------------------------------------------
माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मनका डार दें, मन का मनका फेर ॥
भावार्थ...
काही व्यक्ती रोज खुप जप करतात . जेव्हा पहावं तेव्हा ह्यांचा जप चालुच असतो . काही व्यक्ती तर त्यापुढे जावुन चालता - बोलता - बसता - उठता जप करतात . पण त्यांच्या मनोवृत्तीत कोणताही बदल होत नाही . सतत १५- २० वर्षे नामजप करुनही जेव्हा व्यक्तीचे अंतरंग बदलत नाही . मनाचे भ्रम आणि विकार संपत नाहीत . तेव्हा अशा व्यक्तीची परमात्म्यावरील आस्था, श्रद्धा लोप पावु नये यासाठी महात्मा कबीर अशा लोकाना मोलाचा सल्ला देतात . ते म्हणतात कि , हे मानवा तु हातातील मण्यांची माळ फेकुन दे . आणि मनाचा मणी फिरवुन बघ . मग तुझ्या मनात कमालीचा बदल होईल . ते ईश्वरी नामात आपोआप रमायला लागेल . जे मन बाहेरील जगात ईतक्या दिवस रमत होतं . त्याला आता त्या भौतिक सुखाच्या गोष्टी तुच्छ वाटुन , ते आता अंतरंगात रमायला लागेल . हळूहळू ते अंतरंगात ईश्वराला शोधायला लागेल . एकदा का मनात बदल झाला कि तुला काही एक करायची गरजच रहाणार नाही . पुढचं सगळं सदगुरु महाराज बघुन घेतील .

धीरे - धीरे रे मना, धीरे सब कुछ होय |
मालीं सिंचे सौ घडा , ऋतू आये फल होय ||
भावार्थ...
हे मानवी मना तु स्वत: वर कमालीचा संयम ठेव . कारण त्यातुनच तुला सर्व काही साध्य होणार आहे . उतावळे बावळेपणा केलास तर तुला काही साध्य तर होणार नाहीच ,मात्र जे तुझ्याजवळ आहे ते ते गमावुन दु;खाचा मात्र धनी होशील.
ज्याप्रमाणे बी लावल्यावर माळी एकदम शंभर हंडे पाणी त्याला देत नाही . आणि पाणी दिल्या दिल्या लगेच काही त्याला फळं येत नाही . तर रोज नियमितपणे पाणी देवुन ,माळी त्या बीजाचे सिंचन करतो . मग त्या बीजामधुन अंकुर येतो . अंकुराचे मग रोपट्यात रुपांतर होते . ऱोपट्याचं मग झाडात रुपांतर होते . आणि मग परिपक्व स्थिती प्राप्त झाल्यावर मौसमा मध्ये त्या झाडाला फळे लागायला सुरुवात होते . म्हणून मानवी मनाला ते संयमाचा उपदेश करतात . पण आज आपण काय करतो . आपल्याला वेळेपूर्वी आणि कमी मेहनतीत उत्तम फळ अपेक्षित असतं . विद्यार्थ्याला एका दिवसात भरपुर अभ्यास करुन हुशार होता येईल का ? विवाहित स्त्री पुरुषांना एका महिन्यात संसाराची गोडी कळेल काय ? व्यवसायात एका दिवसात व्यापार करुन नफा होईल का ? .याचं उत्तर नाहीच असं रहाणार आहे . आणि याउपरांतही घाई जर केली तर पदरात दु: खाशिवाय काहीच पडणार नाही . कारण ती नियमित क्रिया आहे . त्यात नियमितता ठेवल्यास परिपक्व स्थितीला त्या कृतीचे सकारात्मक फळ मिळणार आहे . म्हणुन संयम आवश्यकच आहे . विद्यार्थीदशेत नियमित अध्ययन करावे . मोबाईलचा विधायक वापर करावा . तरुणाईत व्यायाम करुन शरीर सौष्ठव प्राप्त करावे . लैगिक सुख भोगण्याची स्वप्ने पाहु नयेत . वैवाहिक आयुष्यात देखील पत्नीशी एकनिष्ठ रहावे . व्याभिचाराच्या नादी लागु नये . आणि म्हातारपणात देवाच्या समाजप्रबोधनाचे ध्यानी लागुन आयुष्य समाधानी ठेवावे . उगाच मुला मुलींच्या संसारात नाक खुपसत बसु नये . अगदी आवश्यक तेव्हाच पिकल्या पानाच्या अधिकाराने सल्ला दिला तर हरकत नाही . पण आपण तसं करीत नाही . त्यामुळे आयुष्यात दु: खी होवुन बसतो .
