वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कारणास्तव लोक रोग विकारांना बळी पडतात. माझ्याकडे येणाऱ्या लोकांपैकी काही जणांना उद्भवणार्या आजारांचा एक ठराविक सुक्ष्म अंक शास्त्रीय पँटर्न पाहाण्यात आला आहे. त्या अनुशंघाने काही विशिष्ट कालावधी किंवा तिथी किंवा तारखेलाच संंबंधित त्रास निदर्शनास येत असतो. अशा वेळी अंकशास्त्र + कर्म दहन + दत्त आधिष्ठान माध्यमातून संबंधित दोष, ताप, पीडा अथवा बाधेचे निराकरण करण्यात येते. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट तर्फे रोग विकारांची भविष्यात होणारी गती वर्धकता थांबवण्याहेतु पुर्वाभ्यास केल्यास दुःखांची तीव्रता बरीच कमी करता येईल.
मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते.
मुळांक 1
- 1, 10, 19 व 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 1असतो. ह्दय विकार, स्पंदनाचे त्रास, रक्ताभिसरण, रक्त दाब व डोळ्याचे विकार असे त्रास होऊ शकतात. वेळच्यावेळी वैद्यकीय सल्ले घेतले पाहीजेत.
- 19, 28, 37, आणि 46 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात.संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
- आॕक्टोबर, डिसेंबर व जानेवारी या महीन्यांमधे दगदग करु नये.भ्रमंतीची कामे या कालावधीत टाळावी.
- 2, 11, 20 व 29 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींचा मुळांक 2 असतो. पोटाचे विकार पचनसंस्थेशी संंबंधित, आतड्यांचे विकार व गाठी अशाप्रकारचे त्रास होऊ शकतात.
- 20, 25, 29, 43, 52, 65 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात. संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
- फेब्रुवारी, जुलै व जानेवारी या महीन्यांमधे दगदग करु नये.भ्रमंतीची कामे या कालावधीत टाळावी.
- 3, 12, 21 व 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 3 असतो. मज्जातंतुचा दाह व त्वचारोगाचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते.
- फेब्रुवारी, डिसेंबर, जुन व सप्टेंबर या महीन्यांमधे दगदग करु नये.भ्रमंतीची कामे या कालावधीत टाळावी.
- मुळांक 3 असलेल्या व्यक्तींना 12, 21, 39, 48 व 57 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात.संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
- 4, 13, 22 व 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 4 असतो. अशा व्यक्तींना सहसा रोग निदान न होणाऱ्या रोग विकारांचा त्रास होतो. मानसिक तणाव, डोकेदुखी, पाठदूखी व किडनीशी संबंधित त्रास उद्भवण्याची शक्यता असते.
- फेब्रुवारी, जुलै, आँगस्ट व जानेवारी या महीन्यांमधे दगदग करु नये.भ्रमंतीची कामे या कालावधीत टाळावी.
- मुळांक 4 असलेल्या व्यक्तींना 13, 22, 31, 40, 49 व 58 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात.संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
- 5, 14 व 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 5 असतो. अशा व्यक्तींना बुद्धीवर अधिकतम दबाब देण्याची सवय असते. मज्जातंतुचा दाह, निद्रानाश व अर्धांग वायु संंबंधित त्रास उद्भवु शकतात.
- जुन, डिसेंबर व सप्टेंबर या महीन्यांमधे दगदग करु नये.भ्रमंतीची कामे या कालावधीत टाळावी.
- मुळांक 5 असलेल्या व्यक्तींना 14, 23, 41 व 50 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात.संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
- 6, 15 व 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 6 असतो. अशा व्यक्तींना घसा, नाक व फुफुसाचे आजार तर महीला वर्गांमधे छातीचा कर्करोग, वृद्धापकाळी उच्च रक्त दाब व ह्दयरोग संबंधित त्रास उद्भवु शकतो.
- आॕक्टोबर, मे व नोव्हेंबर या महीन्यांमधे दगदग करु नये.भ्रमंतीची कामे या कालावधीत टाळावी.
- मुळांक 6 असलेल्या व्यक्तींना 15, 24, 42, 51 व 60 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात.संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
- 7, 16 व 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 7 असतो. लहान मोठ्या गोष्टींवर अशा व्यक्तींना पटकन राग येतो. निर्विघ्न कामे शांत चित्ताने करतात ; पण जराही त्रास झाला तर डोक्यावर ताण घेतात. शारीरिक दृष्ट्या नाजुक असतात. त्वचारोगाचा त्रास उद्भवु शकतो.
- मुळांक 7 असलेल्या व्यक्तींना 7, 16, 25, 43, 52 व 61 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात.संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
मुळांक 8
- 8, 17 व 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 8 असतो. अशा व्यक्ती यकृत,आतड्यांचे विकार, डोकेदुखी, रक्ताशी जोडलेले त्रास व संधिवाताशी संबंधित त्रास उद्भवु शकतात.
- फेब्रुवारी, डिसेंबर, जुलै व जानेवारी या महीन्यांमधे दगदग करु नये.भ्रमंतीची कामे या कालावधीत टाळावी.
- मुळांक 8 असलेल्या व्यक्तींना 17, 26, 35, 44, 53 आणि 62 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात.संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
- 9, 18 व 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 9 असतो. अशा व्यक्ती ताप, गोवर, अंगावर पुरळे येणे संबंधित त्रास उद्भवु शकतात. दारु व्यसनापासुन लांब राहाणे आवश्यक आहे.
- आॕक्टोबर, एप्रिल, मे व नोव्हेंबर या महीन्यांमधे दगदग करु नये.भ्रमंतीची कामे या कालावधीत टाळावी.
- मुळांक 9 असणाऱ्या व्यक्तींना 9, 18, 27, 36, 45, 54 आणि 63 व्या वर्षी अशी वेळ येऊ शकते ज्यायोगे ते पुर्ण निरोगी राहु शकतात किंवा अधिकतम आजार भोगु शकतात.संबंधित वय गंडातराची सुरवात समजण्यास हरकत नाही.
मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा
त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्