तुळशी आरती मराठी mp3 download



जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी |
अग्रीँ शंकर तीर्थे शाखापरिवारीँ |
सेवा करिती भावें सकळही नरनारी |
दर्शनामात्रें पापें हरती निर्धारीं || १ ||

जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी |
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी |
तव दलविरहित विष्णूं राहे उपवासी |
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीँ || २ ||

जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

अच्युत माधव केशव पीतांबरधारी |
तुझिया पूजनकाळीं जो हे उच्चारी |
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी |
गोसावी सुत विनवी मजला तूं तारीं || ३ ||

जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

  • नवरात्र उत्सव अपेक्षित मानसिकता, साधनापुर्व तयारी व मतितार्थ - श्री स्वामी समर्थ
  • गायत्री मंत्र व अर्थ
  • देवी अथर्वशीर्ष ( Shree Devi Atharvashirsa ) उपनिषद् माहात्म्य व नवार्ण मंत्र साधना
  • भगवती काली साधना कलियुगी माहात्म्य व आत्मविद्या गहनता
  • ' आई ' या अभिव्यक्तीचे आध्यात्मिक माहात्म्य- Simple and Easy
  • संपूर्ण काकड आरती mp3 जशीच्या तशी... Datta Mandir Mangaon ( नक्की ऐका मन भरुन येईल )


  • GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


    FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


    Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


    Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below




    Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



    लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



    सर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.

    Post a Comment

    0 Comments