मुळांक 8 च्या व्यक्ती...


8, 17 व 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 8 असतो. या मुळांकाचा प्रतिनीधी ग्रह शनि आहे. हा ग्रह नियंत्रकवादी आहे. 

8, 17 व 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 8 असतो. या मुळांकाचा प्रतिनीधी ग्रह शनि आहे. हा ग्रह नियंत्रकवादी आहे.

वैशिष्ट्ये...


अत्यंत क्लिष्ट व अनाकलनिय फेरा हा ग्रह मनुष्याच्या जीवनात घेतो.  अशा व्यक्तींच्या जीवनात अनपेक्षित उलटापाटल तीव्रतेची असते. कोणालाही त्यांच्या बद्दल कोणतीही शाश्वती नसते. मुळांक 8 असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याच्या नाड्या शनि महाराजांकडे असतात. हा ग्रह ह्दय प्रदेशाचा मालक आहे. 


प्रसंग मालिका अनायासे घडते. जीवनात विचित्र संघर्ष असुनही ईतरांसमोर सांत्वनाची अपेक्षा करत नाहीत. शांत स्वभावानुरुप रहातात. अंतर्मूख मनोवृत्तीमुळे कोणीही त्यांना समजू शकत नाही. 


भक्कम पायाभुत योजना आखुन कार्यसिद्धी साधतात. त्यांच्या कार्य शैलीच्या प्रदर्शनाने लोकही आचंभीत होतात.


अशा व्यक्ती गंभीर स्वभावाच्या असतात. बालीशपणा चेहेर्यावर व व्यक्तीमत्वातही नसतो. सर्व संवाद अनुभव व तत्वाच्या माध्यमातून करतात. लोकांना त्यांच्या शब्दाबद्दल हमी असते. ऐकलकोंड्या स्वभावामुळे समाजापासुन अलिप्त असतात. ह्या स्वभावाचा काही प्रमाणात त्रास ही होतो. 


शनि ग्रह वायुतत्वाचा कारक आहे. वायु जेव्हा समप्रमाणात नियंत्रणात असतो तेव्हा प्राणवायु, संजीवनी व जीवनवर्धक भुमिकेत असतो.पण जेव्हा याच वायुवरील नियंत्रण हरवते तेव्हा चक्रीवादळ व अत्याधिक जलद हवामानामुळे जीवीतहनी होते. तसेच अशा व्यक्तींचेही आहे. सौम्य असताना सर्वस्व अर्पण करुन इतरांना मदत करतील पण राग, द्वेष व मत्सरच्या आवेशात मोठे नुकसानही करतील.


अशा व्यक्तींना मधली भुमिका नसते. नफा काळात मोठा नफा तर वाईट काळात मोठे नुकसान होते. काही काळात होणाऱ्या उलटापालटीवर काही प्रमाणात नियंत्रणही प्राप्त करतात. 


वेळ वाया घालवणे त्यांना आवडत नाही. प्रसिद्धी माध्यमांपासुन स्वतःला शक्य तितके अलिप्त ठेवतात. 


बाह्य रुपाने कडक तर अंतर्मनाने सौम्य असतात. 


मित्रांसाठी मित्र तर शत्रुंसाठी शत्रु असतात. मित्रांसाठी स्वतःच्या आवाक्याबाहेर असलेली सुद्धा कामे करतात ज्या कामात त्यांना धोकाही असतो. शत्रुंसाठी ईतके घातक असतात की, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सर्वनाशाकडे योजतात. त्यांचे मनही त्यांचा ( स्वतःचा ) सर्वनाश व्हावा अशीच समजुत घालते.


नीच स्तरावरील कामे स्वीकारत नाहीत. नेहमी कौतुकाचे धनी होण्यासाठी झटतात. अशा व्यक्ती अतिशय बलवान व संवेदनशील असतात. जीवनात निराश होत नाहीत. तीर्व संघर्षात इतर नष्ट होतील पण अशा व्यक्ती अबाधीत राहातात. लवचिक व्यक्तीमत्वयुक्त अशा व्यक्ती जीवनाचा पाढा सरळ व सोप्या पद्धतीने समजुन देतात. मदतनीस युक्त अशा व्यक्ती दुःखी पीडीतांसाठी सहायक असतात. 


अशा व्यक्ती एक केंद्री असतात. एका कामात गुंतुन राहील्यास इतर परिस्थितीचे भान नसते. काम फत्ते करुनच विश्रांती घेतात. अशा व्यक्ती भोगी विलासी नसतात. सत्कर्मावर विश्वास असतात. कोणत्याही अनैतिक कार्यात कधीही गुंतत नाहीत. त्यांचा स्वभाव जबाबदारीयुक्त असतो. 


शनिग्रह दडपशाहीवादी आहे. अशा व्यक्ती यत्किंचितही अनैतिक मार्गावर प्रस्थापित झाल्या तर तामसी स्वभावांतर्गत नुकसानदायकच ठरतील


मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 

अंकशास्त्र



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...