मानवाचे मन हे एक अजब रसायन आहे . ते डोळ्याने दिसत नाही . पण ते कार्य करते . आणि त्याचे परिणाम देखील आपण पाहतो . चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कृतीस ते कारण असते . चांगली कृती जर केली तर आपली किर्ती वाढते . वाईट कामं केली तर बदनामी होते . म्हणून ह्या मनाला हळूहळू चांगल्या उपदेशा आधारे विधायक कार्याकडे वळविले पाहिजे . त्याला अंतर्मुख केले पाहिजे . एका दिवसात मन आपलं काहीच ऐकणार नाही . उलट ते बंडखोरी करेल . त्याला योग्य नामस्मरण, प्रबोधना आधारे त्याची सवडीने आवडीने समजुत काढली पाहिजे . मनाचा वारुला एकदा का लगाम लावता आला कि हे जग न जिंकताही तुमचं आहे . ईश्वर सामिप्य निश्चित आहे . यात शंकाच नाही .
---------------------------------------
माया मुई न मन मुआ, मरी मरी गया सरीर|
आसा त्रिसना न मुई, यों कही गए कबीर ||
भावार्थ :
मनुष्यापासुन जगाचे खरे स्वरुप लपवुन , त्याचे भ्रामक रुपात रमविणारी माया मरत नाही . आणि त्या मायेला पोसणारं मनही मरत नाही . पण मन ज्या आधारावर तग धरुन असतं ते शरीर आता पर्यंत कितीतरी वेळा मृत झालेलं आहे. तसंच शरीराला वेळोवेळी नष्ट करण्यात निर्दयी मायेला सहाय्यभुत ठरणारी आशा आणि विषय सुखांची तहान - भुक देखील कधीच मरत नाही असं महात्मा कबीर साहेब म्हणतात.
त्यामुळेच मायेचं दमन करणारा, विषयसुख तुच्छ जाणुन आणि मनोयोगे न जाता मनाला आपल्या अंतर्मुखी योगात वळविणारा माणुस खरा माणुस आहे , ज्याला जगण्यासाठी शरीराचीही आवश्यकता नाही आणि आशेची तर मुळीच नाही . कारण मनाच्या कर्मयोग्याला यापैकी कशाचीच गरज नाही असेच तर कबीराना म्हणायचे नाही ना ? म्हणूनच हा दोहा अत्यंत गुढ आणि रहस्यमय आहे . ज्यात मनुष्याने मनुष्य होण्यासाठी काय करावे ? हे गर्भित सुचक आहे . एकदा का मनुष्य मनुष्य ह्या सामान्य पातळीवर आला कि अशा मनुष्याला परमेश्वराच्या समीप ह्याच जन्मात जाता येईल .
जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ,
मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ।
भावार्थ...
जो सतत नवनवीन शोधण्याचा ध्यास बाळगुन कार्यमग्न असतो . तो काहीतरी जगाआगळा शोध लावुन जगाला क्रांतिकारी वळण देतो . ज्याप्रमाणे पाणबुड्या मनुष्य खोल पाण्यात जावुन अथांग सागराच्या खोल गर्तेत मरणाची तमा न बाळगता शिरतो त्याच्या हाती काहीतरी निश्चितच लागतं . पण मरणाच्या भयाने काठावर बसुन रहाणारा ईसम मात्र कर्तव्यशुन्यतेपायी काळाच्या ओघात संपुन जातो .
