मुळांक 7 च्या व्यक्ती...


7, 16 व 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 7 असतो. या मुळांकाचा प्रतिनिधी ग्रह वरुण आहे. शनिग्रहानंतर वरुण ग्रहाचा पृथ्वीवर सर्वात जास्त प्रभाव आहे. सुर्यापासुन अति अंतरावर असल्यामुळे त्यांची परीवलनाची गती अतिमंद असते. या कारणांमुळे या ग्रहाची भुमिका सखोल व व्यापक असते.7, 16 व 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 7 असतो. या मुळांकाचा प्रतिनिधी ग्रह वरुण आहे. शनिग्रहानंतर वरुण ग्रहाचा पृथ्वीवर सर्वात जास्त प्रभाव आहे. सुर्यापासुन अति अंतरावर असल्यामुळे त्यांची परीवलनाची गती अतिमंद असते. या कारणांमुळे या ग्रहाची भुमिका सखोल व व्यापक असते.

वैशिष्ट्ये...


वरुण नियतीचक्रातील जल देवता आहे. शांत सुस्वभावी व लवचिक व्यक्तीमत्व ह्या मुळांकधारी व्यक्तींचा स्वभाव असतो. कल्पना करणे यांचा मुख्य गुणधर्म आहे. कला शाखेतील मोठे विद्वान, तत्वज्ञानी, वकिल व संशोधक ह्या मुळांंका अंतर्गत येतात. 7 भावनात्मक व सहकारीक अंक आहे. कठीणातले कठीण काम संघर्षमयी वृत्तीने करणे यांचे वैशिष्ट्ये आहेत. फार काळ निष्क्रियतेने राहु शकत नाहीत. उद्योगी स्वभाव प्रकट होत असतो. संघटनात्मक व नियोजन बद्ध कामे करुन ईतरांची मने आकर्षित करतात. अशा व्यक्ती स्वावलंबी असतात. आत्मसन्मान जीवनात मुख्य मानतात.


स्वतंत्र व अचुक निर्णय घेण्याची क्षमता असते. कोणाच्याही अनैतिक दबावात येत नाहीत व कोणालाही स्वकार्यात हस्तक्षेप करु देत नाहीत. कोणतेही काम सुरु करण्यापुर्वी योग्य जाणकाराकडुन योग्य सल्ला घेऊनच शुभारंभ करतात. सर्वांगीण विचार करुन ठाम निर्णय घेतात.


अशा व्यक्तींचे व्यक्तीमत्व विशाल असते. उच्च पातळीची कामे हातात घेतात. कोणालाही कमी लेखत नाहीत. लोकांकडुन कामे काढून घेण्यात तरबेज असतात.


समाजात यांना मानसन्मान असतो. अशा व्यक्ती प्रसिद्ध असतात.


असमाधानकारक वृत्ती नेहमी त्यांना नवनवीन कामात सक्रीय ठेवते. वेळेप्रमाणे स्वतःत बदल घडवतात.


सुक्ष्मवादाचा अभ्यास असतो. मनकवडे असतात. येणाऱ्या लोकांचे हेतु पुर्ववतच ओळखुन घेतात. हा विशेष गुणधर्म आहे.


मित्र संगतीद्वारे फायदा होतो. मदत करणाऱ्या मित्रांना त्यांच्या संकटकाळात सहकार्यही करतात. फसवणूक करणाऱ्या लोकांचा बदला घेत नाहीत. प्रवासाची आवड असते. परीवार साधारण असतो. घरातील सदस्यांना सान्निध्याने आनंदी करतात.


अशा व्यक्ती नशीबवान असतात. कठीण परिस्थितीतुन सहज प्रगती करतात. जे ईतरांनाही जमण्यासारखे नसते.


अशा व्यक्ती ज्यांना भेटतात त्यांना ते कधीही विसरत नाहीत. त्यांची स्मृती उत्तम असते.


लहानपणापासून प्रवासाची आवड असते. निसर्गप्रेमी असतात.


अशा व्यक्ती जर व्यावसायिक असतील तर विदेशी व्यापारात प्रयत्न करावा त्यात भाग्यवान ठरतील.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीAll about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below