जेथे योगेश्वर कृष्ण आहे. धनुर्धर पार्थ आहे तेथेच विजय आहे. लक्ष्मी आहे. कल्याण आहे आणि शाश्वत शांती आहे असे माझे मत आहे; असे संजयाने गीतेच्या अंतिम श्लोकात म्हटले आहे.यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:।तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतीर्मम ।।
योगेश्वर कृष्ण म्हणजे ईशकृपा, आणि धनुर्धर पार्थ म्हणजे मानव प्रयत्न ह्या दोहोंचा जेथे संगम होतो तेथे काय असंभव आहे? वाढता मानव प्रयत्न आणि अवतरत्या ईशकृपेचे जेथे मिलन होते तेथे विजयाचाच घंटानाद संभवतो ही निर्विवाद घटना आहे. दसऱ्याचा उत्सव म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचा समन्वय समजावणारा उत्सव. नवरात्राचे नऊ दिवस जगदंबेची उपासना करून शक्ति प्राप्त केलेला मनुष्य विजय प्राप्तीसाठी येथे नाचू लागणे अगदी स्वाभाविक आहे. ह्या दृष्टीने पाहता दसऱ्याचा उत्सव म्हणजे विजय प्रस्थानाचा उत्सव.
भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे. शौर्याची उपासक आहे. व्यक्ती व समाज ह्यांच्या रक्तात वीरता प्रगटावी ह्यासाठी दसऱ्याचा उत्सव आहे. जर युद्ध अनिर्वायच असेल तर शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहाता त्याच्यावर चढाई करून त्याचा पराभव करणे ही कुशल राजनीती आहे. शत्रूने आपल्या राज्यात घुसून लूटमार केल्यानंतर त्याच्याशी लढाईची तयारी करण्याएवढे आपले पूर्वज नादान नव्हते ते तर शत्रूचा दुरव्यवहार कळताच त्याच्या सीमेवर अचानक हल्ला करीत. रोग व शत्रू ह्याना उत्पन्न होताच दाबले पाहिजे. एकदा जर त्याचे पाय पसरले गेले तर मग त्याच्यावर ताबा मिळविणे मुश्किल बनते.
पावसाच्या कृपेने मानव धनधान्याने समृद्ध झालेला असतो, त्याच्या मनात आनंद मावत नसतो, नसानसात उत्साहाची कारंजी उसळत असतात अशा वेळी त्याला विजय प्रस्थान करावे असे वाटते हे अगदी स्वाभाविक आहे. शिवाय पाऊस संपलेला असल्यामुळे रस्त्यावरील चिखल वाळलेला असतो. हवामान अनुकूल असते, आकाश स्वच्छ असते. असे वातावरण युद्धाला अनुकूलता प्राप्त करून देणारे असते. नऊ-नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्राप्त केलेली शक्तीही शत्रूचा संहार करायला प्रेरक होत असते.
रघूने शमी-वृक्षावर पावसाच्या रूपात पडलेल्या सोन्याच्या मोहरा कौत्साला दिल्या. चौदा कोटीपेक्षा अधिक घेणार नाही असा त्याने आग्रह धरला आणि तुझ्या निमित्ताने आलेली ही संपत्ती आहे तेव्हा अधिक झालेल्या संपत्तीने मी माझी तिजोरी भरणार नाही असा आग्रह रघूने धरला. वैभव न घेण्यासाठी धरलेला आग्रह कदाचित केवळ भारतातच पाहायला मिळेल. जादा असलेल्या सोन्याच्या मोहरा लोकांकडून लुटविल्या गेल्या.
सुवर्णमोहरांचे प्रतीक म्हणून आम्ही शमीपूजनानंतर शमीची पाने आपण एकमेकांना देतो. जे वैभव मिळाले आहे ते मी एकटा भोगणार नाही, आपण सर्व मिळून भोगू या. आपण वाटून खाऊ. केवढा उदात्त भाव !
दसऱ्याचा दिवस म्हणजे समाजात असलेल्या दीन, हीन, लाचार तसेच भोगवृत्तीचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. बाह्य शत्रूबरोबरच आत बसलेल्या षडरिपूवर विजय मिळविण्यासाठी कृतनिश्चयी बनण्याचा दिवस ! दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, शौर्याचा शृंगार व पराक्रमाची पूजा ! दसरा म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचे पवित्र मिलन !
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला
तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.
अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र
प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.
वाहन सुखाचा मंत्र सिद्ध हनुमान यंत्र - सुरक्षा कवच
तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.
अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र
प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.
वाहन सुखाचा मंत्र सिद्ध हनुमान यंत्र - सुरक्षा कवच