संसारीक मनुष्य देखील संसाराच्या मोहापायी अध्यात्म मार्गावर आत्मक्रमण करण्यास सहसा धजावत नाही . अशा व्यक्ती संसारिक क्लेशापायी धड संसारही करु शकत नाही . आणि त्यापासुन अलिप्तही राहु शकत नाही .
उलट संसाराची पर्वा न करता , जो ईश्वराच्या शोधात अध्यात्मिक खोली गाठतो त्याला सदगुरुकृपे ईश्वराशी आत्मानुसंधान साधता तर येतोच , शिवाय ह्या ईश्वरी कृपेने त्याने वा- यावर सोडलेला संसारही सुखाचा होतो .
---------------------------------------------
कबीर माला काठ की , कहि समझावै तोहि |
मन न फिरावै आपणा, कहा फिरावै मोही |
भावार्थ...
हातातील जपमाळ आपल्याला वारंवार हेच शिकविण्याचा प्रयत्न करते की , हे भल्या मानसा तुझं मनच जर तुझ्याकडुन वळत नाही . तेव्हा तु मला वळविण्याचा प्रयत्न का करतोस?
ईश्वरी नामाचा जप करण्यापेक्षा मन त्या जपात किती सहभागी आहे हे बघणं महत्वाचं आहे . किती लक्ष जप केला यापेक्षा जपात किती लक्ष होते हे तर महत्वाचे आहेच . पण त्याहीपेक्षा महत्वाचे आहे कि जशी जपमाळ जपताना सदगुरु रुपी सुमेरु उल्लंघन होवु देत नाही . तसं मन आपल्याकडुन अंतर्मुखतेकडे वळते का ?
मनाला वळविता आलं म्हणजे ईश्वरी आत्मानुसंधानात ते कायम राहिल . म्हणजे केलेल्या थोड्याही जपात तप साध्य होईल. बहिर्मन पापी किंवा पुण्यवान नसतं . त्याचा ध्यास हा विषय, संस्कार आणि परिणामांची सुची बनवितात . म्हणुन मनोयोगे ध्येय गाठायचं असेल तर मनाला आंत वळविता आलं पाहिजे . नाटक करुन चालणार नाही . स्वत:ची फसवणूक केली तर नुकसान बाजुवाल्याचं होत नाही . म्हणुन मनाला अतिचतुराईने हाताळायची कला आली पाहिजे . मग जपाला अर्थ येईल .
--------------------------------------------------
आछे दिन पीछे गए, हरि से किया न हेत ।
अब पछताए होत क्या, चिड़िया चुग गयी खेत ॥
भावार्थ...
वासनेपोटी जन्म झाला... बघता बघता तरुण झाला. जीवनात बहुसाल कष्ट करुन सुख समृद्धीही आली. मग "हे ही दिवस जातील" हा नियतीचा नियम विसरला. भगवंताला न स्वीकारता कालांतराने दुःखात कोसळला. मग भगवंताची प्रकर्षाने आठवण झाली. बघताबघता ३३ कोटी देवही कमी पडू लागले. पण या सर्वांचा काय उपयोग कारण देह तर त्या वेळेस साथ सोडुन जाऊ लागला.
-----------------------------------------------------------------------------
संत कबीर गुरुसाहेब दोहा...
आग जो लगी समंद में, धुंआ न परगट होए ।
सो जाने जो जरमुआ जाकी लगी होए ॥
भावार्थ...
भगवंताने प्रत्येक मानवाला अद्भुत अशी जिज्ञासा प्रदान केली आहे. ग्रहणशक्ती आणि आत्मिक पचनक्षमतेवर आध्यात्मिक जीवन आधारित असते. नाहत नादाचा अनाहत होणे अर्थात वाल्याचा वाल्मिकी होणे म्हणजेच ' आग जो लगी समंद में'.
ब्रम्हांड गोळी ह्दयस्थ असुनही न दिसे म्हणजेच ' धुंआ न परगट होए'.
ज्यास तो आत्मानंद प्राप्र झाला त्याच वेळी त्याच्या अंतरी दैवत दर्शनाची रांग लागते म्हणजेच ' सो जाने जो जरमुआ जाकी लगी होए'.
