श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: शाळेसंबंधी वास्तु कशी असावी ? SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

शाळेसंबंधी वास्तु कशी असावी ?

प्राचीन काळी विद्या संपादन करण्याहेतुने त्या त्या राज्य प्रशासनात वेद विद्यावाचस्पती आदी आचार्यांचे आश्रम होत असत. जेथे बालाकावस्थेतुन तारुण्यावस्थेपर्यंत प्राचार्य, शिक्षक अथवा गुरुंच्या सान्निध्यात राहुन विद्या ग्रहण केली जात असे. तेव्हाच्या शिक्षण पद्धतीपासुन ते आजच्या बाजारीकरणाच्या शिक्षणपद्धतीपर्यंत सर्वच भेद ओळखुन येतो. या भेदाच्याही पलिकडे जर काही बदललं नसेल तर ती गोष्ट म्हणजे त्या शिक्षणपद्धतीला आवश्यक असणारी वास्तुची प्राण ऊर्जा...! या ऊर्जेचा सुयोग्य विनियोग विद्यार्थी व शिक्षक वर्गाला कसा करवुन घेता येईल. या हेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून संबंधित अभिलेख प्रकाशित करत आहोत.

शैक्षणिक प्रगतीचा कारक ग्रह बृहस्पती असल्याने शाळा व महाविद्यालयाची स्थापत्य शक्ती म्हणजे बृहस्पतीचे प्रतिक...!

शाळा अथवा विद्यालय निर्माण हेतुने संबंधित आकार 'L' किंवा 'U' असणे शुभकारक आहे.

विद्यालय भवनाचा आकार 'U' असल्यास भावी योजना शुभकारक असतात. 'L' असल्यास शल्य शोधनाद्वारे शुभ अथवा अशुभ गणले जाते.

दिशा निर्देशने

 • उत्तर, पुर्व व ईशान्य दिशा मोकळ्या ठेवणे उपयुक्त असते. ज्यायोगे प्राण ऊर्जेचा प्रवाह निरंतर वास्तु प्रदेशात होत असतो. त्यायोगे शालेय विद्यार्थी उत्साही, उत्तम आरोग्य व अभ्यासात मन एकाग्र होणे असे शुभकारक योग होतात.
 • शाळेचे प्रवेश द्वार उत्तर, ईशान्य व पुर्वेला असणे चांगले. दक्षिण द्वार अशुभकारक आहे.
 • वर्गातील फळा उत्तर अथवा पुर्व दिशेला असणे महत्वाचे आहे.
 • शाळेचे मैदान वास्तुच्या पुर्व व उत्तरेला असुन त्याचा उतार ईशान्य दिशेकडे असणे शुभकारक असते.,
 • शाळेत बांधकामावेळी सेलिंगासाठी I बीमचा वापर करु नये.
 • शाळेतील शिक्षक वर्ग नैऋत्य दिशेला असणे अतिशुभकारक आहे.
 • शाळेचे आॕफीस आग्नेय कोणात असुन त्याचे मुख पुर्व अथवा उत्तर दिशेकडे असायला हवे.
 • ग्रंथालय पश्चिमेकडे असणे उपयुक्त आहे.
 • वैज्ञानिक अथवा इतर प्रयोगशाळा आग्नेय दिशेला असणे आवश्यक आहे.
 • शिक्षक मिटींग हाॕल उत्तर किंवा पुर्व दिशेला असणे शुभकारक आहे.
 • शाळेच्या आवारात गोलाकार पान असलेले वृक्ष असणे शुभकारक आहे. काटेंयुक्त झाले टाळावीत.
 • शाळेच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा फवारा अथवा फाऊंटन तयार करावेत.
 • वर्गाला आतुन हलका गुलाबी, पांढरा अथवा पिवळसर रंग मंगलमय व चैतन्यमय वातावरणात भर आणतो.

महाविद्या व मातृका परमदुर्लभ बहुपयोगी साधना अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:

FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज