मुळांक 2 च्या व्यक्ती...


ज्या व्यक्तींची जन्म तारीख 2, 11, 20, 29 आहे अशा व्यक्तींचा मुळांक 2 असतो. संबंधित मुळांक एकुण संख्येच्या पहील्या बेरजेच्या आधारावर गणली जाते. या मुळांकाचा प्रतिनिधी ग्रह चंद्र आहे. स्वभावतः चंद्र ग्रह शितल, भावनिक व सौम्य वृत्तीयुक्त असल्याने त्याचा प्रभाव या मुळांकधारी अभिव्यक्तींवर दिसुन येतो. अशी माणसे विनम्र व स्वप्न रंजीत मनोवृत्तीची असतात.
ज्या व्यक्तींची जन्म तारीख 2, 11, 20, 29 आहे अशा व्यक्तींचा मुळांक 2 असतो. संबंधित मुळांक एकुण संख्येच्या पहील्या बेरजेच्या आधारावर गणली जाते. या मुळांकाचा प्रतिनिधी ग्रह चंद्र आहे. स्वभावतः चंद्र ग्रह शितल, भावनिक व सौम्य वृत्तीयुक्त असल्याने त्याचा प्रभाव या मुळांकधारी अभिव्यक्तींवर दिसुन येतो. अशी माणसे विनम्र व स्वप्न रंजीत मनोवृत्तीची असतात.
वैशिष्ट्ये...

चंद्र ग्रहाच्या गुणधर्माला अनुसरुन मुळांक 2 असलेल्या व्यक्ती अकस्मात आनंदी स्वभावाच्या असतात ज्यायोगे मानसिक आधारावर एक चिकाटीने हाती घेतलेले कार्य वैयक्तिक किंवा समुह स्वरुपात यशस्वीपणे पुर्ण करतात. क्रीयाशील मनोवृत्ती असल्यामुळे नवनवीन संकल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करतात.


चंद्र ग्रहाच्या प्रभावामुळे अशा व्यक्ती मानसिक व शारीरिक स्तरावर नाजुक असतात. अशी व्यक्ती जीवनातील भागीदारासाठी भाग्यवान ठरते. स्त्री वर्गाचा त्यांच्यावर तात्काळ विश्वास बसतो. ही माणसे नाती जपणे व टिकवण्यात हुशार असतात. अशा व्यक्ती स्त्री वर्गाकडुन मधुर स्वराद्वारे स्वहीत साधुन घेतात सोबत संबंधित स्त्रीयांबद्दलचे गुपीतही बाहेर काढतात.


मुळांक २ असलेली व्यक्ती पुर्णत्वाला अनुसरुन असते. जे कार्य हाती घेतात ; ते अती कुशलतेने पार पाडतात. शारीरिक दृष्ट्या अशा व्यक्ती जरी बलवान नसल्या तरीही त्यांची मानसिकता बळकट असते. त्यांचा बहुतांशी सहभाग मानसिक कार्यात  यशस्वी ठरतो. स्वतःच्या बुद्धीवादाच्या जोरावर परिस्थिती पालटुन येणाऱ्या पिढीला फायदा करवुन देतात. 


हे व्यक्ती भावनाप्रधान असतात. ईतरांच्या विनंतीला मान देऊन त्यांची कामे देखील स्वखुशीने करतात. जनहीतामधे आवड असते. "नाही" हा शब्द यांच्या शब्दकोषात नसतो. काही वेळा स्वतःचं नुकसान भोगूनही ईतरांचा मार्ग मोकळा करतात. 


सुंदरतेचं अशा व्यक्तींना पुष्कळ आकर्षण असतं. प्रेम व सौंदर्य यांमधील ताळमेळ ईतरांच्या तुलनेत यांना अधिक चांगल्या रितीने अवगत असते. यांच्या नजरेत एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण असते जे लोकांना त्यांच्या विचारांकडे अनायसे ओढत घेऊन जाते. ईतरांना अशाप्रकारे मोहर घालतात की, अनोळखी सुद्धा मित्र बनतात. केलेल्या चुका मान्य करतात. अशा वेळी न्युनगंड मानत नाहीत.


अशा व्यक्ती निर्णय घेण्याबाबत कमकुवत असतात. कोणत्याही निर्णायक भुमिकेत हो - नाही अशा दुविधेत अडकतात. वेळेच्या उपरांत घेतलेला निर्णयही काही वेळा अमान्य करतात. मित्र वर्गाला अनुसरुन स्वतःच्या जीवनातील महत्त्वाची दिशा निर्देशने ठरवतात. असे लोक नेहमी ईतरांच्या धारेवर असतात. यांच्या सौम्य व मवाळ मतवादी धोरणांमुळे ईतर लोक त्यांचा अनैतिक फायदा उचलतात ; तरीही त्यांना खेद वाटत नाही. 


चंचल मनोवृतीमुळे ; मानसिक संघर्ष नेहमी सभोवताली सुरु राहातो. असंयमी स्वभावामुळे जीवनात चुकीच्या वेळी चुकीच्या माणसांमधुन चुकीचे विषयांवरुन चुकीचे निर्णय घेतात. ज्यासाठी त्यांना मोठी किंमतही मोजावी लागते. त्यांना अपमानजनक वागणुकीला सामोरे जावे लागते. बर्याच वेळा... अवेळी अयोग्य कृती करुन निराश होतात. 


असे व्यक्ती मन कवडे असतात. ईतरांच्या मनोवृत्तीचा शोध चांगल्याप्रकारे घेतात पण स्वतःच्याच दुष्ट चक्रात फसुन मुख्य गफलत करतात. हे प्रवासप्रिय असतात. सहसा किनाऱ्यालगतच्या परिसराबद्दल जास्त उत्सुक असतात. अशी ठिकाणे यांच्यासाठी शुभ असतात. टुअर्स आणि ट्रावेल्स व्यवसायात चांगली प्रगती अपेक्षित असते. 


सावधानता...

मुळांक २ असलेल्या व्यक्ती विचारी, नवशिक्या, सावध व सरळ असतात. त्यांना आत्मविश्वासाची कमतरता असते. नैराश्यवादी स्वभावामुळे मानसिक गुंतागुतीला बळीपडुन भरकटतात.

अशा व्यक्तींनी एक विचारसरणी ठरवुन हाती घेतलेले कोणतेही काम पुर्णत्वास आणले पाहीजे. जे नियोजन कराल ; त्यात धरसोड वृत्ती त्वरीत टाळावी. 


प्रेम प्रकरणापासुन लांब राहाणेच योग्य आहे. ह्यातुन होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोकांकडुन विश्वास व आदर गमवण्याची वेळ येते. 


अतिउतावीळपणा टाळला गेला पाहीजे. आयुष्यात होणाऱ्या अनायास बदलांना आत्मसंयमी वृत्तीने हाताळल्यास परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित होते. 


मित्रवर्गावर विश्वास ठेवण्यापासुन स्वतःचा बचाव करावा. विशेषतः मानसिक विकृत मित्रवर्ग...



महत्त्वाची सुचना...

मुळांक 2 असलेल्या व्यक्तीने पौर्णिमेला कोणतेही महत्वपुर्ण निर्णय घेऊ नये. खोल पाण्यात प्रवेश टाळवेत. अशा व्यक्तींना पौर्णिमेचा पंधरावडा अमावस्येच्या पंधरावड्यापेक्षा जास्त शुभकारक असतो.

मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 

अंकशास्त्र


संबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0