मुळांक 4 च्या व्यक्ती...


4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 4 असतो. या मुळांकाचा प्रतिनिधी केतु व हर्षल ग्रह आहेत. हर्षल ग्रहाचे प्रत्यक्ष संबंध सुर्य ग्रहाशी असल्याने हर्षलचेही गुणधर्म सुर्य ग्रहाप्रमाणेच आहे. 

4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 4 असतो. या मुळांकाचा प्रतिनिधी केतु व हर्षल ग्रह आहेत. हर्षल ग्रहाचे प्रत्यक्ष संबंध सुर्य ग्रहाशी असल्याने हर्षलचेही गुणधर्म सुर्य ग्रहाप्रमाणेच आहे.

वैशिष्ट्ये...


हर्षल ग्रह मुळांक 4 चा स्वभावानुरुप मुख्य कारक ग्रह आहे. मुळांक 4 असलेल्या व्यक्तींच्या जीवनात मोठी उलथापालथ होत असते. अश्या व्यक्तींच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना प्रत्युत्तर देण्याहेतुने बरेच कष्ट करावे लागतात पण अंत कधीही समाधानकारक होत नाही. कोणत्याही कामात अनपेक्षित संघर्ष करावा लागतो. सातत्य व चिकाटीमुळे कार्यसिद्धी प्राप्त करतात.


मुळांक 4 असलेल्या व्यक्तींना नशीबाला लागलेले ग्रहण अनुभवावे लागते. क्वचितच स्वभाव उग्रतेला येऊन ; बहुतांशी मार्गस्थ कामे बिघडवुन टाकतात. जितका राग जास्त ; तितकेच शांतही त्वरीत होतात. क्रोध उद्रेक शमन झाल्यावर पश्चात्ताप करत बसतात. 


सौम्य स्वभाव असल्यामुळे स्वकिय व परकीय जनें अशा व्यक्तींचा गैरफायदा उचलतात. याची त्यांना अनुभुती होऊनही सहनशीलता व्यक्त करतात.


आकस्मिकता हा त्यांच्या जीवनातील विशेष गुणधर्म आहे. अनाकलनिय व अनियोजीत घटनांची वर्णी यांच्या जीवनात सुरु राहाते. कितीही सुव्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला तरीही ; ऐन वेळेवर विपरीत घटना घटीत असतात. 


मुळांक 4 असलेल्या व्यक्तींचा सुस्पष्ट स्वभाव कधीही हमीपुर्ण व्यक्त केला जाऊ शकत नाही. सकाळी केले गेलेले नियोजन संध्याकाळ पर्यंत बदललेले असते. अनायाचे वैचारित व परिस्थिती अनुरुप कायापालट होतो. यांच्या जीवनात असामान्य उलटापालट असते. संधी सर्वांनाच मिळतात. ते आपल्यावर आहे कसा फायदा उचलायचा...!


सरळ मार्गी स्वभाव असतो. कोणाच्याही विषयात अनावश्यक ढवळाढवळ करत नाहीत. कटकारस्थानी अथवा फसवेगिरी वृती नाही. जे काही बोलायचय ते चेहऱ्यावर बोलतात. काही वेळा विचार ईतके कडवट असतात पण मानसिकता प्रामाणिक व पारदर्शक असते. कोणाचाही अपमान करत नाहीत. हाच त्यांचा मुळ स्वभाव निदर्शनास येतो.


अशा व्यक्ती ईतरांच्या गोपनीयता सुरक्षित ठेवतात अर्थात कुठेही वाचा फोडत नाहीत व विषय भांडवलही करत नाहीत. कोणालाही उघड्यावर पाडण्याची कामे असे व्यक्ती करत नाहीत.


अशा व्यक्तींना शत्रुभय नेहमी असते. एका शत्रुला परास्त जरी केले तरी नवीन 4 शत्रु तयार होतात. शत्रु नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण नुकसान त्यांच्या शत्रुंचेच होते. योगायोगाने त्यांच्या शत्रुचे गर्व हरण अनायासे सहजच होते. परिश्रम घ्यावे लागत नाही. 


मैत्री करणे यांची विशेष कला आहे. उच्च स्तरीय अधिकारी यांचे मित्र बनतात. काही जिवलग तरकाही फक्त नावा पुरते असतात. अगदी कमी वेळेत समोरच्या व्यक्तीचे विश्लेषण करुन त्याची क्षमता तपासतात. स्वतःच्या कामाबद्दल सतर्क असतात. निर्णायक भुमिका नसल्याने कामानुरुप निर्णय घेण्यासाठी बराच काळ लावतात. मित्रांचे आदर्श मानतात.


अशा व्यक्ती स्वतः जगात एकलकोंडे समजतात. त्यांच्या सहकार्याला कोणीही नाही असा त्यांचा समज असतो. वडीलोपार्जित संपत्तीतुन बेदखल केले जाते. भावंडे व नातलगांकडुन क्वचितच मदतीचा हात मिळतो. शैक्षणिक अडचणी जीवनात येतात.


अशा व्यक्तींना जर आयुष्यात स्वतःचे स्थान मिळवायचे असल्यास अधी " नाही " म्हणण्याचे शिकायला पाहीजे. अशा व्यक्ती स्वताचे 
नियोजन कोणालाही सांगत नाहीत. मनातील द्वंद्व कोठेही, कोणासोबतही बोलुन व्यक्त करत नाहीत. 

स्वतःच्याच गोष्टींना सतत प्राधान्य देऊन याचा त्रास त्यांनाच होतो. वृद्धावस्थेत स्मृतीभ्रंश होतो. अनायासे काही अनोळखी व्यक्तीद्वारा मदत होऊन काही प्रश्न सुटतात. तशी पारख करवुन घ्यावी.



सावधानता...


कोणाचीही टिका करु नका. लोकांचे कौतुक करा. ईतरांची दिशाभुल करु नका. पारदर्शक व प्रामाणिक मते व्यक्त करावी. त्यात सन्मान वाढला जाईल.


मृगजळवादी भोगी विलासापासुन अलिप्त राहावेत. जितकी ऐपत तितकेच पाय पसरावेत. स्वतः ची तुलना ईतरांशी करु नये. 


मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 

अंकशास्त्र


संबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.



0