----------------------------------------------------------------------------
संत कबीर गुरुसाहेब दोहा...
आहार करे मन भावता, इंदी किए स्वाद ।
नाक तलक पूरन भरे, तो का कहिए प्रसाद ॥
भावार्थ...
अन्नमय कोषाने जे ग्रहण कराल ते देह माध्यमाद्वारे मनापासुन स्वाद सुरु होऊन ईंद्रीयांपर्यतच जातो. आणि काही वेळेने नष्ट होतो.
यापलिकडे गुरुसाहेब सांगतात, ' मनोमय कोषाद्वारे नाम नाकाच्या शेंड्यावर ध्यान करुन ईतर सर्व कोष भरता येतात. त्यात प्राणमय कोष, ज्ञानमय कोष आणि प्रसादरूपी आनंदमय कोष येतात. हाच खरा देवाचा प्रसाद समजावा.
------------------------------------------------------------------------------
संत कबीर गुरुसाहेब दोहा...
आपा तजे हरि भजे, नख सिख तजे विकार ।
सब जीवन से निर्भैर रहे, साधू मता है सार ॥
भावार्थ...
जी व्यक्ती स्वतः अहम् भाव सोडुन भगवंताची आत्मियतेने उपासना करतो. आपल्या दोषांना सर्वस्वी त्यागुन कोणत्याही जीवाचा मत्सर, द्वेष करत नाही. अशी व्यक्ती साधू प्रवृत्ती समान आणि बुद्धीवान असते.
साधू शब्दाचा अभिप्राय ' जो अंतरीचे सहा विकार धूतो ' त्याला साधू असे संबोधतात.
-------------------------------------------------------------------------------
संत कबीर गुरुसाहेब दोहा...
आसन मारे क्या भया, मरी न मन की आस ।
तैली केरा बैल ज्यों, घर ही कोस पचास ॥
भावार्थ...
सद्गुरु ध्यान निर्देशनाशिवाय आसनावर तासऩतास जरी बसुन राहीलात तरीही मनाची चंचलता थांबणार नाही कारण सद्गुरु चरणरज सहज लागता वासनेचे बीज जळुन जाते. नामस्मरण उफाळुन येते. तिथे कसला दिवस आणि कसली रात्र....!
असे न घडल्यास... बैलबुद्धी एकाच ठिकाणी घुटमळत पडते. आणि आपल्याला फार मोठ़ काहीतरी केलं असा भास होतो. मुळात तो फक्त गोड गैरसमज असतो. स्वतःचीच संभ्रमात्मक फसवणूक बाकी काही नाही.

आसन मार गुफा में बैठे, मनवा चहु दिश जाये ।
भवसागर घट बिच बिराजे, खोजन तीरथ जाये ॥
English Meaning...
Doing chant, meditation while sitting alone, still mind get diverted in multiple directions. All 16 spiritual essentials ( mean is to integrate it) are located inside our body, that u cannot find on earth...!
भावार्थ...
रामो चित्तलयः सदा भवतु मे l भो राम मम उद्धरः ll हे त्याच वेळी साध्य ज्यावेळी सद्गुरुकृपा होते.
अन्यथा कितीही जप, तप, अनुष्ठान करा त्याचा मनःशांती पलिकडे काहीही उपयोग नाही. कस्तुरी ज्याप्रमाणे हरीणाच्या नाभीप्रदेशात असते पण सुगंध कोठुन येतो हे बघायला, हरीण अज्ञानापोटी सैरवैर धावु लागते. तशीच डोळे असुनही आंधळ्या माणसाची बिकट दयनीय अवस्था...!

आया था किस काम को, तू सोया चादर तान ।
सूरत सम्भाल ये गाफील, अपना आप पहचान ॥
English meaning ...
You have received Human body for what purpose. Because of lack of spiritual knowledge ' U have no any importance of this instrument' . wasting valuable time of limited lifespan leading to death.
