मुळांक 3 च्या व्यक्ती...


3, 12, 21, 30 जन्म तारीख असलेल्या व्यक्तींचा मुळांक 3 आहे. मुळांक 3 चा प्रतिनिधी ग्रह बृहस्पती ( गुरु )  आहे. गुरु ग्रह धेर्य, कठोर परिश्रम व कट्टरवादाचा समर्थक आहे. याच सोबत शक्ती, ज्ञान, बुद्धीमत्ता व धार्मिक स्वभावही याच्याच कक्षा व शिक्षेत येतात. मुळांक 3 असलेल्या व्यक्ती मनमोकळी वृत्तीयुक्त वैश्विक वैचारिक पातळीधारक असतात. 
3, 12, 21, 30 जन्म तारीख असलेल्या व्यक्तींचा मुळांक 3 आहे. मुळांक 3 चा प्रतिनिधी ग्रह बृहस्पती ( गुरु )  आहे. गुरु ग्रह धेर्य, कठोर परिश्रम व कट्टरवादाचा समर्थक आहे. याच सोबत शक्ती, ज्ञान, बुद्धीमत्ता व धार्मिक स्वभावही याच्याच कक्षा व शिक्षेत येतात. मुळांक 3 असलेल्या व्यक्ती मनमोकळी वृत्तीयुक्त वैश्विक वैचारिक पातळीधारक असतात.
वैशिष्ट्ये...

मुळांक 3 व्यक्तीरेखा विश्वसनीय आहे. यात 1 व 2 चे संख्या योग सामावलेले आहे. म्हणजेच ती मुळांक 12 ची वैशिष्ट्ये आहेत ती सामुहीक स्वरुपात मुळांक 3 मध्ये सामाविष्ट आहेत. हा मुळांक असलेली व्यक्ती धैर्यवान व हजरजबाबी असतात. ईतरांकडुन कोणतेही काम वसुल करण्याची शक्ती अशा व्यक्तींमधे असते. लोकांना कोणत्याही विषयाबद्दल होकारार्थी करणे यात प्राविण्य असते. अनोळखी लोकांनाही बोलकं करु शकतात. 


अशा व्यक्तींच्या जीवनात अनेक प्रकारे आर्थिक समस्या उद्भवत असतात तरीही स्वतःच्या कार्य कुशलता व बूद्धीमत्तेच्या जोरावर संकटे निराकरण होतात. कधीही निराश होत नाही. ठाम निश्चय व एक पथस्थ असतात. 


त्याचा हट्टी स्वभाव त्यांना व त्यांच्या स्वकीयांना फार महागात पडतो. भोगी विलासी वस्तुंवर उधळपट्टी करतात. कोणतीही कृती करण्यापुर्वी अनेक वेळा विचार करतात मगच अंमलबजावणी करतात. 


अशा व्यक्तींची उद्दीष्टे मोठी असतात. ते कोणतेही काम करताना त्यातील सर्वांगीण सारासार कृतीशील  विचार योग्य निष्कर्ष मिळवुन देतात. काही वेळा निराशेपोटी विस्कटलेली कामेही पुन्हा नवीन उमेद व उत्साहाने सुरु करुन होकारार्थी निष्कर्षावर पोहोचवतात. 


असे व्यक्ती कर्ता करवीता परमेश्वर आहे जो सर्व देतो व घेतो अशी धारणा ठेवतात. त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदलही होतात जे सामान्य मनुष्याच्या आकलनशक्तीच्या पलिकडील गोष्ट असते. 


अशा व्यक्तींना त्यांच्या परिवारातर्फे कोणतीही मदत मिळत नाही. सर्व स्वावलंबीपणाने कमवतात तरीही स्वकियांना पुरेपुर यथाशक्ति मदत करतात.


परीपक्वतेचा अनुभव घेणारे पहीले मुळांकधारी व्यक्ती आहेत. जी व्यक्तीरेषा स्वतःला गर्दीपासुन वेगळं करुन स्वतःच विश्व निर्माण करते. इतक्या जलदगतीने प्रगतीपथावर आरुढ होत असल्याने समाजात त्यांचे शत्रुही झपाटयाने तयार होतात. 


यांचा विशेष गुणधर्म म्हणजे लक्ष केंद्रित करणे व समक्ष आलेले कार्य वाहुन घेणे. वेळ वाया घालवणे त्यांना आवडत नाही. ईतरांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत आणि ईतरांना देखील स्वतःच्या काम ढवळाढवळ करु देत नाहीत. स्वभावाने दयाळु व सरळमार्गी असतात.


त्यांना राग पटकन येतो. जसा येतो तसाच जातो सुद्धा... ते स्वतःची मर्यादा कधीही ओलांडत नाही. 


अशा व्यक्तींकडे लोकांना जागृत करण्याची कला असते. वेगवेगळ्या नीतिमार्गाचा वापर करुन शत्रुपक्षालाही वीमुख करण्याचे सामर्थ्य अशा लोकांना असते. त्यांचा मित्र वर्ग मोठा असलातरी अतीविश्वसनीय मित्र त्यांना अवगत होत नाही. म्हणजेच त्यांना त्यांच्या मित्रवर्गाद्वारे अपेक्षित फायदा कधीही होत नाही. शिस्तप्रिय व्यक्तीमत्व असते. त्यांचे समर्थक त्यांचे अनुकरण करतात. अशा व्यक्तींना त्यांच्या भावनांचे योग्य विश्लेषण व्यक्त करता येते. 




सावधानता...


मुळांक 3 असलेल्या व्यक्ती स्वभानुरुप स्वार्थी असतात. गरजवंत असल्यावर शत्रुलाही मित्र करतील... स्वार्थ साध्य करवुन घेऊन सगळ्यांना सोडुन देतील... यात लोकांमधे त्यांच्या बद्दल गैरसमज पसरतो.


त्यांनी स्वतःचा खर्च स्वतः चालवु नये. अशा व्यक्तींना सर्वच पाहीजे असते. तशी धडपड करुन कामे मिळवतात पण पुर्ण काम एकही करु शकत नाही. यांना मित्रांकडुन स्वाभाविक फसवेगिरी भोगावी लागते. 


मत्सरवाद हा ह्या मुळांकधारींच्या व्यक्तीमत्वाचा मुख्य शत्रु आहे.


संबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.


मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 

अंकशास्त्र



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...