मुळांक 1 च्या व्यक्ती...


ज्या व्यक्ती तारीख 1,10,19 व 28 तारखेला जन्माला येतात त्यांचा मुळांक मुळ संख्येच्या बेरजेप्रमाणे 1 आहे. मुळांक 1 चा प्रतिनिधी ग्रह सुर्य आहे. नवग्रहांमधे सुर्य राजाधिराज व नेतृत्व करणारी नियती आहे. त्यायोगे संबंधित मुळांकवादी व्यक्ती सहजपणे तीक्ष्ण, धैर्यवान, आत्मसंयमी व मेहेनती असतात. ज्या ज्या क्षणी सुर्य बल प्रख्यात व दिव्य वलयमान रुप प्राप्त करतं तेव्हा संबंधित मुळांक 1ची व्यक्ती मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक प्रगतीपथावर आरुढ होते पण जेव्हा सुर्य बलाचे चलायमान मंदावते तेव्हा संबंधित मुळांकधारी व्यक्तीस अपशय, आजार अर्थात त्रिविध ताप वेढुन घेतात.


वैशिष्ट्ये...


मुळांक 1 धारी व्यक्तींच्या आकांक्षा उच्चस्तरीय असतात. त्यांना व्यक्ती आणि वकृत्व स्वातंत्र्याची आवड असते. त्यांना कधीही, कुठलाही हस्तक्षेप अथवा अकारण येणारे अडथळे पटत नाहीत. 


कोणत्याही कार्याची सुरवात केल्यास त्यांना उच्चपदस्थ होण्याची सदैव तीव्र उत्सुकता असते. संबंधित व्यक्ती कोर्पोरेट स्तरावर सीईओ अथवा डायरेक्टर वगैरे पदावर प्रस्थापित होण्यास तीव्र चढाओढ करतात. अशा पदांवर पदस्थ होऊन आपल्या आशील व कर्मचाऱ्यांना योग्यप्रकारे सन्मान पुर्वक वागणुक देऊन आपले कार्य करवुन घेतात. 


हा मुळांक क्रियाशीलतेचं द्योतक आहे. मुळांकाच्या आधारे व्यक्ती निसर्गतः नेतृत्ववादी असतात. अशा व्यक्तींमधे अंतरीक आत्मसंयमी मनोवृत्ती दडलेली असते. सामान्यतः अशा व्यक्तींना प्रारंभिक काळापासुनच पुष्कळ संघर्ष व समाजातुन त्रास सहन करावा लागतो परंतु कधीही अपयश पत्करत नाहीत. विलक्षण अशी आत्मशक्तीयुक्त असे लोक ईतर मुळांक व्यक्तींपासुन अगदी वेगळे आहेत. जे सहसा कुठेही सर्वसामान्यपणे दिसण्यात येत नाहीत.


अशा व्यक्तींमधे नेतृत्ववादी विचारसरणी असते. बालपणापासुन ते प्रौढावस्थेपर्यंत ते वृद्धावस्थेर्यंत स्वकीय व परकीय जनांसाठी त्यागी भावनेद्वारा लोकांची मनें जिंकतात. अशा व्यक्ती ईतरांच्या वेदना व त्रास समजून घेतात. परोपकारी वृत्ती यांचा प्रमुख स्वभाव आहे.


त्यांचे सामाजिक वर्तुळ विस्तृत असते. अनोळखी लोकही यांचे जिवलग मित्र होतात. एकदा जर कोणत्याही अनोळखी माणसाने अशा व्यक्तीशी मैत्री केल्यास ; त्यांची मैत्री चिरकाल टिकते. असे मुळांकधारी व्यक्ती स्वार्थीहेतुपायी मैत्री करत नाहीत. समाजात त्यांचा मानसन्मान होतो. त्याचे मित्र त्याचे समर्थक होतात. अशा परिस्थितीत असे समर्थक कोणत्याही आज्ञेचे पालन करतात ते ही कोणताही तर्क वितर्क न करता...! 


या मुळांकात विशेष वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. अशा व्यक्ती संशोधक प्रवृत्तीयुक्त असतात. त्यांना कोणत्याही अथवा कोणाच्याही दबाबतंत्राखाली काम करता येत नाही. त्यांना त्यांची संशोधने सांस्कृतिक परिभाषेत परंपरागत पद्धतीने व्यक्त करण्यात आवड असते. असे व्यक्ती जगाला काहीतरी नवीन कार्य प्रेरणा देऊन जातात.


मुळांक 1 धारक व्यक्ती स्वशरीर रचनेबाबत जिज्ञासु असतात. त्यांच्या आचरणातुन मन, काया व वाचा यात एकरुपता दिसुन येते. अशा व्यक्ती तराजुप्रमाणे मानसिक व शारिरीक कामे एकाच वेळी अतीकुशलतेने हाताळु शकतात. अशा व्यक्तींना योग्य रीतीने जीवन जगण्याची कला अवगत असते. 


नोकरी व व्यवसायात ते ईतरांपेक्षा अधिक प्रगतीशील असतात. त्यांच्या दुरदृष्टीवादी प्रवृत्ती मुळे अत्यंत कमी वेळेतच यश प्राप्त करतात. ज्या व्यवसायात प्रवेश करतील तेथे उच्च पदस्थ होतात. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे ईतरांनाही कलेचा वाव प्राप्त होतो.


अशा व्यक्तींचा मुख्य गुणधर्म म्हणजे त्यांचे आचरण व भुमिका अगदी स्पष्ट व स्थिर असते. उद्दीष्टाला अनुसरुन अतिसावध व चिकाटीयुक्त वृत्तीने सक्रीय असतात. ते स्वतः कधीही अज्ञान अथवा असुरक्षित भावनेने भरकटत नाहीत अथवा ईतरांची दिशाभुल करत नाहीत. ते जे काही व्यक्त करतात ते थोडक्यात व मोजक असते. 


अशा व्यक्तींची निर्णायक भुमिका व निर्णय घेण्याची क्षमता गौरवास्पद असते. त्यांच्या आचरणात अनिश्चितता नसते. हजर जबाबीपणा व अचुक निर्णय त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असते. त्यांना जन्मजात शिकवण आत्म संज्ञा असते. परोपकारीवृत्तीयुक्त असतात. 



मुळांक - 1

सावधानता -


गरजेपेक्षा जास्त आकर्षक दिसण्याच्या बेताने प्रमाणाबाहेर आर्थिक उधळपट्टी करतात. अशावेळी सरासरी संतुलन बिघडु शकते. 


काही वेळा नैराश्यवादामुळे वाढत असलेल्या मानसिक तणावाखाली येऊन हाती घेतलेली जबाबदारीयुक्त कामे सोडुन देतात. 


अशा व्यक्तींनी आर्थिक क्षेत्रात कधीही स्वतःची अकारण परीक्षा घेऊ नये. हा स्वभाव मोठी हानी करवु शकतो.


आपल्या परिसीमेच्या बाहेर जाऊन ईतरांवर विश्वास ठेवणे घातक आहे. ईतरांकडुन फसवले जात असता. वेळेचीही निसाडी करवुन घेत असता.


स्त्रीयांबाबतचे आकर्षण घोर नुकसान देयक आहे. याबाबत स्वतःला सावरले पाहीजे.


आरोग्य -


ज्यावेळी सुर्य ग्रहाचे चलायमान प्रभाव कमी होतो त्यावेळी अशा व्यक्तींच्याही प्रकृतीत थकवा, ताप, रक्त दबावाशी निगडीत आजार जडतात. 


मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 

अंकशास्त्र


संबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0