मानवी जीवनात नावाची भुमिका अतिशय महत्त्वाची आहे. मनुष्य नावाने ओळखला जातो जे त्याला त्याच्या स्वकीयांमार्फत प्राप्त झालेले असते. त्यायोगे प्रत्येकजण आपलं नाव कशाप्रकारे कतृत्वाच्या पार्श्वभूमीवर वाढवता येईल अथवा अधिक वर स्वतःला प्रस्थापित करता येईल याचाच सारासार विचार करत असतो. जास्तीतजास्त लोकांपर्यत आपलं नाव कसं पोहोचवता येईल यावर अधिक भर देतो. ज्यायोगे तो स्वतःचे व्यक्तीमत्वात स्वतःच्या नावाला शोभेल अशी प्रतिमा निदर्शनास आणण्याचा गंभीर प्रयत्नही करतो.
त्याआधारे मनुष्य खालीलप्रमाणे वस्तुस्थिती समजुन घेण्याचा प्रयत्न करतो...
- १. माझं नाव माझ्या सर्वांगीण प्रगतीला अनुसरुन योग्य आहे का ?
- २. माझ्या पत्नीचे वर्तमान नाव माझ्यासाठी हितकारक आहे का ?
- ३. माझ्या जन्म तारखेला अनुसरुन माझं नामकरण आहे का ?
- ४. ज्या शहरात मी राहातो त्याला अनुसरुन माझं नाव आहे का ?
- ५. माझ्या भागीदाराचे नाव मला लाभकारक आहे का ?
- ६. माझ्या अपत्याचे नाव माझ्या व्यक्तीत्वाला शोभणारे आहे का ?
अंकशास्त्रात प्रत्येक अक्षराला ठरवलेले अंक आहेत. गणिताच्या आकडेमोडातुन संबंधित मानवाची सुक्ष्म प्रतिमा अनुभवास येते. अंकशास्त्राचे अध्ययन ईंग्लिश अक्षर व आकड्यातुन खालीलप्रमाणे करण्यात येते. नाव दैनंदिन वापरातले असायला पाहीजे व तेच लिहावे.
नाव व अंक
A - 1 | B - 2 | C - 3 | D - 4 | E - 5 |
F - 8 | G - 3 | H - 5 | I or J - 1 | K - 2 |
L - 3 | M - 4 | N - 5 | O - 7 | P - 8 |
Q - 1 | R - 2 | S - 3 | T - 4 | U - 6 |
V - 6 | W - 6 | X - 5 | Y - 1 | Z - 7 |
उदा. नरेंद्र मोदी जे आपण संख्येत रुपांतरीत करत आहोत ते खालीलप्रमाणे आहे...
Narendra Modi
51255421 4741
या अंकांची बेरीज केल्यास...
5+1+2+5+5+4+2+1+4+7+4+1 = 41
41 हा अंक निःस्वार्थी लोकांचा आहे. जे ईतरांबद्दल उदारमतवादी व सहायक पुरस्कृत असतात. अशा लोकांना समाजातुन प्रचंड सन्मान प्राप्त होतो.
अशाप्रकारे तुम्ही खालीलप्रमाणे दिलेल्या माहीतीच्या आधारे संबंधित नावाच्या व्यक्तीचे स्वाभाविक निदान करु शकता.
नावातीत अंकांचे महत्त्व खालीलप्रमाणे तपासा...
- 1. हा अंक संदिग्धतेचा दर्शक आहे. ह्या अंकातुन सुदैव व दुर्दैव समप्रमाणात कार्यान्वित होते. अशा प्रकारची माणसे कठोर परिश्रमी, सावध व अभुतपुर्व व्यक्तीमत्वाची असतात. जीवनात सहज यश येत नाही. आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो.
- 2. हा अंक अनिश्चिततेचा सुचक आहे. अशी माणुसे कार्य प्रारंभापुर्वी अतीगहन विचार करतात पण कार्य अंमवाबजावणीच्या वस्तुस्थितीत नेहमी मागे पडतात. मानसिक दुविधा त्यांचे उद्दीष्ट अस्थिर करते. स्वतःच्या खोट्या प्रसिद्धीसाठी सगळा पैसा व वेळ वाया घालवतात.
