राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज  संत तुकडोजी महाराज हे विदर्भातील अमरावती जवळच्या यावली गावी जन्मले. ते ठाकूर घराण्यातील होते. विदर्भात अनेक संत होऊन गेले. पण तुकडोजी महाराज फार अलिकडच्या काळातील होते.

   तुकडोजीचे पिता व्यसनात पूर्णपणे गुंतले होते. त्यामुळे त्यांची परिस्थिती फार हलाखीची होती. पण तुकडोजी महाराजांची आई भक्तीरसात रममाण होती. अशा वेळेस यांच्या मामांनीच यांना मदत केली. मामा त्यांना त्यांच्या आईसमवेत त्यांच्या घरी घेऊन गेले. 

मामांच्याच गावी यांची शाळा सुरु झाली. अभ्यासासोबत लहान वयातच यांनी योगासने, वादन, खंजिरी, इ. कला अवगत केल्या होत्या.

   त्यानंतर ईश्वरकृपेने यांना गुरुकृपा झाली. वरखेडच्या अडकोजी महारांजाशी यांची भेट झाली. अडकोजी महाराज नाथपंथीय होते. त्यांनी तुकडोजी महाराजांना दीक्षा दिली. अडकोजी महाराजांनीच यांचे नाव तुकडोजी महाराज ठेवले.

   तुकडोजी महाराजांनी १९४२ च्या आंदोलनातही भाग घेतला. पण यांचे मन विरवत होते. पुढे ते रामटेकच्या जंगलात जाऊन राहिले. तिथे त्यांनी उपासना व तप केले. आपल्या संस्कृतीचा आपण आदर करावा, पण परमेश्वराशी नाते जोडणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे असे ते सांगत. १९६८ साली श्री तुकडोजी महाराज अमरावती जवळील मोझरी येथील तिवसा येथे समाधिस्थ झाले.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments