आता सोन्याच्या पावलांनी आई महालक्ष्मी येईल घरी ! हा आरती पाठ करा सोबत mp3 download करा.



जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥

करविरपुरवासिनी सुरवरमुनि-माता
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता
कमलाकरे‍ जठरी जन्मविला धाता
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री निजबीजा निगमागम सारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥

अमृत-भरिते सरिते अघदुरितें वारीं
मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं
वारी मायापटल प्रणमत परिवारी
हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥


DATTAPRABODHINEE MP3 COLLECTION





ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

  • दीपोत्सव रहस्य व जागृत साधना दिव्यदर्शन - श्री स्वामी समर्थ
  • बीज मंत्र रहस्य, अर्थ व चमत्कारिक फायदे.
  • महालक्ष्मी अष्टकम
  • धन कमवण्याचे उपाय - लक्ष्मी कवच प्रयोग
  • देवी अथर्वशीर्ष ( Shree Devi Atharvashirsa ) उपनिषद् माहात्म्य व नवार्ण मंत्र साधना
  • भगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १



  • Post a Comment

    0 Comments