- 3. हा अंक बुद्धीवादाचा सुचक आहे. अशा माणसे अतिचातुर्य व बुद्धीवादाच्या पार्श्वभुमुवर समाजात स्वतःचं स्थान निर्माण करतात. त्यांचा आत्मविश्वास वाढीव असतो त्यायोगे यशस्वी होतात. त्यांचे बुद्धीवादातुन अर्थकारण प्रत्यक्षात होते.
- 4. हा अंक अंतर्मुखपणाचा सुचक आहे. अशी माणसे समाजाच्या जमावापासुन अलिप्त राहातात. त्यांना सभोवतालची गर्दी अस्वस्थ करते. ते ऐकांतवासी स्वभावाचे असल्याने जीवनात अपेक्षित यशप्राप्ती करु शकत नाही.
- 5. हा अंक महानता व समृद्धीचा सुचक आहे. अशी माणसे गंभीरतापुर्वक कार्य हातात घेऊन ; योग्य दिशेने स्वजबाबदारी पार पाडतात. अशी माणसे आळशीपणाने ग्रस्त असतात. बहुधा जीवनातील अमुल्य वेळ वाया घालवतात.
- 6. हा अंक आत्मविश्वासाचा सुचक आहे. अशा माणसाने स्वीकारलेली जबाबादारी पुर्णत्वास घेऊन जातो. कितीही संकटे, विघ्ने असल्याखेरीज ती कार्यसिद्धी मिळवुन देतो. अमर्यादित संयम, योग्य निर्णय आणि आत्मविश्वास यांचे प्रमुख गुणधर्म आहेत. अशी माणसे जीवनात यशस्वी होतात.
- 7. हा अंक चंचलतेचा सुचक आहे. अशा माणसाला जीवनात बर्याच अडचणी व तक्रारींना सामोरे जावे लागतं. अशा माणसाला सदैव मानसिक दुविधेने त्रस्त केलेले असते. त्यायोगे तो बुद्धीहीन असतो. लघु आत्मविश्वासामुळे तो न्युनगंड ग्रसीत असतो. अशी माणसे जीवनात यशस्वी होत नाहीत.
- 8. हा अंक परावलंबीपणाचा सुचक आहे. अशी माणसे जीवन फक्त दिवस पुढे ढकलण्यासाठी जगतात. स्वतःच्या चुकांचे मापन दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडतात. स्वतः बद्दल उत्साह तर नाहीच पण स्वतःला प्रगतीपथावरही घेऊन जाण्याचे कष्ट घेत नाहीत. सर्व फुकट मिळावं असे अपेक्षित असते.
- 9. हा अंक निकामीपणाचा सुचक आहे. अशी माणसे फक्त शब्द फेकी बहादुर असतात त्यांचा आत्मविश्वास फाजील असतो. अशा माणसांना दिलेली जबाबदारी ठराविक भुमिकेतच पार पाडतात व पुढील क्रीयाशीलता ठेवत नाहीत. त्यांच्या बाह्य हुशारीने समाजात बर्याच वेळेपर्यंत टिकुन राहातात.
- 10. हा अंक मदतनीसपणाचा सुचक आहे. जर अशा माणसाने व्यावसायिक भागीदारीतुन कष्ट केल्यास आयुष्यात प्रगती अपेक्षित आहे. बुद्धीमत्तेच्या जोरावर ही माणसे त्यांचे जीवन यशस्वी बनवतात.
- 11. हा अंक अनिश्चिततेचा सुचक आहे. अशी माणसे एकस्थानी राहु शकत नाहीत. भटकंती त्यांचा स्वभाव असतो.
- 12. हा अंक धैर्य व सुस्थिरतेचा सुचक आहे. अशी माणसे सुपीक मानसिकतावादी असतात. ते कधीही खेदजनक परिस्थिती अनुरुप अस्वस्थ होत नाहीत. त्यांच्या विचारधारेद्वारा यशस्वी होतात.
