श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: अंकशास्त्र रहस्य - Real unknown secrets explained SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

अंकशास्त्र रहस्य - Real unknown secrets explained


संख्यांचा अभुतपुर्व सुक्ष्म अभ्यासाद्वारे कोणतीही परिस्थिती, व्यक्तीत्व अथवा भवितव्यात घडणाऱ्या घडामोडींचे आत्मविश्लेषण म्हणजे अंकशास्त्र होय. कोणत्याही चारित्र्य अथवा देश, काळ व स्थानाचा परस्पर प्रस्थापित झालेला संबंध सुक्ष्मवादावर ओळखणे यासाठी अंकशास्त्राचा अर्थपुर्ण उपयोग केला जातो. अंक ब्रम्हांडातील सांख्यिकी भाषा आहे. शब्दांनी प्रकृती पुरुषाचे चैतन्य स्थिर असते तर संख्या योगाद्वारे चैतन्य चलायमान होते. अंक शास्त्रज्ञ संख्या विश्लेषणातुन कोणत्याही मनुष्याचा पिंड ओळखु शकतात. जीवनात घडणाऱ्या सुक्ष्म घडामोडींचा आढावा घेऊ शकतात.

अंकशास्त्राद्वारे मुळांक व त्याचा गुप्त प्रभाव ; कशाप्राकारे आयुष्यावर घडतो यातील तारदम्य शोधता येते. यापैकी काही मुळांक शोधन जीवनातील दिशा निर्देशने, भाग्यांक ईत्यादी. सुनिश्चित करतात. अशा संख्यांचा मानवी स्वभावावर मोठा परिणाम दिसुन येतो.

भाषेचा संयोग विविध संस्कृती व समाजावर दिसुन येतो पण अंकाचे स्वतःचे एक अंतर्गत संवादात्मक संधान आहे जे सांकेतिक भाषेतुन व्यक्त होते. अंकांच्या अस्तित्वात भावनिक जोड व वैयक्तिक प्राधान्य दिसुन येत नाही. संख्या योगातील सांकेतिक परिमार्जने संवादाच्या माध्यमातून मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक गुप्त रहस्यांचा सहजच उलगडा करवुन देतात. 

दत्तप्रबोधिनी तत्वातुन अंकशास्त्राचे परिणामकारक व सखोल अध्ययन करण्यात येते. मानवी जीवनातील भुत, वर्तमान व भवितव्य त्याच्या जन्म काळापासुन ते प्रौढावस्थे पर्यंत, प्रौढावस्थे पासुन वृद्धावस्थेपर्यंत त्याच्या नाव व अंकाद्वारे, जन्म तारखेतुन, अंक व व्यवसायातील संबंधातुन, भाग्यांकातुन, अंक व जीवनातील विचित्र घडामोडीतुन आकलन करता येते. अशा वेळी मंत्र, तंत्र आणि यंत्र शक्तीचा सदुपयोग केला जातो. प्राधान्यतः त्याच्या मुळांक व भाग्यांकाद्वारे मंत्र सामर्थ्य जागृत केले जाते. त्याचा प्रत्यक्ष सर्वांगीण परिणाम संबंधित मनुष्यावर होतो. 

अंकशास्त्राचा शिवशक्तीशी प्रत्यक्ष संबंध -ज्याप्रमाणे अक्षरांचे दोन भाग पडतात एक म्हणजे व्यंजन व दुसरे स्वर यामधे व्यंजन म्हणजे शिव तर स्वर म्हणजे शक्ती असा अविर्भाव प्रकट होतो. स्वर व व्यंजने मिळुन अक्षर वाक्य तयार होते जे अमलात आणले जाते. भाषेच्याही पलिकडे संख्यायोगाची अभिव्यक्ती दडलेली आहे. अतिशय रहस्यमयी पद्धतीने शिवशक्ती संख्येत सामावलेले आहेत. 

भगवान शिवाचा मुळांक ९ तर भगवतीचा ८ आहे. शिव शाश्वत अविनाशी अभेद्य व तत् सत् आहे हे अंकशास्त्रातुन पटणे अधिक सोपे आहे. ज्यात ९ च्या पाढ्यात कुठेही बेरीज केल्यास मुळांक नऊच शिल्लक राहातो. याचाच अर्थ असा आहे की, ब्रम्हांडाच्या सृजन, पालन, अंत व त्याही पलिकडे शिव तत्व जसेच्या तसे अथर्व किंवा शाश्वत आहे. 

अशाप्रकारे भगवती आदीमायेच्या ८ मुळांकाचा पाढा मोजुन जर बेरीज केल्यास संख्या दर वेळी एक अंकाने वजा होते. म्हणजेच शक्तीत काळ व वेळेच्या ओघाद्वारे बदल होत असतो. प्रकृतीतील बदल त्रिविध आदीभौतिक, आदीदैविक आणि आदीआध्यात्मिक तापाने वेढलेला आहे जो क्रमाक्रमाने घटत अथवा स्थलांतरीत होत जातो.

मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट सभासदत्व उपयुक्तता...!

अंकशास्त्र व नाव

सहज समाधी योग : नाम प्राणायाम व त्रिवेणी बंध

दत्त उपासना, दत्त संप्रदाय ( Datt Sampraday ) व साधन, साध्य, समाधी

मनाची शक्ती... त्राटक विद्या ( Tratak Vidya ) म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज