श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आरती mp3 downlod Nrusiha Saraswati Aarti




कृष्णापंचगंगासंगम निजस्थान ।
चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन ।
तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण ।
विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥

जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।
नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान ।
मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥
वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन ।
अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ जय. ॥ २ ॥

शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही ।
कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥
अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी ।
म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ जय देव. ॥ ३ ॥

दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि ।
आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥
आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं ।
निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ जय. ॥ ४ ॥

ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले ।
भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥
अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले ।
गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥ ५ ॥

अक्कलकॊट स्वामी समर्थांची आरती
जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था ।
आरती ओवाळूं चरणी ठेवुनियां माथा ॥धृ॥

छेली खेडेग्रामीं तूं अवतरलासी ।
जगदुद्धारासाठीं राया तू फिरसी ।
भक्तवत्सल खरा तूं एक होसी ।
म्हणुनि शरण आलों तुझे चरणासी ॥१॥

ञैगुणपरब्रह्म तूझा अवतार ।
त्याची काय वर्णूं लीला पामर ।
शेषादिक शिणले ।
नलगे त्या पार ।
तेथें जडमूढ कैसा करुं मी विस्तार ॥२॥

देवादीदेव तूं स्वामीराया ।
निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां ।
तुजसी अर्पण केली आपुली ही काया ।
शरणागता तारीं तूं स्वामीराया ॥३॥

अघटित लीला करूनीं जडमूढ उद्धरिले ।
कीर्ती ऐकुनि कानी चरणीं मी लोळें ।
चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें ।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळें ॥४॥

DATTAPRABODHINEE MP3 COLLECTION



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

  • श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्र पारायण 3 दिवसात कसे करावे सोबत सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step
  • दत्त उपासना, दत्त संप्रदाय ( Datt Sampraday ) व साधन, साध्य, समाधी- Read right Now
  • नामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....?- Read right Now
  • आध्यात्मिक उपासनेची सुरवात कशी करावी - Step by step
  • दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )
  • श्री स्वामी समर्थ उपासनेचा अर्थ, भावार्थ, मथितार्थ आणि सजगता

  • Post a Comment

    0 Comments