- 13. हा अंक अंतर्मुखवादाचा सुचक आहे. अशी माणसे स्वतःला नास्तिक म्हणुन दर्शवतात पण ते मुळ स्वभावतः आस्तिक असतात. ते परीपुर्ण अंतर्मुख असतात. ते कोणतीही कार्यसिद्धी कठोर परिश्रमाद्वारे प्राप्त करतात.
- 14. हा अंक सामान्यवादाचा सुचक आहे. अशी माणसे व्यावसायिक दृष्ट्या सक्षम असतात. कष्ट करुन स्वउद्दीष्ट साध्य करतात. त्यांच्या बुद्धीला सन्मान मिळतो त्यायोगे समाजात स्वतःची जागा तयार करतात.
- 15. हा अंक परिश्रमवादाचा सुचक आहे. अशी माणसे फक्त शारीरिक परिश्रमावर उपजीविका चालवतात. ते स्वमानसिकताचा परिपुर्ण सदुपयोग करवुन घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना ईतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहावे लागते.
- 16. हा अंक विघ्नसंतोषीचा सुचक आहे. अशी माणसे अयशस्वी राहातात. कोणतेही काम निर्विवाद, निर्विघ्न, निःसंकोच व निःसंगत्वाने एकमतवादातुन साध्य करु शकत नाही. भांडण करुन जीवन जगणे हा मुळ स्वभाव असतो.
- 17. हा अंक परावलंबीपणाचा सुचक आहे. अशी माणसे ईतरांच्या मदतीशिवाय आयुष्यात कोणतेही काम करु शकत नाहीत. अशा माणसांना मदत केल्यास बहुतांशी फसवतात त्यायोगे त्यांची मोठी अडगळी होते ज्याचे त्यांना मुर्ख स्वभावामुळे यत्किंचितही पुर्वभान नसते.
- 18. हा अंक महत्वाकांशीपणाचा सुचक आहे. अशी माणसे महत्वाकांशी असतात त्यायोगे यशस्वीही होतात. अशी माणसे परिस्थिती अनुरुप स्वतःत बदल घडवतात.
- 19. हा अंक भाग्यांकाचा सुचक आहे. अशा माणसांच्या जीवनात सर्व गोष्टी अनासाये व चमत्कारिक स्वरुपात होतात. अशी माणसे जे काम हातात घेतात अशा कामाला विशेष वळण मिळवुन देतात त्यायोगे समाजात विशेष दर्जा प्राप्त करतात.
- 20. हा अंक अनिश्चितपणाचा सुचक आहे. जीवनात कधी, कुठे, केव्हा आणि काय घडेल याबद्दल अज्ञान असते. बुद्धी असुनही त्याचा योग्य वेळी वापर होत नाही.
- 21. हा अंक बुद्धीवाद व साधेपणाचा सुचक आहे. समाजाला विशेष योगदान देऊनही अशी माणसे अत्यंत साधेपणाने जीवन जगतात. त्यांच्या कर्माने ते नाव प्रसिद्धी मिळवुन पुढील पिढीला प्रेरणा मिळवुन देतात. आर्थिक बाजु सर्वसामान्य असते.
- 22. हा अंक अंतर्मुखपणाचा सुचक आहे. अशी माणसे नेहमी संघर्षग्रसीत असतात. समाजात दिसुन येत नाहीत. त्यांचा मित्रसमुदाय ठराविक असतो.
- 23. हा अंक काल्पनिकवादाचा सुचक आहे. अशी माणसे दयाळु, भावनिक पण काल्पनिक मतवादी असतात. ते जीवनाच्या बाळकडु पासुन अलीप्त राहाणे पसंत करतात. ते नेहमी त्रास व भौतिक तक्रारींनी वेढलेले असतात तरीही स्वप्न दुनियेतच राहाणे पसंत करतात. कधीही वास्तविकता स्वीकारत नाही.
- 24. हा अंक विजयश्रीचा सुचक आहे. अशी माणसे विजय व समृद्धीसंपन्न असतात. अशा माणसांना अमर्यादीत शत्रु असतात पण त्यांना कोणीही क्षती पोहोचवु शकत नाही.