Understand and control distraction of mind in fake crowd of world. Be selfdriven with infinite subconcious power.
भावार्थ...
कोणत्या कारणासाठी तुला मानवी देह मिळाला आणि मुर्ख देहबुद्धी अधीन काय पतन करुन घेतोस. खाणे पिणे आणि झोपणे या व्यतिरिक्त काय करतोस...! हे पुढे जाऊन दुर्दैवी मृत्यूलाच प्राप्त आहे.
मनाची दुर्दशा आणि त्यायोगे देहीक परीणाम समजुन घे. ह्या भ्रामक विश्वाला जाणुन घे. स्वतः आत्मस्वयंचलित होण्याचा प्रयत्न करं...!

एसी वाणी बोलिए, मन का आपा खोय ।
औरन को शीतल करे, आपहु शीतल होय ॥
English meaning...
Cope up with u r mind distraction to avoid miscommunication with others, leads to misunderstanding. Always use principal based talk with u r belongings.
It gives calmness and stability. People will appreciate u r self-respect.
भावार्थ...
शब्दातुनच विश्व, देह आणि ब्रम्हाण्डाची उत्पत्ती. शब्द वाणीच्या माध्यमातूनच व्यक्त होत असतात. वाणी मधुरभाषी हवी. मनाचा अतिरेक बाजुला करायला हवा.
तात्त्विक शब्द आचरणानें मनाला शांती मिळते आणि ईतरांनाही शांती मिळवुन द्यावी

संत कबीर गुरुसाहेब दोहा...( Sant Kabir gurusaheb dohaa... )
अकथ कहानी प्रेम की, कुछ कही न जाए ।
गूंगे केरी सरकारा, बैठे मुस्काए ॥
English meaning...
Real spiritual existence is right inside of human behavior, body and speech. Real Gratitude, love and devotion towards lotus feet of God can be seen at the bottom of our heart.
At certain stage of spirituality we remain speechless. We flow with holy blessings in continuous manner. U feel absolutely delighted 24 by 7 in presence of universal calm and happiness...!
भावार्थ...
अंतर्मुख भक्तिमय नामस्मरणयुक्त स्थिरता अतिअद्भुत असते. ज्याप्रमाणे महासागर वरुन शांत जरी दिसत असेल तरीही त्याच्या गाभ्यात मोठी उलथापालत होत असते.
अंतर्मुख साधक त्या आनंदात ईतका भारावुन गेलेला असतो की तो फक्त आनंदात मौनावस्थेत स्थित राहातो. हे बाह्य जगताला कळु शकत नाही.

संत कबीर गुरुसाहेब दोहा...( Sant kabir gurusaheb dohaa...)
आशा का ईंधन करो, मनशा करो बभूत ।
जोगी फेरी यों फिरो, तब वन आवे सूत ॥
English meaning...
Cosider your emotions as a fuel for your spiritual path. Your body as a vehical on spiritual journey. Your intelligence as a steering wheel. Your soul is a power of your engine. Once u drive with discipline, distance and destination oriented. Your mind will get neutralised. It will convert in dust. Follow principle of Yogi sadhakaas. Then only u will realise universal power and will be accepted as a Shishyaa.
भावार्थ...
तुमची भावभक्ती आध्यात्मिक मार्गावर ईंधन म्हणुन ओळखा. तुमचा देह आध्यात्मिक प्रवासातील एक वाहन आहे. तुमची बुद्धी वाहनाचे स्टेअरीग व्हील समजा. तुमची आत्मशक्ती वाहनाच्या ईंजिनाची अश्वशक्ती आहे.
ज्या क्षणी पारदर्शक वृत्तीने तुमचे आध्यात्मिक वाहन स्वामीशिस्त, स्वामींअंतर आणि स्वामींउद्देष्याला अनुसरुन चालते त्याच वेळेस तुमच्या मनाचे भस्म होण्यास सुरवात होते. अर्थात मन निर्विकार होते.
खर्या योंगीजनांचे ( चोरांचे नाही ) तत्व अनुकरण केल्यासच स्वामींसुत तत्वाची प्राप्ती आहे.
