अंकशास्त्र व जन्म तारीख - Numerology birthdate Works Quikly


जन्म दिवस, मुळांक व जन्म तारीख ह्या तीन मुलभुत गोष्टी मानवी जीवनात अतिशय महत्वाची भुमिका बजावतात. याचे कारण असे की, प्रथमतः या तीन्ही गोष्टी कधीही बदलु शकत नाहीत आणि दुसरी म्हणजे संबंधीत ग्रह नक्षत्रयुक्त जन्म नकाशा जन्म वेळेपासुन ते मृत्यु पर्यंत आयुष्यभर उमटला गेलेला प्रभाव दाखवत असतो. ज्याचा प्रत्यक्ष संबंध मानवाच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिकआध्यात्मिक अभिव्यक्तीवर दिसुन येतो. 



उदा. एखादी व्यक्ती जर 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेली असेल तर त्याने अपेक्षित मंगलमय कर्मे याच तारखांना नियोजित केली पाहीजेत. ही एक खंबीर बाजु तयार होऊन कार्यसिद्धी होण्यास मदत होईल. अंक 4 हा अंक 1 चा विरोधक आहे. ज्या व्यक्तीचा मुळांक 1 आहे त्याच्यासाठी अंक 4 प्रगतीशील चिन्ह नाही. त्याने अशा वेळी मुहुर्त कर्मे टाळावीत.


ज्या व्यक्तींचा मुळांक 4 आहे त्याने मुळांक 1 असलेल्या व्यक्तीशी जीवन व्यतीत करु नये. ज्या व्यक्ती 1 मुळांकधारी आहेत त्यांना नेहमी अंक 4, 13, 22, 31, 40, 49 द्वारे अशुभ संकेतांचीच प्राप्ती आहे. मुळांकाचा प्रभाव वास्तुशी सुद्धा जोडलेला असतो त्यायोगे 1 मुळांकधारी व्यक्ती 4 आणि संबंधित पाढ्यात जसे 8, 16, 24,... अशा घरात स्थानबद्ध होऊ नये. याची योग्य अंमलबजावणी न केल्यास अनायासे नुकसान होत राहाणे स्वाभाविक आहे. 


ज्या व्यक्ती 4 आणि 8 मुळांकधारी आहेत त्यांनी त्यांचा अंक देखील कामकाजाकरीता टाळावेत. या व्यतिरिक्त ईतर अंकांचा उपयोग केल्यास फायदाच होईल यात शंका घेऊ नये. जे व्यक्ती 8, 17, 26 तारखेस जन्मलेले आहेत. त्यांच्या नावाने मुळांक 1,3,5 किंवा 6 असला तरी ते शुभ आहे. अशाच प्रकारे वाहन क्रमांकही निवडून घ्यावा. जो अतिशय लाभकारक ठरतो. 


मुळांकाचे नियम...

संबंधित जीव जन्माला येताच मुळांकाच्या आधारावर त्याचे नामकरण करायला पाहीजे. ज्या नावाने त्याला आयुष्यभर उच्चारले जाईल असे नामकरण करावेत. अपरिपक्व अभ्यासाशिवाय कोणतीही केली गेलेली कृती भविष्यात अपत्याला नुकसानदायक ठरु शकते. 


ठेवले गेलेले नाव जरी मोहक नसले पण मुळांकाला अनुसरुन असले ; त्यायोगे भाग्योदय होतोच. मग तो कोणत्याही स्वरुपात असु शकतो. त्याथ बालीश अट्टाहास करुन उपयोग नाही. 



उदा. जर व्यक्तीचे नाव Rahul Sharma आहे. जो नेहमी Rahul या नावाने बोलवला जातो. त्याची जन्म तारीख 15 असेल तर त्याचा मुळांक 1+5 - 6 असा येतो. आता आपण या व्यक्तीचा मुळांक काढु...



A - 1 B - 2 C - 3 D - 4 E - 5
F - 8 G - 3 H - 5 I or J - 1 K - 2
L - 3 M - 4 N - 5 O - 7 P - 8
Q - 1 R - 2 S - 3 T - 4 U - 6
V - 6 W - 6 X - 5 Y - 1 Z - 7

जन्म दिन Rahul

Rahul साठी मुळांक होतो 2+1+5+6+3 = 17 = 1+7 = 8


1 व 4 अंक सुर्य ग्रहकारक आहेत तर अंक 8 चे मालक शनि महाराज आहेत. त्यायोगे 4 आणि 8 चे समायोजन शुभकारक नाही. म्हणुन जन्म तारखेला अनुसरुन ठेवले गेलेले नाव विसंगत आहे. 


यापुढे आपण आडनावाचे विश्लेषण करु...


Rahul = 8


Sharma = 3+5+1+2+4+1 = 16 = 1+6 = 7


म्हणुन 8 + 7 = 15 = 1+5 = 6 


वरील नावाद्वारे गणला गेलेला मुळांक 6 त्याच्या जन्म दिनाच्या तारखेच्या मुळांकाशी एकरुप आहे. म्हणजेच पुर्ण नाव Rahul Sharma लाभकारक आहे. अशा व्यक्तीने पुर्ण नाव जर व्यवहारात आणले तर प्रगतीपथावर आरुढ होईल.


मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 

अंकशास्त्र


महत्त्वाची सुचना -


योग्य विश्लेषणासाठी महीना व वर्ष मुळांकाला अनुसरुन मोजु नयेत.


संबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0