- 25. हा अंक पराजयवादाचा सुचक आहे. अशी माणसे आयुष्यातील चार दिवसही आनंदाने जगु शकत नाहीत. त्याच्या उधळपट्टी स्वभावाने बहूतांशी नुकसान होते.
- 26. हा अंक रहस्यवादाचा सुचक आहे. अशी माणसे निर्णय एक करतात आणि कामे काही दुसरेच करतात. अशा माणसांचा बाह्य दृष्टीकोण सर्व सामान्यांना ठराविक निष्कर्षावर येऊ देत नाही. त्यांची मुळ भुमिका बाह्य स्थितीच्या अगदी विपरीत असते. अशी माणसे तपासकार्यात प्रगती मिळवू शकतात.
- 27. हा अंक नेतृत्ववादाचा सुचक आहे. अशी माणसे नैसर्गिक पुढारी असतात. त्याच्या निर्णयांमधे विलक्षण सामर्थ्य असते. कोणतेही उद्दिष्ट सफल करु शकतात.
- 28. हा अंक बुद्धीवानवादाचा सुचक आहे. अशी माणसे प्रभावी वकृत्वशैली निपुण असतात. लोकांना आपल्या वक्तव्याने प्रभावित करतात. त्यांच्या कलेने ते जीवनात यशस्वी होतात.
- 29. हा अंक विघ्नवादाचा सुचक आहे. अशी माणसे ध्येय गाठु ईच्छित असातात पण कमी अक्कल आणि असंघटीत विचारसरणी नेहमी खड्ड्यात पाडते. अशा माणसांची संगत निकृष्ट दर्जा व आखुड दृष्टिकोनवादी लोकांसोबत असते.
- 30. हा अंक आत्मविश्वासवादाचा सुचक आहे. अशी माणसे मन मोकळी, मन मिळावु व मन कवडे असतात. समाजाला काहीतरी नवीन विषय ओळख करवुन देतात. यशस्वी असतात.
- 31. हा अंक आत्मवादाचा सुचक आहे. अशी माणसे सरळ जीवन जगतात. कपट कारस्थाने करत नाहीत.
- 32. हा अंक कुचकामवादाचा सुचक आहे. चारित्र दृष्टिकोनातून हा माणुस कमकुवत आहे. कशाही प्रकारे स्वतःचा स्वार्थ साधण्याची तयारी असते. कोणत्याही थराला जाऊन हेतु साध्य करतात.
- 33. हा अंक आत्मानंदवादाचा सुचक आहे. अशी माणसे सदैव आनंदी व स्वकीयांनाही आनंदी ठेवतात. जीवनातील कठीण प्रसंगातही स्थितप्रज्ञ असतात. समाजसुधारक, वैद्यकीय सेवा वगैरे व्यवसायाशी निगडीत यश मिळते.
- 34. हा अंक संयमवादाचा सुचक आहे. अशी माणसे आत्म संयमी, मितभाषी व स्वनियंत्रणाच्या स्वभावावर आधारलेली असतात. जीवनातील पूर्वार्ध कष्टात जरी जगले असतील पण उत्तरार्ध यशस्वीपणे जगतात.
- 35. हा अंक गतीशील व्यक्तीमत्वाचा सुचक आहे. अशी माणसे जलद मानसिकतावादी असतात. झटपट निर्णय व कार्य अंमलबजावणीवर भर देतात. वेळेची फार किंमत करतात.
- 36. हा अंक निःस्वार्थवादाचा सुचक आहे. अशी माणसे समाजहीतासाठी खुप कष्ट घेतात. त्यांना मान सन्मानाची प्राप्ती असते.
- 37. हा अंक विकृतवादाचा सुचक आहे. अशी माणसे मानसिक पीडा व अनिश्चित विनिमयाने ग्रसीत असतात. त्यांच्या परिवाराला फार त्रास भोगावा लागतो.
