मुळांक 5 च्या व्यक्ती...


ज्या व्यक्ती 5, 14, किंवा 23 तारखेला जन्मलेले आहेत अशा व्यक्तींचा मुळांक 5 असतो. ह्या मुळांकाचा प्रतिनीधी ग्रह बुध आहे. बुध ग्रह ब्रम्हाडीय सौरमंडळातील आकारमानाने सर्वात लहान ग्रह आहे. सर्व ग्रहांमधे सर्वात हुशार व अती तीक्ष्ण बुद्धीवाद या ग्रहाकडे आहे.

ज्या व्यक्ती 5, 14, किंवा 23 तारखेला जन्मलेले आहेत अशा व्यक्तींचा मुळांक 5 असतो. ह्या मुळांकाचा प्रतिनीधी ग्रह बुध आहे. बुध ग्रह ब्रम्हाडीय सौरमंडळातील आकारमानाने सर्वात लहान ग्रह आहे. सर्व ग्रहांमधे सर्वात हुशार व अती तीक्ष्ण बुद्धीवाद या ग्रहाकडे आहे.

वैशिष्ट्ये...


बुध ग्रह सुसंवाद, मानसीकता, वैचारिक आराखडा, तर्कशक्ती, हजर जबाबीपणा, अनुकरणशीलता, विविधता अशा गुणांचा अधिपती आहे. बुध ग्रह शिकवणी, आदान प्रदान व कमी अंतरावरील प्रवासाचा कारक आहे.


अंकशास्त्राधारे मुळांक 5 चे मुख्य स्थान गणले जाते. यातील विशेषतः म्हणजे अशा मुळांकधारी व्यक्ती कोणताही प्रसंग व वेळ स्वतःच्या अमलाखाली आणु शकतात. हे व्यक्ती अगदी निराळे असतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा व दुर्लभ ज्ञानाद्वारे ईतरांच्या जीवनात अढळ स्थान तयार करतात.


अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या कामात प्रमाणाबाहेर व्यस्त असतात. ते कधीही कोणताही क्षण फुकट घालवु इच्छित नसतात. त्यांना वेळेची फार किंमत असते तसेच कुठे वेळ, ऊर्जा व पैसा गुंतवायचा याचे परिपुर्ण ज्ञान असते. त्यांना प्रवासाची आवड असते. वेळेच्या अभावी ते अपेक्षित प्रवास करु शकत नाहीत याची त्यांना खंत असते.


अशा व्यक्ती अतिहुशार असतात. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता अतिउत्तम व तात्कालिक असते. जो निर्णय घेतात तो नेहमी योग्यच असतो. शारीरिक दृष्ट्या पुष्कळ वेळ कष्ट करु शकत नाहीत पण मानसिक श्रम करताना ते कधीही थकत नाहीत.


मुळांक 5 च्या व्यक्ती सभोवतालची परिस्थिती व संबंधित अभिव्यक्तीला अनुसरुन स्वतःत संवादात्मक बदल करवुन घेतात. त्यांचा स्वभाव अत्यंत लवचिक व अतिसंवेदनशील असतो. वृद्ध व्यक्तीं समक्ष त्यांच्याच प्रमाणे तर लहान मुलांसमक्ष त्यांच्याच सारखे वर्तन करतात. त्यायोगे त्यांना समाजात सर्व स्तरांवर विशेष सन्मान प्राप्त होतो.


अशा व्यक्ती खर्चीक असतात पण योग्य वेळेवर खर्चाला पायबंदही सहज घालु शकतात.


हाती घेतलेली कामे आक्रमक धोरणाद्वारे पुर्णत्वाला घेऊ जातात. कोणत्याही नवीन विषय किंवा प्रकल्पासाठी व्यवस्थित योजना आराखडा तयार करुन व सर्वांगीण विचार करुन अंमलबजावणी करतात. स्वतःच्या आरामाबद्दल कधीही चिंता करत नाहीत. कार्य सिद्धी केल्यानंतरच सुट्टी जाहीर करतात.


एका कामात ते कधीही समाधानी नसतात. ते नेहमी धनार्जन करण्याहेतु ईतर पर्यायी मार्गावर यशस्वी पथस्थ होतात. व्यक्तीत्वाधारे अशा व्यक्ती व्यावसायिक असतात. कोणत्याही कार्यालयात नोकरी करत असले तरी त्यांचा कल धंद्यावरच असतो. ते त्यात यशस्वीसुद्धा होतात.


अकस्मात पैसा अशा व्यक्तींना प्राप्त होत असतो. ते नेहमी मोपक धोका पत्करण्यात पटाईत असतात. असा धोका घेण्याची कला त्यांना कमी कालावधीतच उच्च शिखरावर पोहोचवते. 


रोज काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता असते. अत्यंत जटील ज्ञानही सहजपणे समजवुन घेऊ शकतात. एकापेक्षा अधिक कामे एकाच वेळी करण्याच्या स्वभावाने काही वेळा नुकसानही झेलतात.


त्यांचे मित्र त्यांच्या सोबत चिरकाळ टिकणारे असतात. मित्रांतर्फे पाठिंबातर मिळतोच सोबतच ते स्वतःही गुंतले जातात.


बुध ग्रहाचे बुद्धीवाद असमांतर अभिव्यक्तीवर आधारलेले आहे. मुळांक 5 असलेल्या व्यक्तींचा मेंदु दिवसभर अतीसक्रीय असतो.


अशा व्यक्तींचा विशेष गुणधर्म म्हणजे ते समाजाला मंत्र मुग्ध करतात. ईतरांना ते नेहमी स्वतःजवळ असावेत असे वाटत असते.


या व्यक्तींचे व्यवहार ज्ञान तीक्ष्ण असते. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे निर्णायक क्षमता तात्काळ व अचुक असते. व्यक्तीवादाचा परिपक्व अभ्यास असतो. व्यक्ती अथवा परिस्थितीजन्य प्रश्न उद्भवण्याआधीच त्यांच्याकडे सर्व मार्मिक उत्तरे उपलब्ध असतात. हे मुळांक 5 च्या व्यक्तींचे विशेष वैशिष्ट्य आहे.


वाहत्या पाण्यातुन पैसा कमवणारे व्यक्ती आहेत. काही वेळा अडचणी किंवा त्रासाने ग्रस्त जरी असले तरीही कामावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कोणत्याही यंत्रणेचा अंतर्गत व बाह्य स्वरुपाचे यथार्थ आकलन करतात. ह्या व्यक्तींना तात्काळ ज्ञानाची प्राप्ती होते ते त्यांच्या ईच्छा शक्तीच्या तीव्रतेवर अवलंबून असते.


मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 


अंकशास्त्र


संबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0