मुळांक 6 च्या व्यक्ती...


6, 15 व 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 6 असतो. मुळांक 6 चा प्रतिनिधी ग्रह शुक्र आहे. हा ग्रह सुर्य मालिकेत ईतर ग्रह तार्यांच्या तुलनेत अधिक तेजवी व दिव्यमय आहे. ह्या ग्रहाला स्थुल चक्षुंनी सुद्धा पाहता येतं. हा ग्रह जीवसृष्टीत लैगिंक संबंधांचा कारक आहे. उर्जा, उत्साह, वीर्य बळ व मोकळेपणाशी संबंधित आहे.

6, 15 व 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 6 असतो. मुळांक 6 चा प्रतिनिधी ग्रह शुक्र आहे. हा ग्रह सुर्य मालिकेत ईतर ग्रह तार्यांच्या तुलनेत अधिक तेजवी व दिव्यमय आहे. ह्या ग्रहाला स्थुल चक्षुंनी सुद्धा पाहता येतं. हा ग्रह जीवसृष्टीत लैगिंक संबंधांचा कारक आहे. उर्जा, उत्साह, वीर्य बळ व मोकळेपणाशी संबंधित आहे.

वैशिष्ट्ये...


मुळांक 6 अतिशय शक्तीमान व प्रभावयुक्त अंक आहे. आयुष्य जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व हा मुळांक पुरवतो. अशा व्यक्तींचे राहाणीमान सरळ व साधे असते. हे विश्व शरीर सुखासाठी बनले आहे असा त्यांचा समज असतो. जास्तीतजास्त क्षणिक सुखामागे धावत असतात.


अशा व्यक्ती स्री वर्गाला आकर्षित होतात. त्यांना कला, संगीत व गायनाची आवड असते. व्यावसायिक दृष्ट्या संगीतकार ही होतात. यासाठी बराच पैसा व वेळही खर्च करतात.


वस्तुनिष्ठ गरज कितीही असली तरी खर्च कारणाहेतु नेहमी पाठी ओढले जातात. सौदंर्य भोक्ते असतात. रहस्य उलगडण्या हुशार असतात. योग्य कौटुंबिक व्यक्ती आहेत. योजनात्मक कामे यशस्वीपणे करतात.


वैवाहिक जीवन सामान्य असते. पत्नी व्यतिरिक्त ईतर स्त्रीयांशी संबंध ठेवण्यात रस असतो. ईतरांच्या भावनांचा आदर करतात पण स्वतःतच विसंगत असतात. विवाह बाह्य लैंगिक संबंधाच्या गौप्यस्फोटाबद्दल मनात भिती असते. ही परीस्थीती नैराश्यवाद आणते.


अशा व्यक्ती चपळ असतात. एकाच ठिकाणी स्थिर राहुन काम करु शकत नाही. एकच काम फार काळ टिकवु शकत नाही.


आकर्षित करणे व सजवणे त्यांच्या मुख्य आवडी आहेत.


ज्या महीला या मुळांका अंतर्गत येतात त्या फँशन जगताशी जोडलेल्या असतात. नवीन पोशाखाची शैली त्यांच्यातुनच सुरु होते. अर्थिक दृष्ट्या सक्षम नसले तरीही या विषयांवर खर्चिक असातात.


अशा व्यक्ती समाजात अशाप्रकारे स्वतःची ठेवण निदर्शनास आणतात की, कोणीही त्यांची सत्य परिस्थिती ओळखु शकत नाही. पुढे काय करतील याची शाश्वती देत नाहीत. ऐकांतवासी नसतात. कमीतकमी एक जण तरी संगतीला लागतो. कार्यसिद्धी खोळंबल्यावर निराश होतात.


सौजन्य, प्रेम व सहकार्य हे त्यांचे गुणधर्म आहेत. सर्वात सुंदर स्त्रीया यांच्याच अधिपत्याखाली असतात. या मुळांकाच्या स्रीया अतीसुंदर असतात. 


मुळांक 6 च्या पुरुषांना जास्त आकर्षित होतात. कामुक कार्या सक्रीयता असते. स्वभाव विनोदी व मनमिळावु असतो.


ज्या क्षणी शुक्र ग्रह बलकारक असतो तेव्हा अशा व्यक्तींना शारीरिक संबंधांची ओढ तीव्र असते.


अशा व्यक्ती स्वभावाने मत्सरी असतात. ईतरांची प्रगती बघवत नाही. चढाओढीतुन कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. जळावु स्वभाव यशस्वी झाला तर मनाला शांती मिळते.


दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्याची कला असते. अनोळखी लोकांना स्वतःचं महत्व पटवुन देतात.


संघर्ष करणे त्यांच्या स्वभावात नाही. ते परीस्थीती फार वेळ हाताळु शकत नाहीत. कालाआतराने अपयश पत्करतात.


त्यांच्या घरात भोगीविलासी वस्तुंचा संचय असतो. या मुळांकाचा रंग पांढरा आहे. त्यांच्या स्मित हस्यात आकर्षण असते. घाणेरडापणा सहन करु शकत नाहीत.


अशा व्यक्ती त्यांच्या पालकांचा तिरस्कार करतात पण सहानुभूतीही व्यक्त करतात. नेहमी वेळेवर कोणत्याही आज्ञेसाठी सज्ज असतात.


शारीरीक श्रम करु शकत नाहीत. द्विगुणितपणावर उधळपट्टी करतात.


मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 


अंकशास्त्र

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...