- 38. हा अंकृ प्रघातवादाचा सुचक आहे. अशा माणसांचे जीवन स्थैर्य विसकटलेले असते. जीवनात होणाऱ्या मानसिक अपघातांवर पुढील आयुष्य आधारलेले असते. अशा लोकांचा प्रवास अतिसंघर्षमयी असतो.
- 39. हा अंक विजयश्रीवादाचा सुचक आहे. अशी माणसे जे कार्य करतात त्यात त्यांना निर्विघ्नपणे यश प्राप्ती होते.
- 40. हा अंक स्पष्टवादाचा सुचक आहे. अशी माणसे सरळ, प्रामाणिक व स्पष्ट वक्तावादी असतात. त्यायोगे मानसन्मान प्राप्त करतात.
- 41. हा अंक निःस्वार्थीवादाचा सुचक आहे. अशी माणसे ईतरांबद्दल उदारमतवादी व सहायक पुरस्कृत असतात. अशा लोकांना समाजातुन प्रचंड सन्मान प्राप्त होतो.
- 42. हा अंक प्रतिष्ठावादाचा सुचक आहे. अशी माणसे अपार कष्टातुन स्वतःच विश्व तयार करतात. आत्मानंदी असतात. प्रेरणादायी ठरतात.
- 43. हा अंक भाग्यांकवादाचा सुचक आहे. अशी माणसे जे कार्य करतात ते पुर्णत्वाला घेऊन जातात. भाग्यशाली असतात.
- 44. हा अंक विघ्नकारकवादाचा सुचक आहे. अशी माणसे अडचणीं तयार करतात. ईतरांना अडकवुन स्वतः पसार होतात. त्यांना दरवेळी नवीन मानसिक त्रास होत असतो.
- 45. हा अंक परीश्रमवादाचा सुचक आहे. अतोनात कष्ट व बराच काळ त्रास भोगुन जीवनात यश प्राप्त करतात. अशी माणसे परिस्थितीला घाबरुन पळत नाहीत.
- 46. हा अंक सामान्यवादाचा सुचक आहे. अशी माणसे स्वतःच्या क्षमतेपलिकडे झेप घेतात. जे पेलवता जर आले तर ठिक पण अनियंत्रित परिस्थितीला घाबरुन पळ काढतात किंवा अपयश ईतरांच्या माथ्यावर फोडतात.
- 47. हा अंक यशस्वीवादाचा सुचक आहे. अशी माणसे जीवनात मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक स्तरावर यशस्वी होतात. परिस्थितीशी गरज भासल्यास दोन हात करुनही यश प्राप्त करतात.
- 48. हा अंक भौतिकवादाचा सुचक आहे. अशी माणसे जगातील सर्व सुखे सहजच उपभोगतात.
- 49. हा अंक दुर्दैववादाचा सुचक आहे. अशी माणसे अतोनात कष्ट करुन देखील दूःखी व अपयशी असतात. नेहमी अडचणीग्रस्त असतात.
- 50. हा अंक विसंगतावादाचा सुचक आहे. अशी माणसे धुर्त व मतलबी असतात. कृती करण्यापूर्वी स्वतःचा स्वार्थ मोजुनच पुढील भुमिका घेतात.
- 51. हा अंक अर्थवादाचा सुचक आहे. अशी माणसे अशा परिस्थितीत यशस्वी होतात त्यांच्या तुलनेत बहुतांशी लोक हारलेले असतात. अतीचतुर व बुद्धीला तीक्ष्ण धार असते.
- 52. हा अंक निःस्वार्थवादाचा सुचक आहे. अशी माणसे स्वतःचे नुकसान होऊनही देखील दुःखी पीडीतांना यशाशक्ती मदत करतात.
- 53. हा अंक साधेपणाचा सुचक आहे. अशी माणसे स्वकष्टाने जीवनात वर येतात. धार्मिक असतात.
अंकशास्त्र
महत्त्वाची सुचना :
संबंधित नाव वरील यादीन न आढळल्यास दत्तप्रबोधिनी संस्थशी संपर्क करावा. अंकशास्त्रातील विशेष गोपनीय विश्लेषण फक्त सक्रीय सभासदांसाठीच उपलब्ध आहे. याची दखल घ्यावी.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...