------------------------------------------------------------------------
संत कबीर गुरुसाहेब दोहा...( Sant Kabir Gurusaheb dohaa...)
अपनी कहे मेरी सुने, सुनी मिली एकै हौय ।
हमरे देखत जग जात है, ऐसा मिला न कोय ॥
English meaning...
Mind gets distracted in exact opposite directions. This opposes spiritual growth in right way. It is called as BHOG. In terms of receiving RAJYOG, sadhakaa need to integrate this mind towards lotus feet of sadguru maharaj.
This type of Yogi Purush rarely seen in spirituality. Once we find him, our life is set beyond our physical limit and death.
भावार्थ...
मनाची चंचलता अगदी विरुद्ध दिशेने होत असते. ह्याच दिशेला भोग असं म्हणतात. जीवनात राजयोग जर हवा असेल तर सद्गुरु चरणांना आत्मसमर्पण करावंच लागतं. ईतर कोणताही दुसरा पर्याय नाही. मनाला एकत्र करणे त्याच वेळी सहज समजा.
असा सद्गुरु योगी पुरुष आध्यात्मिक जीवनात अतिदुर्लभ जाणा. जर त्याचा शोध लागला ध्यास लागला तर आपला बेडापार झालाच, त्यात काही संकोच नाही...!

संत कबीर गुरुसाहेब दोहा... ( Sant Kabir gurusaheb dohaa...)
आशा करै बैकुण्ठ की, दुरमति तीनों काल ।
शुक्र कही बलि ना करीं, ताते गयो पताल ॥
English meaning...
Consistent thoughts of ' Surrender to God ' without practicals is not enough. Intelligence and practicals are easily gets implemented in Evil things.
If we cannot identify ourselves. Hell is near by us.
भावार्थ...
'भगवंताला आज राहु दे, उद्या पासुन भजु' या आशेवर आयुष्य वाळुप्रमाणे हातुन सरकत चाललं. भरकटलेल्या मतिने तीन्ही काळाचा नाश होतो.
जोपर्यंत स्वतःत अपराधीपणाची भावना जागृत होत नाही आणि प्रात्यक्षिक बदल होत नाही तो पर्यंत नरक आपल्या निकट आहे असं समजा.
------------------------------------------------------------------------------------

सुमिरन मारग सहज का,सदगुरु दिया बताई l
सांस सांस सुमिरन करु,ऐक दिन मिलसी आये ll
भावार्थ...
संत श्री कबीर साहेब आपल्या ह्या दोह्यात ईश्वर भक्तीच्या अत्यंत सोप्या मार्गाची ओळख करुन देत आहेत . ते म्हणतात कि, नामस्मरणातुन ईश्वरास स्मरण करण्याचा अत्यंत सोपा मार्ग श्री सदगुरु महाराजानी सांगितलेला आहे . तुमच्या प्रत्येक श्वास प्रश्वासाबरोबर ईश्वरी नामाचे स्मरण करा . एक दिवस ईश्वर निश्चितच भेटेल . म्हणजे नाम दिले ते सदगुरु महाराजांनी आणि ते नाम ज्यांचे आहे त्यांचेपर्यंत कसं पोचायचं हेही सदगुरु महाराजच सांगतात .
ह्या दृष्टीने खरंच श्री सदगुरु महाराजांचा महिमा अपरंपार आहे . त्यांचेशिवाय ईश्वराचा शोध घेण्याचे कामात श्वास संपुन गेले असते तरी पण ईश्वराची भेट झाली नसती . मनुष्य जन्माचे ध्येय आणि ते गाठण्यासाठी मिळालेल्या श्वास यांचा गणिती ताळमेळ बसणं सदगुरु महाराजांच्या कृपेमुळेच शक्य झाले . नाहीतर अवघड होतं .
------------------------------------------------------------------------------------------

तन कौ जोगी सब करै , मन कौ बिरला कोइ |
सब विधी सहजै पाईए , जे मन जोगी होइ || भावार्थ...

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
0 Comments